ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
टॉप 100 चित्रपटात 50 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘पडोसन’चा समावेश

टॉप 100 चित्रपटात 50 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘पडोसन’चा समावेश

‘एक चतुर नार करके सिंगार… एक चतुर नार बडी होशियार’हे गाणं तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहिती तर पटकन हे गाण ऐका. याच कारण असं की, हे गाणं असलेला ‘पडोसन’ हा चित्रपट तब्बल 50 वर्षांनी 100 उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आला आहे.  इंटरनेट मुव्ही डेटाबेस (IMD) च्या यादीत याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या चित्रपटांची जादू आजही तशीच आहे असे म्हणायला हवे. त्यात 50 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या चित्रपटाचा समावेश होणेही महत्वपूर्ण आहे. 

परिणितीकडे नाही चित्रपट म्हणून आता निवडणार हे क्षेत्र?

50 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता चित्रपट

‘पडोसन’ हा चित्रपट  29 नोव्हेंबर 1968 साली रिलीज झाला. भोला आणि बिंदूची छानशी लव्हस्टोरी यामध्ये दाखवण्यात आली होती. यातील गाणी तर अफलातून होती. हा चित्रपट इतका गाजला होता की, या चित्रपटाची कित्येक वर्ष क्रेझ होती. गावातून आलेला भोला (सुनील दत्त) शहरात येतो आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या बिंदू (सायरा बानू)च्या प्रेमात पडतो. तिला प्रेमात पाडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. तो प्रयत्न ती मजा धम्माल मस्ती आणि इमोशनल करणारा असा हा चित्रपट आहे. एक नक्की की हा चित्रपट त्याकाळातील धम्माल विनोदीपटातील होता. 

ADVERTISEMENT

सायरा बानू यांना मिळाली ओळख

सायरा बानू यांनी 1961 साली ‘जंगली’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी त्यांचा ‘पडोसन’ हा चित्रपट आला. सायरा बाून यांच्या चित्रपटातील करिअरला कलाटणी देणारा हा चित्रपट होता. या चित्रपटाआधी सायरा बानू यांचे दिलीप कुमार यांच्याशी लग्न झाले होते. या चित्रपटातील अभिनय पाहून द दिलीप कुमार यांनी सायरा बानू यांच्या कामाची तारीफ केली होती. या चित्रपटातून सायरा बानू यांच्या सौंदर्याचेही कौतुक झाले होता. सुनील दत्त यांच्यासोबतची त्यांची ऑनस्क्रिन जोडीही हिट झाली होती. 

दीपिकाला छपाकमधील रुपात पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

गाण्यांची जुगलबंदी

ADVERTISEMENT

ज्योती स्वरुप यांच्या ‘पडोसन’ या चित्रपटातील गाणीही तितकीच प्रसिद्ध होती. ‘एक चतुर नार’ या गाण्यामध्ये  जुगलबंदी पाहायला मिळाली. सुनील दत्त यांना गाण्यातील काहीच कळत नसते. पण सायरा बानू यांना पटवण्यासाठी विद्यापति त्यांना मदत करतात. या विद्यापतिची भूमिका किशोर कुमार यांनी बजावली आहे. हे गाणं  मन्ना डे, किशोर कुमार आणि महमूद यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. विनोदी प्रकारातील हे गाणे त्यामुळे खूपच चालले. या गाण्याबरोबरच या चित्रपटात आणखी ७ गाणी देखील होती. ‘मै चली मै चली देखो प्यार की गली’, ‘मेरे सामनेवाले खिडकी मैं’, ‘कहना है कहना है’, ‘मेरे भोले बलम’,’आओ आओ सावरीया’, ‘भई भत्तरु’ ही गाणी देखील चांगलीच प्रसिद्ध झाली.

कंगना रनौतलाही आवरता आला नाही पाणीपुरी खाण्याचा मोह

पुन्हा पाहिला जाईल चित्रपट

आजही जुन्या चित्रपटामध्ये पडोसन या चित्रपटाचे नाव घेतले जाते. पण आता 100 चित्रपटांमध्ये या चित्रपटाला स्थान मिळाल्यानंतर हा चित्रपट नक्कीच पुन्हा पाहिला पाहिला जाणार आहे हे नक्की. त्यामुळे 50 काय पुढील 100 वर्षातही पडोसन चित्रपट या यादीत असाच राहील अशी अपेक्षा आहे.

ADVERTISEMENT

(सौजन्य-Youtube,Instagram)

हे हि वाचा,

मराठी चित्रपट नवीन 2021

07 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT