पाकिस्तानी वीणा मलिक भारतीयांना म्हणाली, ‘Dont mess with us’

पाकिस्तानी वीणा मलिक भारतीयांना म्हणाली, ‘Dont mess with us’

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत तोडगा काढत देशात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु असताना पाकिस्तानची अभिनेत्री वीणा मलिक मात्र वाटेल ते बोलत सुटली आहे. पाकिस्तानच्या लोकांना भारतीयांबद्दल भडकावण्याचे काम ती तिच्या ट्विटमधून गेल्या काही दिवसांपासून करु लागली आहे. पुलवामा येथे भारतीय सैन्यावर दहशतवादी हल्ला झाल्यापासून वीणा मलिक ट्विटच्या माध्यमातून मुक्ताफळे उधळत आहे. तिने एक ट्विट करत भारतीयांना  ‘Dont mess with us’ असे म्हटले आहे. तिच्या या वायफळ वागण्यावरच अनेक भारतीय सेलिब्रिटींमध्ये ट्विट वॉर सुरु झाले आहे.हेराफेरी परतणार! पाहायला मिळणार तेच त्रिकूट


 वीणा मलिकची मुक्ताफळे


पुलवामा येथे भारतीय जवानांवर  पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला. त्यानंतर पुन्हा एकदा #surgicalstrike झाले. परिस्थितीचे गांभीर्य आणि माणुसकी लक्षात न घेता वीणा मलिक मात्र ट्विटरवर बरळतच सुटली आहे. काही तासांपूर्वी तिने पाकिस्तान जिंदाबाद म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे.  शिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची तुलना करत इम्रान खान किती सरस आहेत असे म्हणत मोदींना लक्ष्य केले आहे. या शिवाय पुलवामा हल्ल्याच्या दिवसापासूनच ती चिथावणीखोर भाषेत ट्विट करत आहेत. त्यामुळे वीणा मलिकला झाले काय? असा प्रस्न उपस्थित होत आहे.
प्रनूतनच्या 'नोटबूक' चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित


सेलिब्रिटींना केले लक्ष्य


वीणा मलिक कोण ? हे या आधी कदाचित कोणालाच कळाले नसते. पण बिग बॉसच्या निमित्ताने तिची भारतीयांना ओळख झाली. वीणाचे शोमधील वागणे पाकिस्तानला पटले नव्हते त्यावेळी तिच्यावर टीका करण्यात आली होती. तिच्यावर पाकिस्तानी मीडियानेदेखील लक्ष्य केले होते. पण आता याच वीणाचे देशप्रेम वर येऊ लागले आहे. तिने तिच्या ट्विटच्या माध्यमातून नुसते मोदींना नाही. तर अक्षयकुमार, सलमान खानला देखील लक्ष्य केले आहे. त्यावर चिडलेलल्या अन्य सेलिब्रिटींनीही आपला राग व्यक्त केला आहे. यात ज्येष्ठ पत्रकार शोभा डे, स्मॉल स्क्रिन स्टार सौंदर्या टंडन यांचा समावेश आहे.श्वेता तिवारीची मुलगी पलक पदार्पणासाठी सज्ज#Surgicalstrike ची केली थट्टा


इतकेच नाही तर वीणाने भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची थट्टा करत कॅप्टन अभिनंदन यांना पकडल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे तिच्यावर अनेकांना टीका केली आहे. यात पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश आहे. ‘तुला भारताने प्रसिद्धी दिली पाकिस्तानने नाही’ या ट्विटलाही तिने उत्तर देत मला पाकिस्ताननेच प्रसिद्धी दिली असा दावा तिने केला आहे. आज अभिनंदन भारतात परतणार आहे. तिने त्यावरही आपले ट्विट करत भारतीयांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे.


हा पब्लिसिटी स्टंट नाही ना?


बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये देखील कायम चर्चेत राहण्यासाठी वीणा मलिक स्वत:च्या देशाच्या नियमांच्या विरोधात जाऊन अनेक गोष्टी केल्या होत्या.अभिनेत्री अमिषा पटेलचा भाऊ अश्मित पटेलसोबतचे तिचे ऑनस्क्रिन प्रेमसंबध पाकिस्तानलाही खटकले होते. पण तेव्हा तिने देशाची तमा बाळगली नाही. मग आताच तिला देशाचा पुळका इतका का यावा? असे प्रस्न केले जात आहे. त्यामुळे वीणाचा हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.  


(सौजन्य-Twitter)