कोरोना व्हायरसवर गायिका मालिनी अवस्थीचं हे गाणं तुम्हालाही देईल ऊर्जा

कोरोना व्हायरसवर गायिका मालिनी अवस्थीचं हे गाणं तुम्हालाही देईल ऊर्जा

कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण जगच जणू थांबलं आहे. कारण हा व्हायरस आपल्या सगळ्यांवरच वैश्विक संकट घेऊन आला आहे. भारतासोबतच जगभरात या व्हायरसशी मानवप्राणी लढा देत आहेत. या लढ्यात सगळेच एकमेकांची साथ देत आहेत. भारत सरकारसोबतच सेलिब्रिटी आणि सामान्य जनताही यात योगदान देत आहे. ज्याचा प्रत्यय रविवारी जनता कर्फ्यू आणि नादब्रम्हच्या निमित्ताने आला. याच दरम्यान कोरोनावरची अनेक गाणीही येत आहेत. तसंच एक गाणं आणलं आहे गायिका मालिनी अवस्थी हिने. पण या गाण्याची विशेष बाब म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी हे गाणं ट्वीट करून शेअर केल.

काय आहे नेमकं हे गाणं

भोजपुरी गायिका असलेल्या मालिनी अवस्थी यांनी कोरोनाचा लढा देण्याबाबतचं गाणं ट्वीटमध्ये शेअर केलं होते. मालिनी यांनी ट्वीटमध्ये लिहीलं होतं की, घाबरायचं नाही, हसायचं आहे, सर्वांनी मिळून आता हरवायचं आहे. ऐका आणि ऐकवा. जनता कर्फ्यूच्या निमित्ताने दिवसभर घरी असताना हे गाणं ऐका आणि सुरक्षित राहा.

पीएम मोदींनी शेअर केलं हे गाणं

मालिनी अवस्थी यांचं हे गाणं पीएम मोदी यांनीही शेअर केलं. त्यासोबतच लिहीलं की, जनता कर्फ्यूबाबत प्रत्येकजण त्यांना जमेल तसं योगदान देत आहे. लोकगायिका मालिनी अवस्थी यांच्या गाण्याने लोकांना नक्कीच प्रेरणा मिळत आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी लोकगायक प्रीतम भरतवाण यांचाही व्हिडिओ शेअर केला आणि लिहीलं की, जनता कर्फ्यूबाबत लोकगायक प्रीतम भरतवाण यांनी एक अनोखं आणि खूप सुरेल संदेश दिला आहे.

कोण आहे गायिका मालिनी अवस्थी

View this post on Instagram

Candid moment caught on camera ❤️

A post shared by Malini Awasthi (@maliniawasthi) on

लोकगायिका असलेल्या मालिनी अवस्थी या अवधी, भोजपुरी आणि बुंदेलखंडी भाषेत गाणी गातात. मालिनी यांनी 2015 साली आलेल्या आयुषमान खुराना आणि भूमि पेडणेकर यांचा चित्रपट दम लगाके हईशा मधील सुंदर सुशील हे गाणं गायलं होतं.

कोरोनावरील गाण्यांची लाट

कोरोनाशी लढ्या देण्याबाबतच ही वरील गाणी एकीकडे येत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाची खिल्ली उडवणारी विनोदी गाणीही व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरील कोरोनावरचं अजून एक व्हायरल होत असलेलं हे कोरोना साँग तुम्ही पाहिलं आहे का?

सुनो ना सुनो ना या बॉलीवूड गायक अभिजीतचं गाण्यावर तेजस गंभीर याने हे कोरोना साँग बनवलं आहे. जे गेल्या काही दिवसात खूपच व्हायरल झालंय. खुद्द गायक अभिजीतनेही या गाण्याची दखल घेतली. 

काहीही असो कोरोनाच्या काळात तुम्ही घरीच राहा आणि घरीच राहून स्वतःचं आणि कुटुंबाचं मनोरंजन करा. कारण त्यातच तुमचं आणि कुटुंबाचं भलं आहे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.