कोणाची झाली इतकी हिंमत की मारली प्रियांका चोप्राच्या थोबाडीत!

कोणाची झाली इतकी हिंमत की मारली प्रियांका चोप्राच्या थोबाडीत!

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशा लहानपणीच्या आठवणी असतात आणि काही गोष्टी असतात की, आपण मोठं झाल्यानंतर या गोष्टी आठवून खूपच हसतो. असं प्रत्येकाबरोबर होतं. आता तुम्हाला प्रियांकाचा याबाबत काय संबंध असा प्रश्न पडला असेल. तर नक्कीच आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूडवर सध्या राज्य करत असलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Jonas) च्या लहानपणीदेखील अशी काही घटना घडली होती की, आता ती आठवल्यावर तिला खूपच हसायला येतं. तिने याबाबत एकदा कपिल शर्मा शो मध्येही खुलासा केला होता. प्रियांका नुकतीच भारतात आली आहे. ती काम करत असलेल्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून त्याचीही पार्टीही करण्यात आली आणि या पार्टीला प्रियांका उपस्थित होती. तिच्या हसण्यावरून पुन्हा एकदा हा किस्सा व्हायरल होतो आहे.


Priyanka 1


नक्की काय घडलं होतं प्रियांकाबरोबर?


प्रियांका चोप्रा जेव्हा तिसऱ्या इयत्तेमध्ये होती तेव्हा लखनऊमध्ये तिच्या शाळेजवळ एक झाड होतं. जिथे बरीच माकडं येत होती. त्यावेळी प्रियांकाने झाडावर एका माकडीणीला आपलं अंग साफ करत असलेलं पाहिलं. ही गोष्ट तिला खूपच मजेशीर वाटली आणि ती त्या माकडीणीकडे वर बघून खूपच जोरजोरात हसायला लागली. पण तिचं हे हसणं त्या माकडीणीला आवडलं नाही आणि तिने झाडावरून भराभर खाली येऊन प्रियांंकाच्या थोबाडीत मारली आणि ती पुन्हा वर भरभर झाडावर निघून गेली. त्यावेळी प्रियांकाला नक्की काय झालं ते कळलंच नाही. त्यावेळी प्रियांका घाबरली होती पण आता हा किस्सा आठवला तरी तिला खूप हसायला येतं.


प्रियांकाचं जगभरात नाव


Priyanka FI %281%29


प्रियांका चोप्रा हे नाव आता संपूर्ण जगाला माहीत आहे. जगभरात टॉप अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्रियांका चोप्राने आपली एक ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाने सहा महिन्यापूर्वीच अमेरिकन अभिनेता आणि गायक निक जोनस याच्याबरोबर लग्न केलं असून हे लग्न खूपच गाजलं. निक प्रियांकापेक्षा 11 वर्षांनी लहान असल्यामुळे तिला या गोष्टीसाठी बऱ्याच लोकांकडून ट्रोलही करण्यात आलं. पण तितकंच तिच्या चाहत्यांनी तिला पाठिंबाही दिला. सध्या प्रियांका भारतात आली असून आता पुन्हा एकदा ती फरहान अख्तरबरोबर ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसणार आहे. या तिच्या चित्रपटासाठी तिचे चाहते आणि प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत. कारण या चित्रपटापूर्वी सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटातून ती कमबॅक करणार होती. पण काही कारणामुळे तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला. याची आजही सलमान खानला खंत आहे. त्याने ती वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे. मात्र प्रियांकाच्या लग्नाच्या रिसेप्शनला सलमान कोणतेही रूसवे फुगवे न ठेवता हजर होता. प्रियांका नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिच्या कान्स फेस्टिव्हलमधील लुकसाठीदेखील ती चर्चेत होती आणि तिच्या या लुक्सवर अनेक मीम्सही तयार करण्यात आले होते. पण या सगळ्यानंतरही प्रियांका आपल्या हेटर्सना आपल्या कामातून आणि इतर गोष्टींमधून कायमच उत्तर देत आली आहे. त्यामुळे आता या चित्रपटात नक्की प्रियांकाची काय भूमिका असणार आणि तिच्या ताकदीचा हा चित्रपट असेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


प्रियांका आणि निकचा मेट गाला (Met Gala 2019) कार्पेटवर पुन्हा एकदा जलवा
प्रियांका चोप्राचा फिटनेस, डाएट आणि ब्युटी मंत्रा जाणून घ्या


प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल