प्रियांकाचा पायगुण, नीक जोनासला मिळाली खुशखबर

प्रियांकाचा पायगुण, नीक जोनासला मिळाली खुशखबर

प्रियांका नीक जोनास झाल्यापासून नीकच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. त्यातल्या एक बदल जोनास ब्रदर्समध्ये आनंद आणणारा आहे. कारण बिलबोर्डवर जोनास ब्रदर्स पहिल्या क्रमांकावर आले आहे. Sucker हे त्यांचं गाणं काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालं आणि ते गाणं सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा नीक आणि प्रियांक स्क्रिनवर एकत्र दिसले. शिवाय वेगळे झालेले जोनास ब्रदर्स या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. त्यामुळे प्रियांकाचा पायगुण जोनास कुटुंबियांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला असे म्हणायला हवे.


billboard


जोनासब्रदर्सनी शेअर केले फोटो


केविन, नीक, जो या तिघांनीही हा आनंद त्यांच्या फॅनसोबत इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. त्यांनी billboard ची पोस्ट शेअर केली आहे. नीकने आणखी एक फोटो शेअर करत आज एकदम छान झोप लागेल अशा आशयाचा मेसेज लिहून त्याचा फोटो शेअर केला आहे. शिवाय या तिघांनी हातात कमबॅकचा एक फ्लेक्सदेखील हातात पकडला आहे.


jonas brothers 


जोनासच्या घरातील या व्यक्तिला आवडत नाही प्रियांका


जोनासब्रदर्सचे कमबॅक जोरदार


काहीकारणास्तव जोनासब्रदर्स वेगळे झाले होते. त्यांनी एकटे राहूनही चांगले यश मिळवले. नीकची अनेक गाणी चांगली चालली. २००८ साली नीक जोनासचा बर्निंग अप हा अल्बम आला होता. बिलबोर्डवर तो ५ व्या क्रमांकापर्यंत पोहचला होता. पण या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोनासब्रदर्स एकत्र आले आणि त्यांनी बिलबोर्डवर त्यांच्या sucker गाण्याची अशी मोहिनी घातली की, ते गाणं ९९ गाण्यांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचले. नीकची गाणी या आधीही अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचे Right now नावाचे गाणे आले होते. एक नक्की की हे तिघे एकत्र आले तर बिलबोर्डवर हे तिघे राज्य करु शकतील. कारण त्याचे sucker हे गाणे सगळ्याच माध्यमांवर चालत आहे.


jonas brothers 1


प्रियांका-नीक एकत्र


नीक जोनाससोबत प्रियांकाच्या अफेअर्सच्या चर्चा रंगत असताना त्यांची ओळख कशी? असा प्रश्न आपसुकच अनेकांना पडतो. कारण नीकसोबत प्रियांकाने कधीच काम केले नव्हते. पण या गाण्याच्या निमित्ताने त्या दोघांनीही पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली आहे. त्या दोघांचा पहिला एकत्र व्हिडिओ पाहून प्रियांकाच्या फॅन्सनाही आनंद झाला.


priyanka hot


'अंदाधुंद' प्रदर्शित होणार चीनमध्ये


Proud of you husband प्रियांकाची पोस्ट


प्रियांकाने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन या गाण्याची छोटीशी झलक शेअर करत proud of you husband अशी पोस्ट लिहिली होती. त्या आधी तिने suckerचे पोस्टर शेअर केले होते. शिवाय ती स्वत:या व्हिडिओमध्ये असल्यामुळे तिने तिचा बाथ टबमधील एक फोटो शेअर करत jonas brothers are back असे म्हटले होते.

कमोलिकाला रिप्लेस करणार ही अभिनेत्री


हा तर प्रियांकाचा पायगुण


नीक आणि प्रियांका कधी एकत्र येतील . त्यांचे लग्न होईल असे कोणालाच कधी वाटले नसेल. पण प्रियांकाचे नीकच्या आयुष्यात येणे हे नीकसाठी लकी ठरल्याचे म्हटले जात आहे. प्रियांकाच्या लग्नावेळीही नीकचे संपूर्ण कुटुंब दिसले होते. आता प्रियांकाच्या येण्याने हे कुटुंब एकत्र आले. शिवाय जोनासब्रदर्स एकत्र आले असेच म्हणावे लागेल.


(फोटो सौजन्य- Instagram)