आयुषमान खुरानाचा ‘अंधाधून’ आता चीनमध्ये होणार प्रदर्शित

आयुषमान खुरानाचा ‘अंधाधून’ आता चीनमध्ये होणार प्रदर्शित

अभिनेता आयुषमान खुराना सध्या लोकप्रियतेचं शिखर गाठत आहे. त्याच्या अभिनयला चाहत्यांची चांगलीच दाद मिळत आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेले त्याचे 'अंधाधून' आणि 'बधाई' हो हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. 'अंधाधून' या चित्रपटाने तर बॉक्सऑफिसवर 74 कोटींच्यावर कमाई केली. लो बजेट चित्रपट असूनही प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलीच पंसती दिली होती. आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. व्हायाकॉम 18 ने ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नाव पियानो प्लेअर असं असणार आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा आयुषमान खुरानाचा हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याच्यासाठी ही बातमी खूपच खास असणार आहे.


चीनमध्ये आयुषमानच्या अंधाधूनच्या रहस्यपटाचा पुन्हा थरार


'अंधाधून' चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन याने केलं होतं. हा चित्रपट एक रहस्यमय चित्रपट असल्याने या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळाली होती. शिवाय या चित्रपटातील सस्पेंस शेवटपर्यत ठेवण्यात दिग्दर्शकांना चांगलंच यशही मिळालं होतं. या चित्रपटात आयुषमान खुरानासह तब्बू, राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपट


आयुषमान खुराना अंधाधून आणि बधाई हो या चित्रपटानंतर एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याच्या आगामी चित्रपट आर्टिकल 15 मध्ये तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लखनऊमध्ये सुरू असून आयुषमान पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याची भूमिका यात करणार आहे. यासोबतच ड्रिम गर्ल चित्रपटामध्येही त्याची प्रमुख भूमिका असणार आहे
 

 

 


View this post on Instagram


 

 

#Article15 #firstlook shoot begins with @anubhavsinhaa sir.


A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on
चीनमध्ये भारतीय चित्रपटांना मिळतेय पसंती


चीनमध्ये भारतीय चित्रपटांना चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. यापूर्वी हिचकी, बजरंगी भाईजान, हिंदी मिडीयम हे चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले आहेत. अंधाधूनसोबत अभिनेत्री श्रीदेवींचा 'मॉम' चित्रपटदेखील चीनमध्ये प्रदर्शित होत  आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांना चीनमध्ये कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


शिवगामी दिसणार ‘अॅडल्ट’ चित्रपटात, पाहा चित्रपटाचा ट्रेलर


आगामी चित्रपटासाठी दीपिकाची दुहेरी कसरत


डॉन 3 च्या चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम