रिंकू राजगुरूने केलं 20 किलो वजन कमी, केला डाएट प्लॅन शेअर

रिंकू राजगुरूने केलं 20 किलो वजन कमी, केला डाएट प्लॅन शेअर

रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हे नाव आता नक्कीच मराठी माणसाला नवं नाही. ‘सैराट’ चित्रपटातील रिंकूने केलेल्या आर्चीच्या भूमिकेने तिला एक वेगळंच नाव मिळवून दिलं. आता रिंकूचा ‘मेकअप’ (Makeup) नावाचा चित्रपट येत आहे. सैराटच्या वेळी रिंकू अतिशय लहान होती. पण आता रिंकूने बऱ्यापैकी मोठी झाली आहे. ती या क्षेत्रात आणि मराठीसृष्टीतही बऱ्यापैकी स्थिरावली आहे. सैराटनंतर तिचं वजन बरंच वाढलं होतं. पण आता चित्रपटात काम करायचं म्हणजे स्वतःला मेंनटेन ठेवणं किती गरजेचं आहे हे सर्वांनाच माहीत आहे. रिंकूलाही ते कळलं आणि तिने स्वतःचं वजन तब्बल 20 किलो कमी केलं आहे. हे वजन नक्की रिंकूने कसं कमी केलं असेल हे आपल्यालाही नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. तर रिंकूने एका मुलाखतीमध्ये याचं रहस्य शेअर केलं आहे. वजन कमी करणं हे खरं तर आजकाल खूपच कठीण वाटतं. पण रिंकूने हे करून दाखवलं आहे आणि आपल्या चाहत्यांबरोबर आपल्या फिटनेसचं रहस्यही शेअर केलं आहे. 

सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवशी 'शेरशाह'चा फर्स्ट लुक रिलीज

रिंंकूच्या फिटनेसचं काय आहे रहस्य?

View this post on Instagram

अय काय बघतोय😂

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकूचं वजन सैराट चित्रपटानंतर खूपच वाढलं होतं. तिला वजन कसं कमी केलं असा प्रश्न एका ठिकाणी विचारण्यात आला. त्यावर रिंकूने आपल्या फिटनेसची जर्नी सांगितली. सैराट संपल्यानंतर रिंकूच्या लक्षात आलं की, आपण खूपच जाड झालो आहोत. तेव्हा रिंकू दहावीची परीक्षा देत होती. पण आरोग्यासाठी इतकं जाडपणा चांगला नाही हे रिंकूच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने वजन कमी करायचं ठरवलं. तिने रोज पहाटे 4 ला उठून व्यायाम करायचं ठरवलं आणि त्यानंतर ती वॉर्मअप करू लागली. तसंच आपल्या डाएटिंगकडेही तिने विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली. रिंकू सकाळ आणि संध्याकाळी डाएट फॉलो करते. ती जास्त भर हा सलाडवर देते असं तिने सांगितलं. त्याचप्रमाणे तिला गोड आवडतं पण वजन कमी करण्यासाठी तिने गोड खाणंही सोडून दिलं. घरात गुलाबजाम अथवा तिच्या आवडीचे कोणतेही गोड पदार्थ जरी बनत असतील तरी तिने त्याकडे पाठ फिरवली आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवत 20 किलो वजन कमी केलं. तसंच आपण कोणताही ट्रेनर ठेवला नाही. तर या सगळ्यात ट्रेनर आणि डाएटिशियन म्हणून दोन्ही काम आपल्या आईनेच पाहिल्याचं रिंकूने सांगितलं आहे. तिच्या आईनेच तिच्या खाण्यापिण्याची आणि तिच्या व्यायामाची काळजी घेतली. रिंकूला प्रत्येक गोष्टीत आईने मदत केल्याचं तिने सांगितलं आहे. या सगळ्याचा फायदा केवळ दोन महिन्यात तिने तब्बल वीस किलो वजन घटवण्यात झाल्याचंही तिने सांगितलं. तसंच तिने स्ट्रिक्ट डाएट फॉलो केल्यानेच आज ती स्वतःच्या  आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत असल्याचंही तिने नमूद केलं आहे. 

रिंकू राजगुरूचा झाला साखरपुडा, निळ्या साडीत खुललं आर्चीचं सौंदर्य

रिंकू ‘कागर’ नंतर ‘मेकअप’मध्ये

View this post on Instagram

Makeup. @chinmayudgirkar .#poster2.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकूचा सैराट प्रचंड गाजला. तसाच तिचा शुभंकर तावडेबरोबर कागर नावाचा चित्रपट मागच्या वर्षी येऊन गेला. त्यावेळीदेखील ती बारावीच्या परीक्षेत व्यस्त होती. पण आता तिचा तिसरा चित्रपट चिन्मय उदगीरकरसह ‘मेकअप’ येत आहे. यामध्ये रिंकू एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. तिने याआधी केलेल्या दोन्ही भूमिका बऱ्याच अंशी गंभीर होत्या. पण या चित्रपटातील तिची भूमिका एका अल्लड मुलीची असल्याचं चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. तसंच चिन्मयबरोबर तिची जोडीही छान वाटत आहे. प्रेक्षकांनी या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे तिचे चाहते आणि समीक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रिंकूचा हा तिसरा चित्रपट असला तरीही आता रिंकू मराठी चित्रपटसृष्टीत चांगलीच सरसावली आहे असंही वाटत आहे. 

टॅक्सीतला तो अनुभव आठवला की, सोनमच्या अंगावर येतो काटा

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.