भारतातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो बिग बॉसच्या 14 व्या पर्वाबाबत चाहत्यांना नक्कीच उत्सुकता आहे. #BiggBoss14 ची यंदाची थीम आणि फॉरमॅट कसा असेल याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कोरोना व्हायरसमुळे गेले काही महिने जनजीवन विस्कळीत झालं होतं. लॉकडाऊनचा प्रभाव सर्वसामान्यांप्रमाणेच मनोरंजन विश्वावरही पडला. त्यामुळे यंदा बिगबॉसच्या थीममध्येही लॉकडाऊनचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शोमच्या फॉरमॅट आणि नियमांमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. या शोचे निर्माते सध्या अशा फॉरमॅटची निर्मिती करण्याचा विचार करत आहेत ज्यामध्ये यंदाच्या लॉकडाऊनचा प्रभाव दिसून येईल. देशावर कोरोनामुळे झालेला प्रभाव या शोमध्ये हायलाईट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे सहाजिकच या शोचे नियमदेखील आता पूर्वीसारखे असणार नाहीत.
शोमध्ये असणार नवा ट्विस्ट
बिग बॉस 14 चे पर्व लॉकडाऊन स्पेशल असण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे या शोचे नियमदेखील आता बदलण्यात येणार आहेत. मागच्या पर्वापर्यंत या शोमध्ये स्पर्धकांनी घराबाहेरील लोकांशी संपर्क ठेवणे आणि फोनवरून बोलणे याला मान्यता नव्हती. मात्र यंदाच्या लॉकडाऊन स्पेशलमध्ये स्पर्धकांना फोनवरून घराबाहेरील लोकांशी बोलण्याची परवानगी देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे. ज्यामुळे या शोमध्ये आता एक नवा ट्विस्ट दिसून येणार आहे.
मोबाईल नेण्यासाठी मिळणार परवानगी
बिग बॉस 14 मध्ये जे स्पर्धक यंदा सहभागी होतील ते त्यांच्यासोबत त्यांचा मोबाईल फोनदेखील स्वतःसोबत घेऊन जातील. आतापर्यंत या स्पर्धकांचे मोबाईल त्यांना जवळ बाळगण्यास मनाई होती. मात्र नव्या पर्वातील या नव्या बदलामुळे या शोबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. एवढंच नाही तर या स्पर्धकांना मोबाईल फोनप्रमाणेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स स्वतःजवळ बाळगण्याची परवानगी असण्याची शक्यता असणार आहे. ज्यामुळे हे स्पर्धक त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत व्हिडिओ कॉल अथा मेसेज द्वारे संपर्क साधू शकतात. मात्र अजूनही शोच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण जर ही बातमी खरी ठरली तर यंदाचे पर्व ऐतिहासिक पर्व ठरेल यात शंका नाही. कारण यापूर्वीच्या पर्वांपेक्षा हे पर्व नक्कीच वेगळे असेल. बिग बॉसचे पर्व नेमके कधी सुरू होणार याबद्दल कोणताही खुलासा झालेला नसला तरी ते लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पर्व यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय या शोमध्ये एकूण सोळा स्पर्धक भाग घेतील. मात्र शो सुरू होण्यापूर्वी या सर्व स्पर्धकांची कोरोना चाचणी घेतली जाईल. त्यानंतरच त्यांना शोमध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल. याचप्रमाणे बिग बॉस आणि सलमान खान हे गेल्या कित्येक पर्वाचं अजब समीकरण आहे. बिग बॉसच्या विकेंड एपिसोड सलमान आणि त्याची स्पर्धंकांसोबत होणारी मौजमस्ती पाहण्यासाठी लोकप्रिय आहेत. ज्यामुळे बिग बॉसचे कोणतेतही पर्व सलमान खानशिवाय अपूर्णच असं म्हटलं जातं. यंदाच्या पर्वात सलमान असणार का आणि या पर्वात नेमकी काय धमाल असणार हे पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
KKK10: मराठमोळा धर्मेश ठरला पहिला फायनलिस्ट, तर तेजस्वी करतेय कमाल
इशा गुप्ताचे हॉट फोटोशूट, तूप खाऊन मेंटेन केली फिगर
अभिनेता कार्तिक आयर्नने केला एक मोठा खुलासा, लवकरच करणार लग्न