ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
तेरे नामचा ‘राधे’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

तेरे नामचा ‘राधे’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘तेरे नाम’ या चित्रपटाने  एकेकाळी तरूणाईला अक्षरशः वेड लावले होते. 2003 साली म्हणजेच जवळजवळ सोळा वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिस गाजवलेल्या ‘तेरे नाम’ चित्रपटाचा आता सिक्वल येणार आहे. दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी ‘तेरे नाम 2’ पुन्हा तयार करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे बॉलीवूडचा भाईजान आता पुन्हा तेरे नाम मधील राधे साकारणार असल्याची शक्यता आहे. तेरे नाममध्ये सलमान खानच्या हेअरस्टाईलने एके काळी तरुणांवर भूरळच घातली होती. अनेकांनी त्यावेळी सलमान खानसारखी हेअर स्टाईल केली होती. शिवाय या चित्रपटात सलमानखानने साकारलेला राधेदेखील अनेकांच्या आजही स्मरणात आहे. 

tere naam new 111

काय असेल ‘तेरे नाम 2’ मध्ये  

‘तेरे नाम 2’ देखील एक  प्रेमकथाच असणार आहे मात्र त्यातील कथानक पहिल्या चित्रपटापेक्षा नक्कीच वेगळं असणार आहे. ‘तेरे नाम 2’ हा चित्रपट उत्तर भारतातील गॅंगस्टर्सच्या जीवनावर आधारित असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यी चित्रपटातील मुख्य भूमिका सलमान खान साकारणार का? हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. सतीश कौशिक आणि सलमान खान यांची चांगली मैत्री आहे. ते दोघंही भारत चित्रपटात एकत्र काम करत आहेत. त्यामुळे कदाचित सलमान पुन्हा तेरे नाममध्ये दिसण्याची शक्यता आहे. मात्र सलमानने नकार दिल्यास एखाद्या नव्या कलाकारालादेखील चित्रपटात संधी दिली जाऊ शकते. सध्या तरी सलमान खान ‘दबंग 3’ च्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे अजून तरी याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

tere naam new

ADVERTISEMENT

तेरे नाम 2003 मधील हिट चित्रपट

तेरे नाम हा चित्रपट 2003 सूपरहिट झाला होता. या चित्रपटाची कथा बाळा आणि जितेंद्र जैन यांनी लिहीली होती. तर या चित्रपटाचे  दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते. तेरे नाममधून अभिनेत्री भूमिका चावला हिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. शिवाय या चित्रपटातील लगन लगी, क्यो किसी को, ओढणी, तुमसे मिलना अशी अनेक हिट गाणी त्या काळी फार गाजली होती. सलमान खानला त्याच्या करियरमधील एक सुपरहिट चित्रपट यामुळे मिळाला होता. नेहमीपेक्षा वेगळी आणि हटके भूमिका यात सलमानने साकारली होती. या भूमिकेचा प्रभाव त्याच्या चाहत्यांवर इतका पडला होता की चित्रपटातील सलमान खान प्रमाणे हेअर स्टाईल करून गल्ली बोळातील मुले आपण स्वतःच राधे असल्यासारखी वागत होती. तेरे नाम चित्रपटातील क्लायमेक्स पाहताना अनेक तरूणींचे ह्रदय धडधडले होते. अशा या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वलदेखील तितकाच दमदार असेल अशी प्रेक्षकांना आशा आहे. 

tere naam new 222

सलमानच्या भारतचं ट्रेलर प्रदर्शित

सध्या सलमान खानच्या ‘भारत’ची चर्चा सर्वत्र सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतचं टिझर रिलीज झालं होतं नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रदर्शित झाला आहे. सलमानची दमदार एंट्री आणि जबरदस्त डायलॉगमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता निर्माण झाली आहे. भारत जूनमध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. सलमान खानच्या यामध्ये वीस वर्षापासून साठ वर्षांपर्यंतच्या पाच विविध भूमिका असणार आहेत. भारतनंतर तो तो आलिया भट सोबत ‘इन्शाअल्ल्हा’ या चित्रपटातदेखील असणार आहे. त्यामुळे सलमानखानला या विविध भूमिकांमध्ये पाहण्यासाठी  त्याचे  चाहते नक्कीच उत्सूक आहेत.

FI  Bharat new look

ADVERTISEMENT

मुलगी निसाच्या बॉलीवूड डेब्यूवर काजोलचा खुलासा

‘देश लोगोसे बनता है, तुझमे पुरा है देश है भारत’ आला *भारतचा ट्रेलर

‘भारत’मधील सलमान खानचा हटके लुक

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT
23 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT