अभिनेत्री समीरा रेड्डीकडे पुन्हा 'गुड न्यूज'

अभिनेत्री समीरा रेड्डीकडे पुन्हा 'गुड न्यूज'

अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींच्या घरी नवीन पाहुण्यांच्या येण्याने आनंदी वातावरण  आहे. सीरियल क्वीन एकता कपूरदेखील सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. त्यासोबतच बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी पुन्हा आई होणार आहे. नुकतंच लॅक्मे फॅशन वीक मध्ये समीरा रेड्डीने बेबी बम्पसह कॅमेरा पोज दिल्या. प्रेगन्सीनंतर पहिल्यांदाच ती एखाद्या सोशल इव्हेंटमध्ये दिसली. या इव्हेंटमध्ये समीराने ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं मीडियासमोर उघड केलं. समीराला चौथा महिना सुरू असून जुलैमध्ये तिच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. प्रेगन्सीमुळे आलेल्या ग्लोमुळे समीरा खूपच सुंदर दिसत होती.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#sameerareddy is pregnant for the second time but this is the first time she steps out


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
समीरा रेड्डी आणि उद्योगपती अक्षय वर्देच्या घरी नवा पाहुणा येणार


समीरा रेड्डी आणि अक्षय वर्दे  21 जानेवारी 2014 मध्ये विवाहबद्ध झाले होते. अक्षय वर्दे एक उद्योजक असून वेर्देची या सुपरबाईक्स कंपनीचा मालक आहे. समीराला बाईक्स फार आवडतात म्हणून अक्षय त्यांच्या लग्नात घोड्यावर स्वार न होता बाईकवरुन लग्नमंडपात आला होता. समीर आणि अक्षयने 25 मे 2015 मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. समीर आणि अक्षयला एक गोंडस मुलगा आहे. समीराच्या पहिल्या मुलाला नुकतीच तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. आता समीराकडे पुन्हा गुड न्यूज असल्याने ती आणि अक्षय दोघंही फारच खूश आहेत. त्या दोघांनाही 2019 मध्ये त्यांचं दुसरं बाळ हवं होतं. जुलैमध्ये त्याचं दुसरं बाळ जन्माला येणार आहे. समीराचं विजय माल्यासोबत अगदी जवळचं नातं आहे. समीराचं कन्यादान विजय माल्यांनी केलं होतं. समीरा विजय माल्याना अंकल म्हणते. शिवाय माल्यांच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमात समीरा आवर्जुन हजेरी लावते.


sameeraसमीराला बॉलीवूड पेक्षा टॉलीवूडमध्ये मिळालं यश


समीराने आतापर्यंत अनेक हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमधून काम केलं आहे. 2002 मध्ये 'मैने दिल तुझको दिया' या हिंदी चित्रपटातून अभिनयाला सुरूवात केली. त्याआधी तिने पंकज उदास यांच्या 'और आहिस्ता किजे बाते' या म्युजिक अल्बममध्ये काम केलं होतं. समीराने अनेक आयटम सॉंगमध्येदेखील केले आहेत. लग्नानंतर मात्र समीरा चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. अनेक वर्षांनी समीरा पुन्हा लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली. ती आता दुसऱ्यांदा आई होणार असल्याने तिच्या जीवनात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.


sameera reddy 1


 


'या' बॉलीवूड अभिनेत्रीकडे पुन्हा एकदा गुड न्यूज


2018 मध्ये 'या' मराठी कलाकारांच्या घरी झाले चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम