सुहाना खान या चित्रपटातून करतेय डेब्यू

सुहाना खान या चित्रपटातून करतेय डेब्यू

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे अशी चर्चा सुरू आहे. शाहरूख खानचे चाहते सुहानाला चित्रपटात पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. त्यातच तिने काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत अॅक्टिंगसाठी  अॅडमिशन घेतल्यामुळे सुहाना चित्रपटात काम करणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अभिनयाच्या प्रशिक्षणासोबतच सुहानाला अभिनयातील विविध कौशल्य साध्य करायची आहेत. ज्याची एक झलक सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 

सुहानाची पहिली शॉर्ट फिल्म

सुहानाच्या ‘दी ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या एका शॉर्ट फिल्मचा टीझर सोशल मीडियावर शेअर झाला आहे.  51 सेंकदच्या या टीझरमध्ये कोणताही संवाद ऐकू येत नाही आहे. मात्र यातून सुहानाच्या अभिनयाची झलक नक्कीच पाहायला मिळत आहे. थियो जिमेनो नावाच्या व्यक्तीने हा टीझर शेअर केला आहे. शिवाय यासोबत त्याने लिहीलं आहे की, “मी माझी शॉर्ट फिल्म 'दी ग्रे पार्ट ऑफ ब्लू' मधील काही चलचित्रे तुमच्यासोबत पहिल्यांदाच शेअर करत आहे. ही फिल्म लवकरच प्रदर्शित करण्यात येईल मला त्याची नक्की तारिख आता माहीत नाही. तेव्हा संपर्कात राहा ज्यामुळे तुम्हाला ही फिल्म पाहता येईल.  मागच्या वर्षी तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनासाठी खूप मनापासून धन्यवाद, ही शॉर्टफिल्म पाहण्याआधी तुमच्यासाठी त्याचा टीझर शेअर करत आहे.”

View this post on Instagram

New York Times ..☕️

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

सुहानाला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक

बॉलीवूडच्या किंग खानची मुलगी असल्यामुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या ग्लॅमरस लुकपासून फॅशन ट्रेंडपर्यंत सर्वच गोष्टी तिच्या चाहत्यांना आवडतात. ज्यामुळे ती स्टार किड असतानाच एखाद्या ‘सुपरस्टार’प्रमाणे वावरत असते. नुकतंच सुहाना खानने तिचं ग्रॅज्युऐशन पूर्ण केलं आहे. ज्यामुळे ती लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार अशी चर्चांना अक्षरशः उधाण आलं आहे. किंग खानची मुलगी असल्यामुळे तिला चित्रपट मिळणं मुळीच कठीण नाही. मात्र सुहानाला आधी अभिनयाचं रितसर प्रशिक्षण घ्यायचं  आहे. यासाठीच तिने न्यूयार्क युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. ही शॉर्ट फिल्म या प्रशिक्षणाचा एक भाग आहे. 

View this post on Instagram

🖤

A post shared by Suhana Khan (@suhanakhanoffcial) on

सुहाना घेतेय आता अभिनयाचं प्रशिक्षण

सुहानाने तिचं ग्रॅजुऐशन लंडनमध्ये पूर्ण केलं आहे. जेव्हा सुहानाने तिचं शिक्षण पूर्ण केलं तो क्षण शाहरूख आणि गौरीला अतिशय आनंद झाला होता. शाहरूखने याबाबत स्वतः आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. शाहरूखने तेव्हा सुहानाचा आणि स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यासोबत त्याने शेअर केलं होतं की, चार वर्षे पूर्ण झाली आहे. ऑर्डिगर्ली आता ग्रॅज्यूएट झाली आहे. शेवटचा पिझ्झा आणि शेवटची ट्रेन, खऱ्या जीवनातील पहिलं पाऊल. शाळा संपली आता अभ्यास करावा लागणार नाही.” ज्यावरून मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर पालकांना होणारा आनंद दिसून येत होता. आता सुहाना तिच्या अभिनय क्षेत्रातील बेसिक शिक्षण पूर्ण करण्याच्या प्रथम पायरीवर आहे त्यामुळे सहाजिकच शाहरूख आणि गौरीच्या आनंदाला पारावार राहीला नसणार. शाहरूखने एका मुलाखतीत सांगितलं होतं की सुहानाला अभिनयाची आवड आहे मात्र तिला आधी त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. मगच ती या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सक्षम होऊ शकते. आता सुहानाने त्या दिशेने तिचं पहिलं पाऊल उचललं आहे. ज्यामुळे शाहरूखच्या चाहत्यांना खऱ्या अर्थाने आनंद झाला आहे. शिवाय यामुळे लवकरच सुहानाला चित्रपटात पाहण्याचं स्वप्न पूर्ण होईल हे नक्की झालंय.

फोटोसौजन्य - इन्साग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा - 

अजिंक्य ननावरेचं ‘स्टाईल स्टेटमेंट’

बॉलीवूड अभिनेत्री रायमा सेन करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

फूड डिलीव्हरी करणारा विशाल ठरला 'डान्स दिवाने 2' चा विजेता