‘अग्गंबाई सासूबाई’मधील ‘आई’चा व्हायरल व्हिडिओ स्मृती ईराणींनीही केला शेअर

‘अग्गंबाई सासूबाई’मधील ‘आई’चा व्हायरल व्हिडिओ स्मृती ईराणींनीही केला शेअर

मालिका हा प्रत्येक घरातील अविभाज्य भाग आहे. पण यातील काही मालिका प्रत्येकाच्या मनात वेगळं घर करतात. त्यापैकीच सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’. यामध्ये सासू आणि सूनेचं एक अनोखं नातं दाखवण्यात आलंं आहे. निवेदिता सराफ आणि तेजश्री प्रधान या दोघींनी साकारलेली ही भूमिका सध्या प्रेक्षक डोक्यावर अक्षरशः उचलून धरत आहेत. आपण आईला नेहमीच गृहीत धरत असतो. रागाच्या भरात असो अथवा मस्करीत असो कधीतरी आपणही आईला म्हणतोच की, ‘तू नक्की काय काम करतेस?’ पण  विचार केल्यावर कळतं की, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अव्याहत काम करणारी ही आईच असते. याच स्वरूपाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये तेजश्री प्रधानने म्हटलेलं संवाद इतके उत्कृष्ट आहेत की, एकेकाळी छोटा पडदा गाजवलेली ‘तुलसी’ अर्थात स्मृती ईराणीदेखील हा व्हिडिओ शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकल्या नाहीत. 

जेव्हा दीपिका पदुकोण विसरली की, तिचं लग्न झालंय

आईने केलेल्या बलिदानाची आठवण

या व्हिडिओमध्ये आईने केलेल्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देण्यात आली आहे. आईला आपण किती गृहीत धरतो आणि आपण तिलाच कसा वेळ देत नाही हे सर्व यातून सांगण्यात आलं आहे. खरं तर आईच असते जी आपल्यासाठी सर्वात जास्त झटत असते आणि तिलाच आपण बरेचदा कळत नकळत दुखावत असतो. यामध्ये सासू सुनेचं एक वेगळं नातं दर्शवण्यात आलं असून हा व्हिडिओ सध्या खूपच गाजत आहे. हा भाग पाहिल्यानंतर स्मृती ईराणी यांना आपल्या मालिकेतील भूमिकेची आठवण आली. तसंच जगात आई या शब्दासाठी कितीही वेगवेगळ्या भाषेत शब्द असले तरीही भावना मात्र एकच असतात असं म्हणत स्मृती ईराणी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. स्मृती ईराणी यांनीदेखील एका आदर्श सुनेची भूमिका साकारली होती. हा व्हिडिओ पाहून त्यांना आपल्या कामाची आठवण आली आणि भावूक होऊन त्यानी हा व्हिडिओ शेअर केला. स्मृती ईराणी यांचीही मालिका खूप गाजली होती आणि त्यांनी तुलसी ही भूमिका कायमची प्रेक्षकांच्या मनात कोरली आहे. त्याच भूमिकेची स्मृती यांना आठवण येऊन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

नच बलिये 9 शोदरम्यान पूजा बॅनर्जीला दुखापत

सासूला समजून घेणारी सून

‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या गाजत आहे ती त्यातील कथेमुळे. नेहमीच मालिकांमध्ये सासू आणि सुनेचं नातं हे टोकाचं दाखवलं जातं. पण खऱ्या आयुष्यात नक्कीच सासूला समजून घेणाऱ्या सुनाही असतात. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारचं. पण प्रत्येक घरात भांडण असतंच असं नाही. या मालिकेत आपल्या सासूला जपणारी, तिचं मन समजून घेणारी सून दाखवली आहे. जी सध्या सर्व प्रेक्षकांना आवडत आहे. तसंच सतत भांडण आणि कुरघोड्या बघण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं पाहणं हे प्रेक्षकांना अधिक भावत आहे. त्यामुळे ही मालिका सध्या गाजत आहे.  त्यातही सासूला समजून घेणारी आणि समंजस सून दाखवल्याने प्रेक्षकांना ही मालिका आवडत आहे. यामध्ये निवेदिता सराफ आणि तेजश्री प्रधान या दोघींनीही अप्रतिम काम केलं असून गिरीश ओकचीही प्रमुख भूमिका आहे. 

लवकरच राखी सावंत करुन देणार पती रितेशची ओळख

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.