मागच्याच रविवारी एका संगीत वाहिनीवरील कार्यक्रमात झळकलेला सोनू निगमच्या चाहत्यांना धक्का बसला, जेव्हा त्यांनी सोनूची इन्स्टाग्राम पोस्ट पाहिली. बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने संगीत वाहिनीवरील गाण्याच्या कार्यक्रमानंतर काहीतरी खाल्लं आणि त्याला फूड एलर्जी झाली. ज्यामुळे त्याचा डोळा सूजला आणि परिस्थिती इतकी बिघडली की, त्याला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं. सोनूने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोसकट ही पोस्ट शेअर केली.
बॉलीवूड गायक सोनू निगम सध्या एका वेगळ्याच एलर्जीचा सामना करत आहे. गंभार स्कीन एलर्जीमुळे त्याला नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सोनूला तब्बल 48 तास आईसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. एलर्जीबाबत सांगताना सोनूने वरील फोटो शेअर केले.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोत सोनूचा आयसीयूमधला फोटो आहे तर दुसऱ्या फोटोत त्याचा पूर्ण डोळा सूजलेला दिसतोय. या पोस्टमध्ये सोनूने लिहीलं आहे की, ‘तुम्हा सगळ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार. या घटनेतून शिकवण मिळाली की, जर तुम्हाला एखादी एलर्जी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. माझ्या केसमध्ये मला सी फूडमुळे एलर्जी झाली. जर वेळेवर मी हॉस्पिटलला गेलो नसतो तर परिस्थिती अजून बिघडली असती. माझ्या श्वासनलिकेलाही सूज आली असती आणि मला श्वास घ्यायला त्रास झाला असता.’
View this post on Instagram
आता मात्र त्याच्या तब्येतीत सुधारणा आहे. एवढंच नाहीतर बरं झाल्यावर सोनू निगम लगेचच त्याच्या पुढच्या म्युझिक कॉन्सर्टसाठी ओडिशाला रवानाही झाला.
सोनू निगम हा भारतीय संगीत कलाकारांमधील सर्वात सुरेल आणि टॅलेंटेड गायकांपैकी एक आहे. फक्त देशातच नाहीतर विदेशातही त्याला लोक दैवतासमान मानतात. काही काळापासून सोनू निगम बॉलीवूडपासून थोडा दूर आहे पण तरीही त्याच्या लोकप्रियतेत फरक पडला नाही.
फोटो सौजन्य : Instagram
हेही वाचा
अंबानींच्या घरात पुन्हा लगीनघाई, आकाश चढणार बोहल्यावर
पालक आणि मुलांमधील हरवत चाललेल्या नात्याला हवी 'सुसंवादाची गरज'