‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने सोनू निगमने पहिल्यांदा गायली सर्व गाणी

‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने सोनू निगमने पहिल्यांदा गायली सर्व गाणी

सोनू निगम हे नाव कोणाहीसाठी नवं नाही. सोनू निगमने आपल्या आवाजानं सगळ्यांच्याच मनात हक्काचं घर केलं आहे. गेली कित्येक वर्ष सोनू निगमची गाणी संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावत आहेत. अमराठी गायक मराठी गाणी तितक्याच ठसक्यात कसा गाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोनू निगम. आतापर्यंत सोनू निगमने गायलेली सदाबहार गाणी तरुणाईलाहीदेखील भुरळ पाडते. असा गोड आवाज असलेला आणि तितकाच दिसायला ही गोड असणा-या सोनू निगमने पहिल्यांदाच मराठी सिनेमातील सर्व गाणी गायली आहेत. ही सर्व गाणी एका पेक्षा एक हटके आणि रोमँटिक आहेत. सोनूचा आवाज किती गोड आणि रोमँटिक आहे हे आपण अनेक गाण्यांतून अनुभवलंय पण जर ‘आशिकी’ सारख्या विषयावर आधारित सर्वच गाणी सोनू गाणार म्हणजे तरुण मंडळी पुन्हा एकदा सोनूवर फिदा होणार हे नक्की. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अशी ही आशिकी’मधील सर्व मराठी गाणी सोनू निगमने गायली असून चित्रपटातील सर्व गाणी एकाच गायकाने गाण्याची ही मराठी चित्रपटातील पहिलीच वेळ आहे.


ashi hi ashiqui FI
एकूण पाच गाणी ‘अशी ही आशिकी’मध्ये


‘टी-सिरीज’ची मराठीतील पहिलीच निर्मिती असलेल्या, सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ या सिनेमात सोनू निगमने पहिल्यांदाच मराठी सिनेमासाठी एकाच सिनेमातील सर्व गाणी गायली आहेत. गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित ‘अशी ही आशिकी’ या सिनेमात एकूण पाच गाणी आहेत. त्यापैकी ‘रक्कमा’, ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ आणि ‘समझे क्या?’ ही तीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहेत. दिग्दर्शनासह सचिन पिळगांवकर यांनी या सिनेमातील गाण्यांना संगीतही दिले आहे. सिनेमा आणि संगीत दिग्दर्शित करत असलेले सचिन यांच्या सिनेमात सोनू निगमने सगळीच गाणी गायली आहेत, हे पहिल्यांदाच घडलंय. सचिन आणि सोनू निगम यांचं नाव एकत्र जरी उच्चारलं तरी सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते म्हणजे सोनू निगमने गायलेलं ‘हिरवा निसर्ग’ हे लोकप्रिय गाणं. ‘हिरवा निसर्ग...’ या गाण्यापासून ते या सिनेमातील ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या टायटल ट्रॅकला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली आहे.


‘रक्कमा’ला चांंगलीच पसंती

Subscribe to POPxoTV

Also Read : कथक नृत्य वर्ग


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा 


आशिकी असावी तर अशी


सोनू निगमच्या ‘रकम्मा’ गाण्यावर अभिनय करणार हटके डान्स


तरूणाईसाठी नवीन लव्ह साँग ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’