ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
श्रीदेवीचं पहिलं वर्षश्राद्ध 14 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये करणार

श्रीदेवीचं पहिलं वर्षश्राद्ध 14 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये करणार

बॉलीवूडची चांदनी श्रीदेवी हिचं निधन 24 फेब्रुवारी 2018 ला झालं. काही दिवसातचं तिच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होईल पण आजही कपूर कुटुंबिय आणि श्रीदेवीचे चाहते या धक्क्यातून सावरलेले नाहीत. श्रीदेवीच्या वर्षश्राद्धासाठी कपूर कुटुंबियांनी खास तयारी केली आहे.

27893921 578696755815346 5152361403868250112 n

तिथीनुसार श्रीदेवीचं वर्षश्राद्ध हे 14 फेब्रुवारीला आहे. या श्राद्धाच्या दिवशी बोनी कपूर आपल्या दोन्ही मुली जान्हवी आणि खूशीसह श्रीदेवीच्या आत्म्याला शांती मिळावी, म्हणून चेन्नईमध्ये खास पूजा करणार आहेत.

42002572 737821283219389 3874927380011155456 n

ADVERTISEMENT

सूत्रानुसार, श्रीदेवीच्या श्राद्धाचे सर्व विधी हे तिच्या माहेरी करण्यात येणार आहेत. या विधींना बोनी कपूर, जान्हवी आणि खूशीसोबतच अभिनेता अनिल कपूर, सुनीता कपूर आणि काही जवळचे कुटुंब सद्स्य सामील होणार आहेत. श्रीदेवीचं चेन्नईतलं घर हे एम.करूणानिधींच्या घराच्या शेजारी आहे.

श्रीदेवी आपला भाचा मोहीत मारवाच्या लग्नाच्या निमित्ताने दुबईला गेली होती.

लग्न झाल्यावर काही दिवसांसाठी ती दुबईतच थांबली होती. श्रीदेवी ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबली होती, तिथल्याच रूमच्या बाथटबमध्ये बूडून तिचा मृत्यू झाला.

नुकताच बिग बी अमिताभ बच्चन यांनीही श्रीदेवीचा फोटो इन्स्टा अकाउंटवर शेअर केला होता. ज्या फोटोमध्ये सलमान खान आणि आमीर खान ही होते. अमिताभ यांच्याबरोबर श्रीदेवीचं हे पहिलं कॉन्सर्ट होतं.

ADVERTISEMENT

जेव्हा श्रीदेवीचं निधन झालं त्या दरम्यानच तिच्या मोठ्या मुलीचा जान्हवीचा बॉलीवूड डेब्यू होणार होता. धडक या करण जोहरच्या चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होती. श्रीदेवी आपल्या मुलीच्या डेब्यूबाबत फारच उत्साही होती.

पण तेवढ्यातच अचानक तिचा मृत्यू झाला. मायलेकींमध्ये एक स्पेशल बाँडिग होतं. पण दुर्देवाने तिला जान्हवीचा पहिला सिनेमा पाहता आला नाही.

फोटो सौजन्य – Instagram

हेही वाचा –

ADVERTISEMENT

गुंजन सक्सेनासाठी जान्हवी कपूर वाढवतेय वजन

‘श्रीदेवी बंगलो’वर चिडले बोनी कपूर, निर्मात्यांना पाठवली नोटीस

प्रिया वारियर लवकरच झळकणार हिंदी सिनेमा ‘Sridevi Bungalow’ मध्ये

08 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT