टायगर आणि दिशाचं झालं ब्रेकअप

टायगर आणि दिशाचं झालं ब्रेकअप

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या नात्याची गेल्या काही वर्षांपासून चर्चा होती. पण आता या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं आहे. आपल्या नात्याबद्दल या दोघांनीही कधीच काही मान्यता दिली नाही. पण नेहमी एकत्र डिनर डेटला अथवा लंच डेटला या दोघांना नेहमीच पाहिलं गेलं आहे. शिवाय दिशाला नेहमीच प्रोटेक्ट करत असताना टायगर दिसून आला आहे. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार हे दोघंही वेगळे झाले असून आता केवळ मित्रमैत्रिणीचं नातं त्यांच्यामध्ये राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याआधी दोघांनी आपलं प्रेमही स्वीकारलं नव्हतं त्यामुळे आता ब्रेकअपबद्दल बोलण्याचाही काही संबंध येतो असं नाही. पण याआधी अगदी बऱ्याच ठिकाणी हे दोघं वेकेशनलाही एकत्र गेले होते. 

ब्रेकअपचं नक्की कारण काय?

Instagram

गेल्या काही दिवसांपासून दिशा पटानी आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेबरोबर डिनरला गेलेली दिसून आली आहे. त्यामुळे दिशा आणि टायगर वेगळं होण्याचं कारण आदित्य ठाकरे आहे का? असा प्रश्नही अनेक लोकांना पडला आहे. पण आदित्य हे कारण यामागचं नक्कीच नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर टायगर आणि दिशाच्या कॉमन फ्रेंडपैकी एकाने याचं कारण स्पष्ट केलं. दिशा आणि टायगर यांच्यामध्ये गेल्या बरेच दिवसांपासून वाद चालू होते. या वादांमुळेच दिशा आणि टायगरने एकमेकांपासून दूर होण्याचा मिळून निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. 

कोणतंही रोमँटिक नातं नाही

Instagram

दिशा आणि टायगर यांच्यामध्ये असलेलं रोमँटिक नातं आता संपुष्टात आल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. आतापर्यंत या दोघांचं नातं दोघांनीही स्वीकारलं नव्हतं आणि त्यामुळे ब्रेकअपबद्दल बोलण्याचाही काहीच प्रश्न नाही. काही दिवसांपूर्वीपर्यंत टायगर आणि दिशा अनेक रेस्टॉरंटमधून एकत्र डिनर अथवा लंच करून बाहेर येताना पाहिलं आहे. तसंच बऱ्याच ठिकाणी टायगर दिशाला नेहमीच प्रोटेक्ट करतानाही पाहिलं गेलं आहे. 

नातं तुटण्यामागे वाद हे कारण

दिशा आणि टायगरचं नातं तुटण्यामागे आदित्य ठाकरे तर नाही ना असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण यामागचं कारण हे दिशा आणि टायगरमधील वाद आहे असंही सांगण्यात आलं आहे. या दोघांच्याही चाहत्यांसाठी ही खूपच निराशाजनक बाब आहे. पण दुसरं कारण असंही सांगण्यात येत आहे की, स्टुडंट्स ऑफ द इअर 2 मधील तारा सुतारियाबरोबर टायगरची वाढती जवळीक दिशाला सहन झाली नाही आणि त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु झाले. ते वाद विकोपाला गेल्यामुळेच त्यांचं नातं तुटलं आहे असं सांगण्यात येत आहे. काही काळापासून टायगर आणि दिशा एकत्र असून लवकरच आपल्या नात्याची कबुली देतील असं त्यांच्या चाहत्यांना वाटत होतं. पण तसं काहीही न होता अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही या गोष्टीने नक्कीच धक्का बसला आहे. टायगर सध्या ‘बागी 3’ या चित्रपटासाठी शूटिंग करत असून या चित्रपटातही दिशा त्याच्यासोबत काम करणार आहे. पण आता त्यांच्या या ब्रेकअपच्या बातमीनंतर हे दोघं नक्की काय निर्णय घेतील याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अजूनही या गोष्टीवर चाहत्यांचा विश्वास बसत नसून ही फक्त एक अफवा असावी असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार का हे पाहावं लागेल. तर सध्या दिशा ‘भारत’च्या यशामुळे आनंदी आहे.