केवळ बॉलीवूडच नाही तर टीव्हीवरील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींही केली आहे प्लास्टिक सर्जरी

केवळ बॉलीवूडच नाही तर टीव्हीवरील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींही केली आहे प्लास्टिक सर्जरी

बॉलीवूडमधील अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी करतात ही गोष्ट आता काही नवी नाही. शिल्पा शेट्टी, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, वाणी कपूर आणि अशी अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं आहेत ज्यांनी प्लास्टिक सर्जरी करून आपला लुक बदलला आहे. आपलं सौंदर्य अधिक उजळवण्यासाठी या अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली असल्याचं म्हटलं जातं. यापैकी काही अभिनेत्रींची प्लास्टिक सर्जरी ही यशस्वी झाली तर काही अभिनेत्री अर्थात कोएना मित्रा अथवा राखी सावंत यांच्या प्लास्टिक सर्जरी या अयशस्वी झाल्या. पण प्लास्टिक सर्जरी ही काही केवळ बॉलीवूडमधील अभिनेत्रीपुरतेच राहिले नाहीये तर टीव्हीवरील काही प्रसिद्ध अभिनेत्रींनीही आपल्या सौंदर्यासाठी प्लास्टिक सर्जरी करून घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या फिचर्समध्ये अनेक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. त्यापैकी बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांचा फॅन फॉलोईंग खूप जास्त आहे. कोण आहेत या अभिनेत्री ते पाहूया - 

या अभिनेत्रींनी करून घेतली आहे प्लास्टिक सर्जरी

बॉलीवूड असो अथवा टीव्ही प्रत्येक वेळी यातील अभिनेत्रींनी सुंदर दिसायलाच हवं असं म्हटलं जाते. खरं तर बऱ्याचदा हाच क्रायटेरिया वापरण्यात येतो. त्यासाठी अभिनेत्री मेकअपसह प्लास्टिक सर्जरीचादेखील आधार घेतात. आम्ही तुम्हाला या लेखात अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यानी प्लास्टिक सर्जरी करून आपला लुक बदलला आहे. पाहूया कोण आहेत या अभिनेत्री - 

मौनी राॅय

Instagram

मौनी रॉय लहान पडद्यावरून आता बॉलीवूडमध्येही राज करत आहे. एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून अधिक प्रसिद्ध झालेली मौनी ही एकताच्याच ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून पहिल्यांदा प्रेक्षकांना दिसली होती. तिच्या त्यावेळच्या लुकच्या तुलनेत आताचा तिचा लुक हा खूपच बदलला आहे. मौनी रॉयच्या जुन्या फोटोंसह तिच्या आताच्या फोटोंची तुलना केली तर तुम्हाला लगेच कळून येईल की, मौनीने आपलं नाक आणि ओठांची प्लास्टिक सर्जरी करून घेतली आहे. मौनीची ही प्लास्टिक सर्जरी बऱ्याच अंशी यशस्वी झाली आहे. सध्या मौनी रणबीर कपूर आणि आलिया भटसह ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याशिवाय बॉलीवूडचे अनेक चित्रपट तिच्याकडे असल्याचं म्हटलं जात आहे. 

अभिनेत्री मौनी रॉयचा बिकिनी अवतार होतोय व्हायरल

रश्मि देसाई

Instagram

मालिका ‘उतरन’ मधून तपस्या ही भूमिका घराघरातून प्रसिद्ध झाली होती आणि ही भूमिका साकारली होती ती रश्मी देसाईने. सध्या रश्मी ‘बिग बॉस’ मध्ये दिसत असून तिचं नाव सध्या बऱ्याच कारणाने चर्चेत आहे.  कधी सिद्धार्थ शुक्लाबरोबरचं भांडण तर कधी कधी स्वतःच्या घटस्फोटाबद्दल बिनधास्त बोलणारी रश्मी. तर कधी अरहान खानबरोबरच्या तिच्या नात्यावरूनही ती यावर्षी तुफान चर्चेत आहे. पण रश्मीनेदेखील आपल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करून घेतली असल्याचं म्हटलं जातं. रश्मीने तिच्या चेहऱ्याच्या खालच्या भागात सर्जरी केल्याचा अंदाज तुम्हाला तिच्या जुन्या आणि नव्या फोटोवरून नक्कीच लावता येऊ शकतो. 

अभिनेत्री रश्मी देसाईला होता ‘हा’ गंभीर आजार, म्हणून वाढत होतं वजन

सारा खान

Instagram

‘सपना बाबुल का...बिदाई’ या मालिकेतून लहान पडद्यावर आलेली अभिनेत्री सारा खान कोणाला माहीत नाही असं नक्कीच नाही. या मालिकेतून सारा घराघरात पोहचली. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक टीव्ही शो आणि बरेच रियालिटी शो केलेली ही अभिनेत्रीदेखील स्वतःला प्लास्टिक सर्जरी करून घेण्यापासून रोखू शकली नाही. साराने स्वतःच्या ओठांची सर्जरी केल्याचं सांगण्यात येतं. त्यासाठी तु्म्ही तिचे जुन्या मालिकेतील फोटो आणि आताचे फोटोही पाहू शकता. साराच्या चेहऱ्यात बराच फरक पडलेला आपल्याला दिसून येईल. 

शमा सिकंदर

Instagram

‘ये मेरी लाईफ है’ या मालिकेतून आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरूवात करणारी अभिनेत्री शमा सिकंदरने दणक्यात सुरूवात केली. बऱ्याच मालिकेतून गालावर खळी असणारी ही अभिनेत्री दिसली होती. इतकंच नाही तर आमिर खानच्या ‘मन’ या चित्रपटातही ही अभिनेत्री दिसली. पण आता शमाला ओळखताही येणार नाही इतका बदल तिच्यामध्ये  झाला आहे. अगदी तिच्या गालापासून ते ओठांपर्यंत सगळ्याच अवयवांची तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे की काय असा प्रश्न पडावा इतपत ती बदलली आहे. शमाने तिच्या ओठांची सर्जरी केली आहे हे तर बघूनच कळतं. पण बाकी नक्की कोणत्या अवयवांची सर्जरी करून घेतली आहे याचा फक्त अंदाजच लावता येऊ शकतो. 

प्लास्टिक सर्जरीनंतर असे दिसू लागले हे सेलिब्रिटी, पाहा फोटो

मौली गांगुली

Instagram

एकता कपूरच्या ‘कहीं किसी रोज’ या मालिकेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री मौली गांगुलीने अनेक मालिकेतून आपला ठसा उमटवला. तसंच तिने अनेक चित्रपटांमधूनही काम केलं आहे. तिनेही आपल्या ओठांची सर्जरी करून घेतली असल्याचं दिसून आलं आहे. मात्र या गोष्टीचा तिने नकार दिला आहे. पण तिचे फोटो पाहिल्यानंतर या गोष्टी नक्कीच लक्षात येतात. 

वास्तविक यापैकी कोणत्याही अभिनेत्री उघडपणे प्लास्टिक सर्जरीबद्दल कधीच भाष्य करत नाहीत. पण तरीही त्यांच्यातील बदल आणि त्यांनी केलेल्या प्लास्टिक सर्जरी या दिसून येत आहेत हे नक्की.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.