'कुली नं. 1' च्या रिमेकमध्ये वरूण आणि सारा

'कुली नं. 1' च्या रिमेकमध्ये वरूण आणि सारा

एखादा चित्रपट हिट झाला की काही वर्षांनी त्या चित्रपटाचा रिमेक तयार करण्यात येतो. डेविड धवन त्यांचा ‘कुली नं 1’ चादेखील लवकरच रिमेक केला जाणार आहेत. या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान काम करणार आहे. 24 एप्रिलला वरूण धवनचा वाढदिवस आहे. वरूणच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा  कुली नं 1 चा खरा हिरो गोंविदा करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी गोंविदा आणि डेविड धवन- वरूण धवन यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे या रिमेकच्या निमित्ताने तो वाद मिटण्याचे संकेत दिले जाणार आहेत. कुली नं 1 च्या रिमेकच्या निमित्ताने गोविंदा पुन्हा धवन फॅमिलीसोबत जोडला जाण्याची शक्यता आहे. वास्तविक गोविंदाने डेविड धवनसोबत अनेक हिट चित्रपट केले आहेत. ‘कुली  नं 1’ हा चित्रपट त्यापैकी एक चित्रपट आहे.


coolie no one


'कुली नं वन'चा रिमेक


पहिला कुली नं 1 मध्ये गोविंदा-करिष्मा या  दोघांची जोडी हिट ठरली होती. या चित्रपटात गोविंदाने हमालाचे काम केले होते. त्यात हमालांचा निळा आणि लाल रुमाल असलेला युनिफॉर्मदेखील घातला होता. मात्र कुली नं 1 च्या रिमेकमध्ये वरूण हमालाच्या युनिफॉर्ममध्ये न दिसता साध्या जीन्स आणि टिशर्ट या पेहरावात दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं  कथानक नेमकं कसं असेल आणि त्यात वरूण आणि सारा यांची वेशभूषा आणि स्टाईल कशी असेल हे चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यावरच समजणार आहे. मात्र या बातमीने गोविंदा आणि वरूणचे चाहते इतके खुश झाले आहेत की त्यांनी वरूण आणि साराचे फोटोशॉप पोस्टर तयार करण्यास सुरूवात केली आहे. या पोस्टरमध्ये त्यांनी पहिल्या कुली नं वन च्या गोविंदा आणि करिष्मा यांच्या फोटोंमध्ये वरूण आणि साराचे चेहरे लावून फनी पोस्टर तयार केले आहेत. डेविड धवन यांनी वरूणसोबत यापूर्वी “मै तेरा हिरो” आणि “जुडवा”चा रिमेक तयार केला आहे. त्यामुळे आता ही हिट पिता-पुत्र जोडी कुली नं वनच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसविण्यासाठी सज्ज झाले आहे. रिमेक असल्यामुळे या चित्रपटाचे कथानक आणि काही मुळ गाणी त्यात तशीच ठेवण्यात येणार आहेत. या चित्रपटात “हुस्न हे सुहाना” आणि “मैं तो रस्ते से जा रहा था” ही लोकप्रिय गाणी पुन्हा असण्याची शक्यता आहे. ही दोन्ही गाणी आजही अनेकांची फेव्हरेट गाणी आहेत. त्यामुळे सहाजिकच या रिमेकची चाहते अगदी आतुरतेने चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. डेविड धवन वरूण सोबत ‘बिबी नं वन’चा रिमेकदेखील करणार असल्याची चर्चा आहे. ‘जुडवा’चा रिमेक हिट झाल्यामुळे या ‘बिबी नं वन’ ते दोघं मिळून करणार आहेत. मात्र ‘कुली नं वन’ हिट झाला तरच या चित्रपटाबाबत विचार केला जाणार आहे. शिवाय वरूण सध्या अनेक चित्रपटाच्या शूटिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या 17 एप्रिलला त्याचा कलंक चित्रपट प्रदर्शित होत आहे. या  चित्रपटातील वरूणची भूमिका नेहमीपेक्षा वेगळी आणि महत्त्वाची असण्याची शक्यता आहे. यासोबतच स्ट्रीट डान्सर, रणभूमी अशा अनेक चित्रपटातून दिसणार आहे. त्यामुळे या सर्व चित्रपटांच्या शूटिंगनंतर कुली नं वनचे शूटिंग सुरू केले जाणार आहे.


coolie no one 1
सारा अली खान साकारणार करिष्माची भूमिका


कुली नं वनमध्ये करिष्मा कपूरने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये ही भूमिका आता सध्याची हिट अभिनेत्री सारा अली खान साकारणार आहे. वास्तविक या चित्रपटाच्या रिमेकमधील हिरॉईनसाठी आधी जान्हवी कपूर आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता या चित्रपटासाठी सारा अली खानची वर्णी लागल्याची चर्चा आहे. या चित्रपटात सारा एका चंचल मुलीची भूमिका साकारणार आहे. जी एका हमालासोबत प्रेम करते आणि घरच्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवते.  


‘बेहद’ हॉट बिकिनीमध्ये दिसली जेनिफर विंगेट


'किन्नर बहू' रुबीना दिलैकला झाला शूटींगदरम्यान अपघात


'भारत'मधील सलमान खानचा हटके लुक


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम