तुमच्या सुंदर चेहऱ्यावरील काळा तीळ (Mole) तुमच्या सौंदर्य अजूनच खुलवतो. पण सुंदरतेत भर घालण्यासोबतच शरीरावरील तीळ अजूनही बरंच काही सांगतात. शरीरावरील तीळांबद्दल नेहमीच अनेक कयास लावले जातात. असं म्हणतात की, तीळाचा आपल्या भविष्यावर आणि कधीकधी स्वभावावरही प्रभाव पडत असतो. भारतीय ज्योतिषात अनेक विधी प्रचलित आहेत, त्यापैकीच एक म्हणजे सामुद्रिक शास्त्र होय. या शास्त्रामध्ये शरीराची रचना, वर्ण, आणि तीळ याच्या आधारावरून भविष्य सांगितलं जातं. यानुसारच सामुद्रिक शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरील तीळावरून त्याचं व्यक्तीमत्त्व जाणून घेता येतं. चला तर जाणून घेऊया काय सांगतात तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावरील तीळ.
1. कपाळाच्या उजव्या बाजूकडील तीळ
जर तुमच्या कपाळावर तीळ असेल तर तुम्ही श्रीमंत असल्याचं मानलं जातं. असं म्हणतात की, या व्यक्तींना आयुष्यात खूप प्रसिद्धी आणि यश मिळू शकतं.
2. भुवयांच्या खाली
बहुतेकदा ही लोक बुद्धीमान आणि क्रिएटीव्ह असतात. या व्यक्तींमध्ये सारासार विवेकबुद्धी जास्त असते.
3. ओठांवर किंवा हनुवटीवर
हे तीळ तुमचं सौंदर्य वाढवतात आणि सेक्सी लुकही देतात. तसंच हेही सांगतात की, तुम्ही यशस्वी व्हाल आणि आयुष्यही बॅलन्स्ड असेल.
4. नाकावर
या लोकांचा राग त्यांच्या नाकावरच असतो. जर तुमचा तीळ नाकावर असल्यास तुम्ही जास्त रागीट असता. पण नेहमीच असं शक्य नाही, या व्यक्तींना फ्लर्ट करायलाही आवडतं.
5. डोळ्यात किंवा डोळ्यांवर
काही लोकांच्या डोळ्यांत तीळ असतो. जर तुमच्या उजव्या डोळ्यावर तीळ असेल तर तुम्ही आरामात पैसे कमावू शकता आणि जर तुमच्या डाव्या डोळ्यावर तीळ असेल तर तुम्ही अभिमानी असता.
6. कानाच्या खालच्या बाजूला
हा तीळ सांगतो की, या व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी जीवही पणाला लावू शकतात. अशा व्यक्ती मित्र असल्यास जीवाला जीव देणाऱ्या मित्र बनतात.
7. मानेवर
जर तुमच्या मानेवर तीळ असल्यास ते चांगलं असतं. हा तीळ तुमच्या पर्सनॅलिटीला अजून छान बनवतो.
8. गालावर
गालावर तीळ असणं नॉर्मल आहे. जर तुमच्या उजव्या गालावर तीळ असेल तर तुम्ही खूप इमोशनल आहात आणि जर तुमच्या डाव्या गालावर तीळ आहे म्हणजे तुम्ही इंट्रोवर्ट आहात. तुम्ही इतरांशी जास्त मिसळत नाही आणि तुमच्याकडे कधीच पैशांची कमी नसते.
Also Read How to Remove Moles in Hindi
9. खांद्यावर
जवाबदारीचं ओझं नेहमी खांद्यावरच नाही का? त्यामुळे खांद्यावर तीळ असणाऱ्या व्यक्ती या जबाबदार आणि आपल्या जवाबदाऱ्या समजल्याने नेहमीच समजूतदारही असतात.
10. हातांवर
तुमच्या हातावरील तीळ सांगतो की तुम्ही मजबूत आणि धाडसी आहात आणि प्रत्येक निर्णय घेणं तुम्हाला अगदी सहज जमतं.
11. छातीवरील तीळ
हा तीळ सांगतो की, तुम्ही आळशी आहात आणि तुम्हाला छानछौकीचं आयुष्य आवडतं. तसंच तुम्ही सतत स्वप्नांच्या दुनियेत असता.
फोटो सौजन्य : Shutterstock/Instagram
हेही वाचा –
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली
बेडरूमसाठी फॉलो करा या वास्तू टीप्स – Vastu for Bedroom in Marathi
मार्च महिन्यात जन्म घेणाऱ्या व्यक्ती कशाअसतात, जाणून घ्या