भारताला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या इतिहासात खोलवर डोकावताना अनेक रत्ने आपोआप हाताशी लागतात. पुढच्या अनेक पिढ्यांना आपल्या इतिहासाविषयी माहिती देण्याचे काम साहित्य करत असते. मराठीत दर्जेदार साहित्य आहे. आपल्याकडील अनेक ऐतिहासिक कांदबऱ्यांमधून हा इतिहास सहज आणि सुलभ भाषेत रंगवण्यात आलेला आहे. काही कांदबऱ्या तर या इतिहासातील व्यक्तिमत्त्वांची नव्याने ओळख आपल्याला करून देतात. यासाठीच जाणून घ्या ही ऐतिहासिक कादंबरी माहिती (Aitihasik Marathi Kadambari)… जी तुम्हाला सतत आठवण करून देत राहील या महापुरूषांच्या इतिहासाची
Table of Contents
मृत्युंजय (Mrutunjay)
लेखक – शिवाजी सावंत
महाभारतील एक दुर्लक्षित व्यक्तिमत्त्व कर्ण. महाभारतात कर्ण या व्यक्तिरेखेला खरंतर अनेक पैलू आहेत. मात्र कौरवांना साथ दिल्यामुळे एक खलनायक याच स्वरूपात कर्णाला आजही ओळखलं जातं. लेखक शिवाजी सावंत यांनी या कांदबरीतून खऱ्या कर्णाची ओखळ करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा दानशूर कर्णाचा जीवनपट आहे.
श्रीमान योगी (Shrima Yogi)
लेखक – रणजीत देसाई
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास या मराठी ऐतिहासिक कादंबरी यादी लेखक रणजीत देसाई यांनी मांडलेला आहे. शिवाजी महाराजांच्या अनेक पुस्तकांप्रमाणे शिवाजी महाराजांचे बालपण, स्वराज्यांची निर्मिती, शिवाराज्याभिषेक ते एका महान युगपुरूषांचा महानिर्वाण असा संपूर्ण प्रवास या कादंबरीत मांडण्यात आलेला आहे. रणजीत देसाई यांनी इतिहासाचा अभ्यास आणि त्यातून केलेली लेखन कल्पना यातून या अप्रतिम कादंबरीची निर्मिती केलेली आहे. त्यांच्या लेखनकौशल्यामुळे ही कादंबरी वाचताना आपणही त्याच काळात जगत असून आपल्या डोळ्यांसमोर शिवाजी महाराजांचा जीवनपट झरझर वाहात असा भास होतो. श्रीमान योगी ही शिवाजी महाराजांची प्रसिद्ध आत्मचरित्रपर कादंबरी आहे
छावा (Chava)
लेखक – शिवाजी सावंत
छावा ही कांदबरी देखील लोकप्रिय कादंबरीकार शिवाजी सावंत यांनीच लिहीली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सूपूत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर ही कांदबरी आधारित आहे. शिवाजी राजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजही अतिशय प्रराक्रमी योद्धा होते. आजही त्यांचे नाव इतिहासात अजरामर आहे. संभाजी महाराजांचे आयुष्य ही एक संघर्षगाथाच आहे. कारण जन्मतःच त्यांचे मातृछत्र हरपले. लहानपणीच त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की त्यांना काही काळ मोघलांच्या तावडीत राहावे लागले. आग्राहून सुटका झाल्यावरही सुरक्षेसाठी त्यांचे निधन झाले आहे अशी खोटी अफवा पसरवण्यात आली होती. त्यांच्यावर आईनंतर जीवापाड प्रेम करणारी त्यांच्या मॉंसाहेब जिजामाताही त्यांना लहान वयात एकटंच सोडून गेल्या. शिवाजी महाराजांनंतरही त्यांना स्वराज्यांच्या रक्षणासाठी अनेक कटकारस्थानांना तोंड द्यावे लागले. हा संपूर्ण प्रवास या कांदंबरीत रेखाटण्यात आलेला आहे.
वाचा – व्हॉटसअॅपवर शेअर करा शिवाजी महाराजांचे स्टेटस (Shivaji Maharaj Status In Marathi)
स्वामी (Swami)
लेखक – रणजित देसाई
आपल्या इतिहासात पेशेवकालीन साम्राज्याच्या अनेक खुणा आजही दिसून येतात. पुण्यातील शनिवार वाड्यात गेल्यावर आपण पेशेवेकाळात रममाण होतो. रणजित देसाई यांच्या स्वामी या ऐतिहासिक कादंबरीत (aitihasik kadambari) तुम्हाला पेशवेकाळाचं दर्शन करण्याचे सामर्थ्य आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. यात त्यांचे राजकीय जीवन, शोर्यगाथा, वेयक्तिक जीवनप्रवास रंगवण्यात आलेला आहे.
पानिपत (Panipat)
लेखक – विश्वास पाटील
मराठा साम्राज्य आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झालेली पानिपत ही तिसरी मोठी लढाई होती. ही लढाई हरियाणामधील पानिपत येथे झाली म्हणून ती पानिपतची लढाई या नावाने ओळखली जाते. शेवटच्या लढाईत अहमद अब्दालीने मराठी साम्राज्याचा पराभव केला होता. ज्यात विश्वासराव पेशवे आणि त्यांचा चुलत भाऊ सदाशिव भाऊ यांना वीरमरण प्राप्त झाले. पाणिपत कांदबरीमध्ये अब्दालीच्या सुरूवातीच्या आक्रमणापासून या युद्धाच्या शेवटपर्यंतचे वर्णन करण्यात आलेले आहे.
युंगधर (Yuagndhar)
लेखक – शिवाजी सावंत
युगंधर ही भगवान श्रीकृष्णाचा जीवनपट सांगणारी कादंबरी आहे. या कांदबरीत मृत्युंजयप्रमाणे श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आपल्या कथा सांगतात. ज्यामुळे यात कृष्णाच्या जीवनातील काही घटना मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. कादंबरीचे स्वरूप वर्णनात्मक असल्यामुळे कृष्ण हा आपल्यासारखाच माणूस आहे असा भास होत राहतो. भगवान श्रीकृष्णाचा जीवनपट अनुभवण्यासाठी ही एक उत्तम ऐतिहासिक कादंबरी आहे.
ययाति (Yayati)
लेखक – वि.स. खांडेकर
ही कादंबरी मनुष्याच्या चिरतरूण राहण्याच्या प्रवृत्तीवर आधारित आहे. राजा ययाती हा स्वतःच्या मुलाकडून तारूण्य घेऊन त्याला वृद्ध करतो. मात्र त्याला नंतर जाणिव होते की केवळ तरूण असल्याने जीवनात सर्व काही प्राप्त करून घेता येत नाही. त्यानंतर तो त्याचा पूत्र पूरू याला आपला उत्तराधिकारी घोषित करतो.
राऊ (Rau)
लेखक – ना. सं. इनामदार
राऊ कादंबरी ही मराठा पेशवा बाजीराव आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांची प्रेमकथा सांगणारी एक प्रसिद्ध कादंबरी आहे. बाजीराव पेशवा हे एक शूरवीर योद्धा होते. अशाच एका युद्धदौऱ्यावर त्यांची मस्तानीशी भेट झाली. बाजीराव पेशवा होते त्यामुळे तत्कालीन समाजाने या नात्याला विरोध केला. मात्र त्यांचे प्रेम प्रामाणिक आणि नित्सिम होते. ज्यामुळे बाजीराव – मस्तानी ही कथा इतिहासात अजरामर झाली.
झुंज (Zunj)
लेखक – ना. सं. इनामदार
मराठा साम्राज्यामध्ये यशंवतराव होळकर हे एक मराठी योद्धा होऊन गेले. या शूरवीर मराठ्याच्या पराक्रमाची कथा या कांदबरीत मांडण्यात आलेली आहे. होळकर कुटुंबाने छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मीण केलेल्या स्वराज्याची राखण केली. मात्र त्यांच्याबद्दल फारसे कुणाला माहीत नाही. यासाठीच या कादंबरीत त्याचे जीवन, युद्ध, प्रामाणिकपणा याचे चित्र रेखाटण्यात आलेले आहे.
राधेय (Radheya)
लेखक – रणजित देसाई
राधेय ही देखील रणजित देसाई यांची लोकप्रिय एतिहासिक कादंबरी आहे. यात लेखकाने कर्णाच्या जीवनावप प्रकाश टाकलेला आहे. कर्णाचं जीवन एकाकी आणि उपेक्षित होतं. मात्र त्याचं महाभारातील काही खास व्यक्तिरेखांशी एक वेगळंच नातं होतं. जे जगासमोर कधी आलंच नाही. लेखकाच्या मते राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही कारण तो प्रत्येकाच्या मनात दडलेला आहे. प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी आहे.
शपथ वायुपुत्राची (Shapath Vayuputrachi)
लेखक – अमिश त्रिपाठी
शपथ वायुपुत्राची कादंबरीत तत्कालीन राजकारण, युद्ध आणि डावपेच यांचे वर्णन करण्यात आलेले आहे. या कथेचा कालखंड खूप पूरातन आहे. यात शिवाची रणनीती मांडण्यात आलेली आहे. शिवाला जरी भगवान शंकराचे महादेवत्त्व प्राप्त झाले असले तरी या कांदबरीत तो एक सर्व सामान्य पुरूषाप्रमाणे जाणवत राहतो. शिव आणि वायुपुत्राचा काय सबंध आहे हे यातून तुम्हाला जाणवू शकते.
चाणक्य (Chanakya)
लेखक – भा. द. खेर
चाणक्य हा सम्राट चंद्रगुप्त मोर्याच्या राजसभेतील महामंत्री होता. नंद राजाचे साम्राज्य संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावप बसवण्यात चाणक्यचा महत्त्वाची भूमिका होती. चाणक्याने लिहीलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो. चाणक्य या कादंबरीत या जीवनप्रवासावर प्रकाश टाकलेला आहे.
अधिक वाचा –
वाचा मराठीतील या बेस्ट रोमॅंटिक कादंबरी (Romantic Novels In Marathi)
सर्वोत्कृष्ट मराठी रहस्यमय कादंबरी (Best Marathi Horror Novels)