ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
लग्नात ‘या’ रंगाचा लेहंगा परिधान करणार आलिया, खास असणार रणबेलियाच्या लग्नाची थीम

लग्नात ‘या’ रंगाचा लेहंगा परिधान करणार आलिया, खास असणार रणबेलियाच्या लग्नाची थीम

बी टाऊनमध्ये एखाद्या सेलिब्रेटीच्या लग्नाची घोषणा झाली की काही दिवस सोशल मीडियावर लग्नाची चर्चा सुरू असते. सध्या चाहत्यांना रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे वेध लागले आहेत. कारण याच आठवड्यात सर्वांचं आवडतं हे क्यूट कपल लग्नाच्या बंधनात अडकत आहे. कपूर आणि भट परिवारात लग्नाची लगबग सुरू आहे. त्यामुळे रणबेलियाच्या लग्नाची थीम कशी असेल, लग्नात आलिया कोणता पेहराव करणार, तिचा लेहंगा कोणत्या रंगाचा असेल अशा अनेक गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या आहेत. 

लग्नात असा असेल आलियाचा पेहराव

नवरीचं खरं रूप लग्नात खुलून येतं. कारण लग्नात तिच्यावर एक वेगळंच तेज चढतं. हातावरील मेंदी, दागदागिने, गजरे यासोबतच तिचा वेडिंग आऊटफिट खूप महत्त्वाचा असतो. आता रणबेलियाच्या लग्नात नववधू आलिया नेमका कोणता पेहराव करणार याची उत्सकुता सर्वांना लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया सेलिब्रेटी फॅशन डिझाइनर सब्यासाची मुखर्जी आणि मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला लेहंगा लग्नात परिधान करणार आहे. आलियाच्या लग्नासाठी सब्यसाचीने लेहंगा डिझाईन केला आहे तर मनीष मल्होत्रा यांनी आलियासाठी खास चुनरी डिझाईन केली आहे. आलिया लग्नाचे विधी आणि सप्तपदी चालताना हा लेहंगा परिधान करणार अशी चर्चा आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचे वधूवस्त्र खूप महत्त्वाचे असते. आलियासाठी लग्नात परिधान करण्यात येणारी चुनरी कस्टमाईज करण्यात आली आहे. 

रणबेलियाची वेडिंग थीम

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची थीमदेखील खास असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाची थीम पेस्टल असण्याची शक्यता आहे. यासाठीच आलियाचा लग्नाचा लेहंगा देखील पेस्टल रंगाचा असेल. आलिया गुलाबी रंगाचा लेहंगा लग्नात परिधान करणार अशी सध्या चर्चा आहे. ज्यावर मॅच होणारा दुपट्टा असेल.बॉलीवूडमधील लोकप्रिय असलेल्या कपूर आणि भट कुटुंबातील मुलांचं लग्न असल्यामुळे लग्नाचा थाटमाट नक्कीच असणार. शिवाय आलिया आणि रणबीर गेले पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची खूप उत्सुकता लागलेली आहे. 14 एप्रिल ते 17 एप्रिल असा लग्नसोहळ्याचा मोठा कार्यक्रम असेल. बांद्रा येथे काही दिवसांपूर्वीच आलिया आणि रबणीरने वास्तु अपाटमेंटमध्ये घर घेतलेलं आहे. त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम केला जाणार असून आरके  बंगल्यात या दोघांचं लग्न होण्याची शक्यता आहे. कारण याच ठिकाणी नीतू कपूर आणि ऋषी कपूर याचं लग्न झालं होतं. त्यामुळे हा बंगला कपूर घराण्यासाठी नक्कीच खास आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm एक कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
11 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT