ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Bail Pola Information In Marathi

बैल पोळा माहिती मराठी (Bail Pola Information In Marathi)

“अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला…कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला”

मराठी कालदर्शिका नुसार श्रावण महिन्याच्या अमावस्येला म्हणजे पिठोरी अमावस्येला ‘बैलपोळा’ असतो. श्रावण महिन्यात व्रतवैकल्य आणि सणांची जणू रेलचेलच असते. श्रावण महिन्याचे महत्त्व आणि यातील महत्त्वाचे सणसमारंभ प्रत्येकाला माहीत असायला हवेत. या काळात नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी पाठोपाठ येतो तो म्हणजे ‘बैलपोळा’. यावर्षी म्हणजे 2021 साली 6 सप्टेंबरला बैलपोळा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी बांधव हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करताना दिसतात. पण बैलपोळ्याची माहिती (Bail Pola Chi Mahiti) शहरी भागात जास्त नसते. कारण मुंबईसारखा शहरी भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळ्याचा उत्साह संपूर्ण जाणवतो. या सणाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते कारण बैल म्हणजे शेतकऱ्याचे जीवाभावाचे मित्र, त्यांच्या जीवावर शेतकरी शेत नांगरतो, जमिनीतून धान्य पिकवतो. शेतकऱ्या प्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात, कष्ट करतात. म्हणूनच या कष्टकरी मित्राची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याचा खास सण (Information About Bail Pola In Marathi) साजरा केला जातो. शेतकऱ्याच्या घरात दसरा दिवाळीप्रमाणेच पोळ्याच्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते. महाराष्ट्रात या सणाला बैलपोळा म्हणतात तर कर्नाटकात याला बेंदूर असं म्हणतात. यासाठीच जाणून घ्या बैलपोळा माहिती मराठीतून (Bail Pola Information In Marathi) त्याचप्रमाणे या खास सणासाठी शेतकरी बांधवांना द्या बैलपोळ्याच्या शुभेच्छा.

शेतकऱ्यांचा खास सण बैलपोळा माहिती (Information About Bail Pola In Marathi For Farmers)

बैलपोळा सण घरातील बैल अथवा पाळीव प्राण्यांविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणारा एक महत्त्वाचा सण आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे पशूपालन करणे. बैलामुळे शेतकऱ्याला शेत नांगरणे सोपे जाते. सहाजिकच बैल हा प्राणी शेतकऱ्याचा जीवाभावाचा असतो. त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि  त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. आज आधुनिक जगात ट्रॅक्टर द्वारे शेत नांगरले जाते. मात्र असं असूनही पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा बैलपोळा मात्र शेतकरी बांधव आवर्जून साजरा करतात. ज्यांच्याकडे बैल नसतात अथवा  कामानिमित्त शहरी भागात राहावे लागते असे लोक मातीचा अथवा लाकडाच्या बैलांची प्रतीकात्मक पूजा करतात. या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही. बैलांना सजवले जाते आणि त्यांची  पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. बैलपोळ्याच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. बैल पोळ्यासाठी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे. यासाठीच ” आज आवतन घ्या आणि उद्या जेवायला या ” अशा शब्दात बैलांना घरोघरी आमंत्रण दिलं जातं. काही ठिकाणी करमणूक म्हणून बैलांची मिरवणूक काढली जाते. यासाठी घरातील बैलाला सुंदर शाल आणि रंगरंगोटी करून सजवले जाते. हिंदू संस्कृतीत वृक्ष, प्राणी यांची पूजा करण्याची पद्धत आहे.

वाचा – शेतकरी स्टेटस मराठीतून (Shetkari Status In Marathi)

ADVERTISEMENT
Bail Pola Information In Marathi

Instagram

बैलपोळा कथा (Bail Pola Story In Marathi)

बैलपोळ्याविषयी एक दंतकथा प्रचलित आहे. असं म्हणतात की, कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत होते. सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले. हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरले. शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा  साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला ? त्यावेळी भगवान शंकराचा परम भक्त नंदीने शंकराची बाजू घेतली. नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला. कलयुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला. नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली. तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला   सांगितले की तुला कलयुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत. तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला. बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे. निसर्गातील प्रत्येक वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे. ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते.

Bail Pola Information In Marathi

Instagram

कसा साजरा करतात बैलपोळा (Bail Pola Celebration In Marathi)

बैलपोळा हा सण शेतकरी म्हणजेच सर्जाराजासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच जाणून घ्या हा सण कसा साजरा करतात (Bail Pola Information In Marathi)

ADVERTISEMENT
  • बैलपोळ्याच्या दिवशी भल्या पहाटे घरातील बैलांना नदीवर नेऊन अंघोळ घालून सजवले जाते.
  • बैलांना सुंदर शाल आणि रंगीत साहित्याने सजवले जाते. यामध्ये इतरांपेक्षा आपल्या घरातील बैल जास्त सुंदर दिसावेत असा प्रयत्न केला जातो. अंगावर रंगीत ठिपके आणि शिंगाना बाशिंग बांधलेले बैल या दिवशी खूपच छान दिसतात.
  • श्रीमंत घरात बैलांच्या घरात घुंगरवाळा आणि पायात ऐपतीप्रमाणे तोडे घातले जातात.
  • हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा असल्याने या दिवशी कोणतेही काम बैलांकडून करवून घेतले जात नाही.
  • घरात पुरणपोळी, करंजी, शंकरपाळी असे गोड पदार्थ बनवले जातात.
  • बैलांची घरात पारंपरिक पद्धतीने पूजा, आरती करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.
  • पुरणपोळी सोबत बैलांना पौष्टिक आहार असलेले पदार्थ दिले जातात.
  • या दिवशी गावच्या सीमेवर आणि घरोघरी आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. 
  • गावच्या सीमेवर गावातील सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोलताश्यांसह भव्य मिरवणूक काढली जाते.
  • या मिरवणूकीत पोळ्याची खास गीते सादर केली जातात. 
  • गावातील मानवाईक म्हणजे ज्याला मान आहे अशी व्यक्ती गावच्या सीमेवरील तोरण तोडतो आणि पोळा फुटतो असं म्हटलं जातं. 
  • ज्या शेतकऱ्याचा बैल पोळा फोडेल म्हणजे शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायत तर्फे मानाची झूल टाकली जाते आणि त्याच्या मालकाच्या म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावर फेटा बांधला जातो. 
  • त्यानंतर गावातील देवळाजवळ बैलांची सामूहिक पूजा आणि मिरवणूक केली जाते. 
  • बैल नेणाऱ्या व्यक्तीला बोजारा म्हणजे पैसे देण्यात येतात. 

भारत हा शेतीप्रधान देश आहे. बैल हे शेतकऱ्याप्रमाणेच आयुष्यभर शेतात राबतात. वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या या मुक्या जनवरांप्रती उतराई होण्याचा दिवस म्हणून बैलपोळ्याकडे पाहिले जाते. यासाठीच बैलपोळा सण इतर सण समारंभ याप्रमाणेच जल्लोषात साजरा करण्याची पद्धत आहे.

06 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT