ADVERTISEMENT
home / आपलं जग
Bail Pola Status In Marathi

बैल पोळा स्टेटस | Bail Pola Chya Hardik Shubhechha | Bail Pola Status In Marathi

शेतकऱ्यांसाठी शेतात राबून मातीचे सोनं करणारा बैल हा प्रत्येक शेतकऱ्याचा खरा साथी. अगदी कोणत्याही काळात त्याची साथ न सोडणाऱ्या अशा साथीदाराचा एक दिवस हा खास त्याच्या विश्रांतीसाठी असतो. श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला वेगवेगळ्या प्रदेशानुसार बैलांचा सण ‘बैलपोळा’ साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बैल पोळा माहिती मराठीतून घ्यायची असेल तर अगदी थोडक्यात सांगायचे तर बैलपोळा हा खास शेतकऱ्यांसाठीचा सण आहे. या दिवशी बैलांकडून कोणतीही काम करुन घेतली जात नाही. तर त्यांना छान नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. आजचा दिवस हा त्यांचा असल्यामुळे त्यांच्या सेवेत कोणतेही कमी केली जात नाही.  या दिवशी शेतात राबणाऱ्या या बैलांना आराम मिळावा म्हणून  बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने  शेकले जाते. यालाच अनेक ठिकाणी ‘खांद शेकणे’ असे म्हणतात. त्यानंतर बैलांना सजवले जाते.  बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झुल घातली जाते. त्यांच्या अंगावर ठिपके काढले जातात. बाशिंग सजवले जाते, गळ्यात कवड्याच्या माळा, घुंगराच्या माळा, पायात चांदीचे तोडे घातले जाते. बैलाला खाण्यासाठी या दिवशी गोडधोड पदार्थ देखील करतात. या दिवशी खास पुरणपोळीचा बेत केला जातो. शिवाय बैलाची राखण करणाऱ्या माणसाला देखील या वेळी खास कपडे दिले जातात.  अशाप्रकारे हा दिवस साजरा केला जातो. बैल पोळा माहिती मराठी तून घेतल्यानंतर आता या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही बैल पोळा शुभेच्छा (Bail Pola Chya Hardik Shubhechha), बैलपोळा शुभेच्छा स्टेटस (Bail Pola Shubhechha In Marathi), बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छांसाठी SMS, बैलपोळा कविता (Bail Pola Poem In Marathi) तुमच्या शेतकरी बांधवांना पाठवू शकता. 

बैल पोळा स्टेटस (Bail Pola Status In Marathi)

Bail Pola Status In Marathi

Bail Pola Status In Marathi

बैल पोळाच्या दिवशी खास स्टेटस (Bail Pola Status In Marathi) ठेवण्याचा विचार असेल तर आम्ही काही खास स्टेटस देखील निवडले आहेत. चला जाणून घेऊया हे खास स्टेटस

  1. कृषीप्रधान संस्कृतीमधल्या सगळ्यात महत्वाचा उत्सव बैलपोळा…बैल पोळा हार्दिक शुभेच्छा
  2. कष्ट हवे मातीला, चला जपुया पशुधनाला, बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!
  3. उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा, बैल पोळाच्या शुभेच्छा!
  4. शेतात राबणारा माझा कष्टकरी तो मित्र, माझा सच्चा दोस्त म्हणजे माझा बैल, बैल पोळ्याच्या शुभेच्छा!
  5. कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा घटक म्हणजे बैल.. बैल पोळ्याच्या शुभेच्छा
  6. आजचा दिवस आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा.. बळीराजाचा मित्र आमच्या बैलाला पुजण्याचा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  7. शेतामध्ये राबणारा माझा बैल, तुझा मिळू दे उदंड आयुष्य, बैल पोळ्याच्या शुभेच्छा!
  8. नको फास लावू गळा बळीराजा, आपुल्या गळा,
    दे वचन तू मला, तुझ्या पाठीशी मी आहे कायम,
    म्हणतो माझा लाडका बैल, बैल पोळ्याच्या शुभेच्छा!
  9. वाडवडिलांची पुण्याई, म्हणून केली शेती, तुम्हाला सगळ्यांना बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!
  10. बैल पोळा सणाच्या तुम्हाला सगळ्यांना आणि सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा!

जाणून घ्या सेंद्रिय शेतीचे फायदे

ADVERTISEMENT

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा (Bail Pola Chya Hardik Shubhechha)

Bail Pola Wishes In Marathi

Bail Pola Wishes In Marathi

एकमेकांना शुभेच्छा दिल्यामुळे प्रत्येक दिवस हा चांगला होता. इतरवेळी तुम्ही शेतकरी स्टेटस पाहिले असतील. पण या खास दिवशीही तुम्ही शुभेच्छा संदेश पाठवून बैल पोळा (Bail Pola Wishes In Marathi) हा दिवस साजरा करायला हवा.

  1. आज बैलाले खुराक,
    रांधा पुरणाच्या पोळ्या,
    खाऊ द्या रे पोटभरी,
    होऊ द्या रे मगदुल
    बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. शिंगे घासली, बाशिंगे लावली,
    माढुळी बांधली,म्होरकी आवरली,
    तोडे चढविले, कासारा ओढला,
    घुगुंरमाळा वाजे खळाखळा,
    आज सण आहे बैल पोळा,
    बैलपोळाच्या शुभेच्छा!
  3. आज पुंज रे बैलाले
    फेडा उपकाराचे देणे,
    बैला, तुझा खरा सण,
    शेतकऱ्या तुझा रीन,
    बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा!
  4. जसे दिव्याविना वातीला,
    आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
    तसेच कष्टाविना मातीला,
    आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय,
    बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!
  5. आला बेंदूर शेंदूर,
    सण वर्षाचा घेऊन,
    खादेमळणी झाल्यावर,
    लागली चाहूल,
    सर्जा-राजा गेले आनंदून,
    शेतकरी बांधवाना बैलपोळाच्या शुभेच्छा!
  6. झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
    तिफन,कुळव,शिवाळ,
    शेती अवजारांचा आज थाट,
    औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
    शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!
  7. गेला तिफन, गेला कुळव,
    शिवाळ गेली, बैल गेले,
    ट्रॅक्टरचा जमाना आला,
    दारात नाही सर्जा राजा,
    नुसताच कोरडा बेंदूर आला,
    बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा!
  8. वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
    किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
    तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
    एका दिवसाच्या पुजेने हाऊ कसा उतराई
    बैल पोळाच्या शुभेच्छा
  9. डौल मोराच्या मानसा रं डौल मानाचा,
    येगं रामाच्या बाणाचा,
    तान्ह्या सर्जाची हं नाम जोडी,
    कुणा हुवीत हाती, घोडी माझ्या राजा रं,
    बैल पोळाच्या शुभेच्छा!
  10. आज आला सण बैलाचा,
    त्याच्या कौतुक सोहळ्याचा,
    बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!

श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

बैल पोळा एसएमएस (Bail Pola Festival In Marathi SMS)

Bail Pola Festival In Marathi Sms

Bail Pola Festival In Marathi SMS

ADVERTISEMENT

खूप जण आजही एसएमएस पाठवतात (Bail Pola Festival In Marathi SMS). बैल पोळ्याच्या दिवशी तुम्हाला शेतकरी बांधवांना आपण बैलपोळाच्या शुभेच्छा देऊ शकता.

  1. भारताच्या कृषी संस्कृतीचे महापर्व
    म्हणजे आमचा लाडका बैल,
    बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!
  2. आला रे आला बैल पोळा आला,
    गाव झालं सारं गोळा,
    सर्जा राजाला घेऊन जाऊया,
    सगळे राऊळा,
    बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
  3. भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत
    मुक्या जनावरांची पूजा करावी
    अशी शिकवण देणाऱ्या पोळा या सणांच्या
    सगळयांना हार्दिक शुभेच्छा!
  4. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील
    मुख्य घटक असलेल्या मुक्या प्राण्यांबद्दल कृतज्ञता,
    व्यक्त करण्याचा दिवस
    म्हणजे बैल पोळा!
  5. सण आला आनंदाचा,
    माझ्या सर्जा राजाचा,
    ऋणं त्याचे माझ्या भाळी,
    सण गावच्या मातीचा,
    बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
  6. कष्टाशिवाय मातीला
    आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही,
    हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या
    बैलांचा पोळा हा सण आला,
    बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  7. जिवा शिवांची बैल जोड,
    आला त्यांचा सण खास,
    बैल पोळ्याच्या शुभेच्छा !
  8. आज पुंज रे बैलाले फेडा उपकारांचे देेणे,
    बैला, खरा तुझा सण शेतकऱ्यांचा,
    बैल पोळ्याचा शुभेच्छा!
  9. आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
    आज जरा घे थोडीशी विश्रांती,
    आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
    कारण तुझ्यामुळेच पोट भागते आमचे आज,
    बैल पोळ्याच्या शुभेच्छा!
  10. वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून,
    काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती,
    सद्भभावना व्यक्त करण्याचा दिवस,
    बैल पोळा हार्दिक शुभेच्छा!

बैल पोळा कविता (Bail Pola Kavita)

Bail Pola Kavita

Bail Pola Kavita

बैल पोळा निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्हाला काही बैल पोळा (Bail Pola Poem In Marathi) कविता शेअर करायच्या असतील तर त्या देखील तुम्ही नक्कीच एकमेकांसोबत शेअर करु शकता.

1. सण बैलांचा,
आज पोळा,
गोठ्यातील बैल न्हाऊ घाला

ADVERTISEMENT

मखमली झुली रंगीत शिंगे,
कपाळी बांधली रेशीम बाशिंगे

धवळ्या पवळ्या सजले-धजले
गावभर बघा मिरवू लागले

आजच्या दिनी,
नाही कामधाम

पुरणपोळी खाऊन
मस्त आराम- धोंडीराम सिंह राजपूत

ADVERTISEMENT

2. आला आला सण पोळा
सण हा मराठ मोळा
पुरणपोळीचा नैवैद्य
सर्जाराजाला दावा

एक दिवस मायेचा
वर्षे कष्टात जायचा
आज आहे द्यायचा
गोड नैवेद्य खायचा

त्याला नटवा मिरवा
शिंगे नाजूक सजवा,
बाकदार पाठीवरती
झूल मखमली बसवा

गळ्यात घंटणी माळा
पायात घुंगरांच्या वाळा
आज आहे सण पोळा
सर्जा राजाला ओवाळा- मर्ढेकर

ADVERTISEMENT

3. रंगी- बेरंगी रंगानी
नटवले सारेच बैल
पाऊसही बरसला
हर्ष झाला सैल,

पोळ्यासह पावसामुळे
आनंदाने मन हसू लागले,
बैलांच्या या सोहळ्यात
माणसं खुशं दिसू लागले.

4. शिंगे रंगविली, बांशिंगे बांधली,
चढविल्या झुली, ऐनदार

राजा प्रधान, रतन, दिवाण,
वजीर, पठाण,तुस्त मस्त

ADVERTISEMENT

वाजंत्री वाजती,लेझीम खेळती,
मिरवती नैती,बैलांलागी

डुल डुलतात,कुणाची वशिंडे,
काही बांड खोडे अवखळ,

कुणाच्या शिंगाना बांधियले गोंडे,
हिरवे, तांबडे, शोभिवंत,

वाजती गळ्यात घुंगरांच्या माळा,
सण बैलपोळा, ऐसा चाले

ADVERTISEMENT

5. झुलींच्या खालती, काय नसतील,
आसुडांचे वळ उठलेले?
बैल पोळ्यांचा सण
नसे आज जुंपण
त्यास सजवून
आणावं मिरवून

बैला आंघोळ घालून
रंग अंगी लावून,
खांदा मळून,
काव हळदं लावून

शिंगे तासून
हिंगुळ बेगिड लावून,
टोंकी शेव्या बसवून
चौरी लटकवून

गळ टाकून मढवून
चंगाळी मनी बांधून
पितळी तोडा बांधुनी
कंडा गळी गुफूंन

ADVERTISEMENT

नाकी बेसनं घालुन
म्होरकी घालू नवीन
मस्तकी बांशिंग बांधून
झुली पाठी पांघरुन

मोरवी दिवा हुंगुनी
गोड तेल पाजूनी
पुरणपोळी नैवेद्य दावून
पुजा करील सुवासिन

आता या खास बैलपोळा शुभेच्छा संदेशांनी हा सण साजरा करा. शिवाय बैल पोळा सणाची माहिती मराठी तून शेअर करायला विसरु नका.

03 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT