ADVERTISEMENT
home / Uncategorized
Farmer Quotes In Marathi

जगाचा पोशिंदा बळीराजासाठी खास शेतकरी स्टेटस मराठीतून (Farmer Quotes In Marathi)

देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस म्हणजेच 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनातील योगदानाबद्दल 2001 पासून हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजा अर्थात शेतकऱ्याला ओळखलं जातं. शेतकरी काबाडकष्ट करून शेतात धान्य पिकवतात म्हणून आपण आपल्या घरात सुखाने चार घास खाऊ शकतो. भारतात बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागातील असून भारताचा मुख्य व्यवसाय शेती आहे. सहाजिकच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी बांधवांचा सर्वात मोठा वाटा आहे.

शेतकरी निसर्गाचा खरा मित्र आहे. कारण  त्याचे जमिनीशी असलेलं नातं हे मुल आणि आईप्रमाणे असतं. आजही आपल्या देशात शेतकरी जमिनीला आईचा दर्जा देतो  आणि मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो. त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे. मात्र असं असूनही आपल्या देशात शेतकऱ्यांची अवस्था दयनिय आहे. जगाला आपल्या कष्टाने पोसणाऱ्या शेतकऱ्यावरच आत्महत्या करण्याची वेळ येते तेव्हा मन गलबलून जाते. जसं बैलाच्या प्रती प्रेमापोटी आपण बैल पोळा स्टेटस (Bail Pola Status In Marathi) शेअर करतो. तसंच शेतकऱ्यांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याची मान अभिमानाने उंचावण्यासाठी हे शेतकरी स्टेटस (Farmer Quotes in Marathi) नक्कीच फायदेशीर आहेत. त्यासोबतच वाचा जाणून घ्या सेंद्रिय शेतीचे फायदे.

शेतकरी स्टेटस मराठी (Shetkari Status In Marathi)

Shetkari Status In Marathi
Shetkari Status In Marathi

शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार… मात्र त्याची व्यथा आणि त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत. यासाठीच मराठी शेतकऱ्यांसाठी खास शेतकरी स्टेटस मराठीतून (Shetkari Marathi Status).

1. करूनी आपल्या रक्ताचे पाणी, शेत पिकवी कष्टकरी

ADVERTISEMENT

2. अन्नधान्य पिकवेल शेतकरी तर देशात नांदेल सुखसमृद्धी

3. शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे देशाचा  खरा भाग्यविधाता

4. जन जनात संदेश पोहतवूया, बळीराजाला आत्महत्येपासून रोखूया

5. कष्टाची खाऊनी भाजीभाकरी, आनंदाने गाणी गातो शेतकरी

ADVERTISEMENT

6. शेतकरी टिकेल तर शेत पिकेल

7. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे समजलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो.

8. देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल? म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला

9. खाऊन भाकर पिऊन पाणी, कष्ट करी शेतकरी

ADVERTISEMENT

10. वावर आहे तर पावर आहे

यासोबतच वाचा जागतिक जल दिवसानिमित्त ’50’ पाणी वाचवा घोषवाक्य

शेतकऱ्यांसाठी खास सुविचार मराठीतून (Farmer Quotes In Marathi)

Farmer Quotes In Marathi
Farmer Quotes In Marathi

शेतकरी म्हणजे सर्जा राजा, कष्ट करतो, घाम गाळतो आणि धान्य पिकवून साऱ्या जगाला जगवतो…. अशा आपल्या बळीराजाचा राज्यात सुख समृद्धी नांदावी यासाठी सर्वांना माहीत असायला हवे हे शेतकऱ्यांचे खास सुविचार (Quotes On Farmer in Marathi).

1. ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल, त्या दिवशी  या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल

ADVERTISEMENT

2. स्वतःचं घर गळत असूनही पावसाची अपेक्षा करत असतो तो फक्त शेतकरी

3. पॉपर्टी नव्हे जीव गहाण ठेवून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती

4. पगारवाढ होऊनही लोक नाराज दिसतात, शेतकरी नुसतं आभाळ भरून  आलं तरी खुश असतो

5. जो पाण्याने अंघोळ करतो, तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने अंघोळ करतो, तो इतिहास बदलू शकतो… शेतकरी

ADVERTISEMENT

6. मी तर शेतकरी आहे, क्षणभर थांबेन, पावसाची रिमझिम होताच मी उठून पु्न्हा कामाला लागेन.

7. जगाला आता समजेल की पैसा कितीही असला तरी खायला अन्नधान्य लागतं, तोच शेतकरी आता घरी निवांत झोपतोय  आणि बाकीच्या लोकांची सध्या झोपच उडालीय.

8. कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा, शेतात राबतो आपला सर्जा राजा. 

9. शेतकरी असता सक्षम, शेत पिकेल भक्कम.

ADVERTISEMENT

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्य (Save Environment Slogan In Marathi)

शेतकरी दिनानिमित्त कोट्स मराठीतून (Farmers Day Quotes In Marathi)

Farmers Day Quotes In Marathi
Farmers Day Quotes In Marathi

भारतात 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. यासाठीच या खास दिनानिमित्त शेतकरी बांधवांना पाठवा हे शेतकरी दिन स्टेटस (Farmers Day Marathi Status).

1. इडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे.

2. काळी माती त्याची शान, राबतो तिच्यात विसरूनी भान.

ADVERTISEMENT

3. ज्याचे कष्ट दमदार असते त्यांचे जगणे आणि वागणे रूबाबातच असते… शेतकरी 

4. कष्टाच्या पैशावर माज करण्यात जी मजा आहे ती हरामीच्या पैशांवर नाही… शेतकरी

5. कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा, रात्रभर झोप लागणार नाही, विचार करा… शेतकऱ्याचं काय होत असेल.

6. रात दिस मेहनत करी, खाई कष्टाची भाकरी, पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी.

ADVERTISEMENT

7. पैशाला कधीच किंमत नसते, खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टालाच असते… शेतकरी.

8. नको लावूस फास गळा बळीराजा, तूच  आहेस या देशाचा पोशिंदा.

9. बळीराजा तू घेऊ नको फाशी, जग राहील तुझ्याविण उपाशी.

10. बळीराजा माझा लय इमानी, कष्टाने पिकवितो पीकपाणी.

ADVERTISEMENT

वाचा – बैल पोळा सणाबद्दल संपूर्ण माहिती

शेतकरी शायरी मराठीतून (Shetkari Shayari Marathi)

Shetkari Shayari Marathi
Shetkari Shayari Marathi

शायरी म्हणजे मनातील भावना मुक्तपणे आणि दिलखुलास मांडणं… शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे काबाडकष्ट आणि मेहनत. पण या कष्टालाही एक सुंदर सुंगध असतो तो सुंगध पसरवणाऱ्या या शेतकरी शायरी (Shetkari Shayari Marathi) अवश्य वाचा आणि पाठवा आपल्या शेतकरी मित्रांना.

1. कितीही गरीब असला तरी शेतकरी अमाप देतो, इतके झुकते मात सांगा कुणाचा बाप देतो!

2. भावनेसोबत त्याच्या बघा ना काय थट्टा झाली…सोयाबीन विकताना दलाली झाली, पोटाला जगताना मात्र त्याच सोयाबीन तेलाची किंमत दुप्पट झाली!

ADVERTISEMENT

3. मातीमधून सोनं पिकवतो, निळ्या आभाळाखाली रान, वीतभर जमीन माझी मजला देते शेतकऱ्याचा बहुमान.

4. शेताच्या बांधावर बसून शेतीची कामं होत नाहीत आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय त्याची दुःखे कळत नाहीत!

5. निसर्गाने दिली साथ तर पुन्हा येईल माझ्या बळीराजाचं राज्य, तुमच्या माझ्या मनातील आपले हक्काचे अधिराज्य

6. येतो अवकाळी पाऊस, नेतो शेतीला वाहून, कधी कधी तर आकाशातून थेंबही पडत नाही, शेतकरी थकतो वाट पाहून…

ADVERTISEMENT

7. म्हटलं आत त्याच्याबद्दल लिहावं काहीतरी, जो करचो रात्रंदिवस शेतमाऊलीची वारी, पण नंतर लक्षात आलं खूप मोठी आहे शेतकऱ्याची कथा, सांगायला बसलो कर संपणार नाही गाथा

8. शेतकऱ्यांच्या अडचणी तोपर्यंत कुणालाच दिसत नाहीत, जोपर्यंत तो लोकांच्या समोर विद्रोह करत नाही

9. असा कसा रे तू अवकाळी गारांसह बरसतो, आम्हा शेतकऱ्यांचे छोटेसे स्वप्न धुळीला मिळवतो

10. पूजा करतो मी जमीनीची, पुरखाची संपत्ती काळी माती, बिज पेरल्यावर उगवतं सोनं, धान्य भरघोस देते काळी धरणी!

ADVERTISEMENT

शेतकरी स्लोगन मराठीतून (Farmer Slogans in Marathi)

Farmer Slogans in Marathi
Farmer Slogans in Marathi

शेतकऱ्यांच्या आयुष्याची कथा आणि व्यथा सांगणारी घोषवाक्य म्हणजेच स्लोगन देशातील प्रत्येकाला माहीत असायला हवे. कारण शेतकरी धान्य पिकवतो तेव्हा आपण घरात आनंदात जेवतो. यााठीच शेतकऱ्यांच्या सन्मान करा आणि शेअर करा शेतकरी स्लोगन (Farmer Slogans in Marathi)

1. जय जवान जय किसान

2. शेतकऱ्याचा करू या सन्मान, यातच  आहे देशाता अभिमान

3. बळकट असता शेतकरी, होईल उन्नती घरोघरी

ADVERTISEMENT

4. साधी राहणी मजबूत बांधा, तोच आहे शेतकरी राजा

5. समृद्ध शेतकरी, सुखी शेतकरी

6. गाऊ आपण निसर्गाची गाणी, पुसून टाकू शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी

7. जमिनीवर एकच तारा, शेतकरी आमचा न्यारा

ADVERTISEMENT

8. करूनी सर्व संकटावरी मात, शेतकरी राबतो दिवसरात

9. जोडूनी काळ्या मातीशी नाळ, शेतकरी कष्टाने करतो काळावर मात

10. करूनी कष्ट गाळुनी घाम, असा आहे आपला शेतकरी महान

22 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT