ADVERTISEMENT
home / Vastu
लग्नात का येतात अडथळे

लग्नात अडथळे का येतात, घ्या जाणून

 लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील असा सोहळा आहे जो अगदी परफेक्ट व्हावा असे प्रत्येकाला वाटते. पण अनेकदा लग्न ठरल्याच्या कालावधीपासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अगदी लग्नाचा दिवस येईपर्यंत अनेकांच्या मनात धाकधूक सुरु असते. लग्न म्हटले की, थोडे टेन्शन आलेच. सगळे काही मनाप्रमाणे आणि नीट होण्यासाठी जी काही धडपड आपण करतो त्यामुळे कधीकधी काही अडथळे निर्माण होतात. शारीरिक थकवा यामुळे येणारे आजारपण हा एक अडथळा  येतोच. पण अनेकदा अचानक आलेली आजारपण, होणारे मतभेद यामुळे अधिक काळजी वाटू लागते. वास्तूच्या दृष्टिकोनातून लग्नात काही कारणामुळे अडथळे येणे हे साहजिक असते. त्यावर योग्य उपाय तुम्ही वेळीच केले तर त्यातून बाहेर पडण्यास तुम्हाला मदत मिळते.

लग्नात अडथळे येत असतील तर हे सोपे उपाय येतील कामी

  1. लग्नाचा कालावधी जवळ आला असेल तर घरात थोडी लगबग सुरु होते. खर्चाचा ताळमेळ बसताना बरेचदा काही वाद होतात. अशावेळी घरात थोडेसे नकारात्मक वातावरण निर्माण होते. अशावेळी तुम्ही घरी सकारात्मक वातावरण निर्माण करा. घरात ताजी फुलं आणून ठेवा. ताज्या फुलांमुळे घरात एक छान मंद सुगंध तर येतोच शिवाय आनंदीही वाटते. 
  2. लग्न घरात नेहमी वाहता वारा आणि प्रकाश हवा. जर तुमच्या राहत्या घरात अंधार असेल तर तो तुम्ही आताच घालवा. घरात वारा येण्यासाठी खिडक्या, लाईट्स असू द्या त्यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल. 
  3. लग्नात सतत अडथळा येत असेल तर तुम्ही काही दिवस काळा रंग घालणे टाळा. काळ रंग हा निराशेचा प्रतीक मानला जातो.  हा रंग राहू, केतू आणि शनि यांचे प्रतिनिधित्व करतो.या रंगामुळे कामात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे काळा रंग या काळात टाळा. 
  4. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ आहे अशांच्या लग्नातही अनेक अडथळे येतात. अशांची लग्न ठरतानाच आधीच अडथळा येतो. त्यात लग्न होईपर्यंत अडथळा येत राहतो. अशावेळी योग्य सल्ला घेऊन हा अडथळा सोडवून घ्यावा.नाहीतर लग्न होईपर्यंत हा अडथळा सुरुच राहतो. 
  5. अनेकदा लग्नात येणाऱ्या अडथळ्यांकडे आपण दुर्लक्ष करत असतो. काही लग्नात अगदी सुरुवातीपासून अडथळा येत असतो. बरेचदा असे संकेत येत मिळत असतील तर त्याचा पूनर्विचार करण्याची गरज आहे का?  याकडे देखील लक्ष द्या. 
  6. लग्नात सतत कोणाला आजारपण येत असेल तर तुम्ही संकटनिवारण गणपतीची आराधना मनापासून करा. या संकटातून बाहेर येण्यासाठी तुम्ही मनोभावे प्रार्थना करा. 
  7. हिंदू मान्यतेनुसार कृष्ण हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो. लग्नाच्या काळात तुम्ही कृष्णाची पूजा रोज मनोभावे करा. त्यामुळे नवरा-बायकोचे प्रेम टिकवून राहण्यास मदत मिळते. 
  8. लग्न घरात कामांचा व्याप खूप असतो अशावेळी घराची स्वच्छता राखणे खूप जणांना जमत नाही. अशावेळी घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळे तुम्ही घरात स्वच्छता राखा. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा टिकून राहते. 

आता लग्नात अडथळा येत असेल तर तुम्ही नक्की या गोष्टीची नक्की काळजी घ्या. थोडासा संयम ठेवा. घाबरुन जाण्यापेक्षा अडथळा येणाऱ्या गोष्टी कमी करा.

अधिक वाचा

पैसे वाचवायचे असतील तर ब्राईडने या गोष्टी टाळाव्यात

ADVERTISEMENT

लग्नासाठी ऑनलाईन शॉपिंग करताना या गोष्टी ठेवा लक्षात

कडक मंगळ आणि सौम्य मंगळ, फायदे आणि तोटे

लग्न कुंडली कशी पाहावी | कसा पहावा विवाह योग मराठी

04 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT