आपल्या भारतीय संस्कृतीत गायीचे स्थान खूप वरचे मानले गेले आहे. गायीला मातेचा दर्जा दिलेला आहे. म्हणूनच शुभ प्रसंगी गायीची पूजा केली जाते. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात अशी आपल्या सनातन धर्माची धारणा आहे. म्हणून गायीला पवित्र मानून तिची पूजा केली जाते. गोमय व गोमूत्र देखील आपल्याकडे पवित्र मानले जाते. दिवाळी या मोठ्या सणाची सुरुवातच सवत्सधेनूच्या पूजेने केली जाते. समुद्रमंथनातून जी तेरा रत्ने बाहेर पडली त्यात नंदिनी, शुभदा, सुशीला, सुरभी व बहुला या पाच कामधेनू देखील होत्या असे म्हणतात. गायीचे तूप शुभकार्यात होमहवन करण्यासाठी तर वापरले जातेच पण ते औषधी देखील असते. पूजेच्या वेळी शुभचिन्हे असलेली रांगोळी काढली जाते. त्या शुभचिन्हांत गोपद्म म्हणजेच गायीची पावले देखील आवर्जून काढली जातात. घरात लक्ष्मीचे म्हणजेच पर्यायाने सुख-समृद्धी व ऐश्वर्याचे आगमन व्हावे म्हणून गायीची पूजा केली जाते. अशी ही गोमाता पवित्र व शुभ गोष्टींशी जोडली गेली आहे. याचप्रमाणे फेंगशुई मध्ये देखील गायीला महत्व आहे.
वास्तुशास्त्राप्रमाणेच फेंग शुई देखील प्रभावी
भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे उपाय केले तर घरातील नकारात्मक परिस्थिती बदलून सकारात्मक बदल घडू लागतात असा अनेकांचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे चिनी वास्तुशास्त्र फेंगशुईचे उपाय देखील खूप प्रभावी मानले जातात. फेंगशुईमध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. अशा अनेक वस्तू फेंगशुईमध्ये आहेत, ज्या घरात किंवा ऑफिसमध्ये योग्य दिशेला ठेवल्यास आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडू लागतात. यापैकी एक म्हणजे फेंगशुई गाय होय. भारताप्रमाणेच फेंगशुईमध्येही गायीला महत्वाचे स्थान आहे. गाय ही सुखसमृद्धीचे, समाधानाचे प्रतीक आहे. म्हणूनच इच्छापूर्ती आणि मानसिक शांतीसाठी फेंगशुई गाय घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवली जाते. फेंगशुई गायीची मूर्ती अनेक प्रकारांमध्ये मिळते आणि प्रत्येक प्रकाराची वेगवेगळी उद्दिष्टे व फायदे आहेत. आपल्या मनात जी इच्छा असेल तिला अनुसरून आपण फेंगशुईनुसार गाईची विशिष्ट प्रकारची मूर्ती घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकतो. जाणून घ्या कोणते उद्देशासाठी कुठल्या प्रकारची मूर्ती आणावी.
फेंगशुई गायीच्या मूर्तीचे विविध प्रकार
फेंगशुईनुसार घर किंवा ऑफिसमध्ये गायीची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते. गाय ही सहनशीलतेचे प्रतीक आहे त्यामुळे वास्तूत गायीची मूर्ती ठेवल्यास व्यक्तीची सहनशीलता वाढते, ज्यामुळे ती व्यक्ती योग्य निर्णय घेण्यास सक्षम होते. चायनीज वास्तुशास्त्रानुसार, वासराला दूध पाजणाऱ्या गायीची मूर्ती घरात ठेवल्यास जोडप्यांना अपत्यसुख प्राप्त होते. अपत्यसुखाची इच्छा बाळगणाऱ्या जोडप्याने गायीची ही मूर्ती आपल्या बेडरूममध्ये अशा ठिकाणी ठेवावी जी वारंवार त्यांच्या नजरेस पडेल.
जर एखाद्याला त्याच्या आयुष्यात कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत असेल किंवा त्याची परिस्थिती खराब असेल तर त्याने त्याच्या घरात किंवा ऑफिसमध्ये फेंगशुई गाय ठेवावी. असे केल्याने त्याचा त्रास कमी होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी किंवा घरात गायीची मूर्ती ठेवल्याने त्या वास्तूत सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि असे केल्याने मानसिक शांती मिळते. फेंगशुईनुसार गायीची मूर्ती घरामध्ये आग्नेय दिशेला ठेवणे शुभ असते.
वास्तू आणि फेंगशुईमध्ये नाण्यांची चळत असलेल्या जागी बसलेल्या किंवा त्यावर बसलेल्या गायीची मूर्ती खूप शुभ मानले जाते. ही मूर्ती घरात किंवा कार्यालयात कुठेही ठेवता येते. ही मूर्ती वास्तूमध्ये ठेवल्यास घराची किंवा संस्थेची भरभराट होते व वास्तूत सुखसमृद्धी नांदते अशी मान्यता आहे.
तुम्हालाही घरात सकारात्मक लहरी हव्या असतील तर फेंगशुईची गायीची मूर्ती ठेवा.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक