ADVERTISEMENT
home / बिग बॉस
विकास- विशाल पाटील

ही दोस्ती तुटायची नाय… विशाल- विकासने घेतलं ज्योतिबाचं दर्शन

 एखाद्या रिॲलिटी शोमध्ये तयार झालेलं नातं टिकवणं थोडं कठीणचं काम असतं. अनेकदा फायद्यासाठी केलेली नाती बाहेर आल्यानंतर फारशी टिकत नाहीत. तर काही नाती ही काही केल्या तुटत नाही. नुकतेच मराठी बिग बॉस संपले आहे. या पर्वामध्ये विजेता विशाल निकम आणि विकास पाटील यांची चांगलीच मैत्री दिसून आली होती. आता हे पर्व संपले तरी त्यांची ही दोस्ती तुटायची नाय… दोस्ती अजूनही दिसून येत आहे. विशाल निकमने काही फोटो शेअर केले आहे. या दोघांनी त्यांच्या नव्या वर्षाची सुरुवात ज्योतिबाचं दर्शन करुन  केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन्सना आनंद झाला आहे.

वर्षाची सुरुवात ज्योतिबाच्या दर्शनाने

घरातून बाहेर पडल्यापासून या स्पर्धकांमागे नुसता मुलाखतीचा धडाका आहे. त्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही इंटरव्ह्यू सुरु आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर मैत्रीसाठी काहीही म्हणत विकाससोबत विशालने ज्योतिबा आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन नात्याला सुरुवात केली आहे. त्यावर त्याने लिहिलेले कॅप्शनही भावणारे आहे.
‘बिग बॉस मध्ये बोललो होतो भावा ही journey सुरू झालीय आणि ही कधीच संपणार नाही!

बिग बॉसच्या बाहेरचा प्रवास अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दर्शनाने सुरू केलाय.🙏 चांगभलं!!

ही दोस्ती तुटायची नाय!!’

ADVERTISEMENT

विशाल-विकासची मैत्री अशीच टिकावी

घराच्या बाहेर आल्यानंतर खूप जणांमध्ये समीकरणं बदलताना दिसली आहेत. घरात होणारी प्रेम प्रकरण चांगली गाजतात. पण घराबाहेर आल्यानंतर काहीच दिवसात ती नाती तुटताना प्रेक्षकांनी देखील पाहिली आहेत. या पर्वात प्रेम प्रकरण होऊ शकली नाहीत. पण मैत्रीची उदाहरणं खूप दिसून आली. विशाल-विकास आणि जय- उत्कर्ष यांची ही जोडी प्रेक्षकांना देखील आवडली. त्यामुळे या पर्वात एक वेगळीच मजा अनुभवता आली. शेवटी चार स्पर्धकांमध्ये या  मित्रांच्या जोडीचा समावेश होता. विकास या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर जय- विशालमध्ये जो कोणी जिंकेल त्याचा आनंद दुसऱ्या मित्राला हमखास होणार होता. ही मैत्री अशीच कायम टिकावी असे देखील खूप जणांना वाटत आहे. 

सौंदर्याचा शोध सुरु

आता विशाल निकमच्या मागे आणखी एक ससेमिरा लागला आहे तो म्हणजे सौंदर्याचा. घरात असताना त्याने त्याला आवडणारी व्यक्ती ही घराबाहेर आहे आणि ती आपली वाट पाहात आहे असे सांगितले होते. तिचे नाव सांगण्यास त्यानेे नकार दिला होता. त्याने तिच्या नावाचा उल्लेख कधीही केला नाही. त्यामुळे ही सौंदर्या नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न सगळ्यांना अजूनही पडला आहे. कारण विशालने घरात आई आल्यानंतर तिच्याबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर घरात आलेल्या मीडियाने देखील त्याला हा प्रश्न विचारला होता. पण विशालने सगळ्यांना थेट लग्नाला बोलवू असे सांगून विषय टाळला हे नक्की! पण सौंदर्याचा शोध हा कायम सुरुच आहे. 

या दोघांची दोस्ती अशीच टिकावी… अशी अपेक्षा त्यांच्या फॅन्सना देखील आहे. बाकी या दोघांनी वर्षाची सुरुवात उत्तम केली यात काही वाद नाही. 

03 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT