वर्क फ्रॉम होम करून गेली दोन वर्ष सर्वांना नक्कीच कंटाळा आला आहे. मात्र कोरोनाच्या काळात घरातून काम करणं हा जीवनशैलीचा एक भागच बनत चालला आहे. घराबाहेर जाण्याची वेळ येत नसल्यामुळे मग घरातील पजामा आणि हाय बन हीच तुमची स्टाईल होत चालली आहे. केस वर बांधून काम करणं कितीही सोयीचं असलं तरी केसांसाठी ते मुळीच योग्य नाही. जर तुम्ही देखील ही चुक करत असाल तर वेळीच सावध व्हा आणि जाणून घ्या केसांचा अंबाडा बांधून ठेवण्याचे दुष्परिणाम
बन हेअरस्टाईलचे दुष्परिणाम (Bun Hairstyle Side Effects)
कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम करतानाच नाही तर अनेकींना अंबाडा बांधून ठेवण्याची सवयच असते.
कॉलेज, ऑफिस, बाहेर फिरण्यास जाताना, शॉपिंगसाठी जाताना, पिकनिकसाठी असं कोणत्याही कारणासाठी बन हेअर स्टाईल करणं पसंत केलं जातं. बन हेअर स्टाईल करणं अतिशय सोपं असल्यामुळे यासाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही. मात्र या हेअर स्टाईलचे तुमच्या केसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यासाठी जाणून घेऊ या यामुळे केसांवर नक्की काय परिणाम होतो.
केस पातळ होतात –
सतत हाय बन अथवा घट्ट अंबाडा घातल्यामुळे तुमचे केस पातळ होतात. हेअर लाईन पातळ झाल्यामुळे कालांतराने तुमचे पुढच्या दिशेने टक्कल दिसू लागते. याचं कारण केस घट्ट बांधल्यामुळे ताणले जातात आणि कमजोर होत तुटतात. यासाठी सतत केस वर बांधून ठेवू नयेत. केस पातळ होण्यामागे असू शकतात ही देखील काही कारणं
डोकदुखी जाणवते –
जर तुम्ही नेहमी केस वर बांधून ठेवत असाल तर नेहमी तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. याचं कारण स्काल्प आणि चेहऱ्याच्या नसा ताणल्या जातात. सतत या नसा ताणल्यामुळे त्याचा परिणाम डोकेदुखीमध्ये दिसू लागतो. जर तुम्हाला सतत डोकं दुखत असल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमची हेअर स्टाईल बदलण्याची ही वेळ आहे हे ओळखा.
केस मोठ्या प्रमाणावर गळणे –
बऱ्याचजणींना असं वाटत असतं की केस वर बांधून ठेवले तर ते कमी गळतील. तर तुम्ही एका मोठ्या गैरसमजात आहात. केस वर बांधून ठेवल्यामुळे अथवा घट्ट बांधल्यामुळे ताणून कमजोर होतात आणि तुटतात. म्हणजेच केस बांधल्यामुळे जास्त प्रमाणावर गळण्याची शक्यता असते. तुम्ही जेव्हा तुमचा बन सोडता तेव्हा तुम्हाला जास्त प्रमाणात केस गळल्याचे दिसू शकते. यासाठी केस वर बांधून ठेवणं टाळा. पावसामुळे खूप गळत असतील केस तर करा हे घरगुती उपाय
इनफेक्शनचा धोका –
इतर हेअर स्टाईलपेक्षा हाय बनमुळे तुम्हाला इनफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. कारण या हेअर स्टाईलमध्ये स्काल्पला हवा लागत नाही. केसांमध्ये घाम साचल्यामुळे तुमच्या केसांमध्ये वास आणि चिकटपणा निर्माण होतो. ज्याचा परिणाम केसांमध्ये इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते. यासाठी नेहमी केस वर घट्ट बांधून ठेवणे योग्य नाही. ब्राम्हीने थांबेल केस गळणे, जाणून घ्या कसा करावा वापर