वेगवेगळ्या साड्या नेसण्याची आवड तुम्हाला असेल तर तुमच्या कपाटात एक चंदेरी साडी ही अगदी हमखास असायला हवी. हलकी-फुल्की, कधीही नेसता येणारी अशी ही साडी चारचौघात तुमचा लुक वाढवणार नाही असे मुळीच होणार नाही. साडीवर असलेले बारीक नक्षीकाम. सोने-चांदीच्या जरीचे काम असे या साडीचे वैशिष्ट्य आहे. काळानुसार या साडीमध्ये अनेक बदल झाले आहेत. प्युअर चंदेरीसारखी दिसणारी अशी साडी देखील आता बनवून मिळते. पण त्याला ओरिजनल साडीची अजिबात सर नाही. 10 हजार रुपयांच्या पुढेच या साड्या असतात. या साड्या कोणत्याही समारंभासाठी अगदी परफेक्ट आहेत. जाणून घेऊया चंदेरी साड्यांची खासियत
जुन्या साडीचे ड्रेस डिझाईन आणि हटके पॅटर्न्स (Old Sadicha Dress Design In Marathi)
चंदेरी साडीचे मूळ
इतिहासात चंदेरी साडीची नोंद फार पूर्वीपासून आहे. साधारण तेराव्या शतकात राजा शिशुपाल याच्या राज्यकाळात त्याच्या राज्याची राजधानी चंदेरी. या परीसरात या साडी विणण्याचे काम चालत असे. ही साडी बनवण्याचे काम खास कारागीर करत होते. मध्यप्रदेशातील अशोक नगर येथे चंदेरी नावाचे एक गाव आहे. जे इसवीसन पूर्व 1350 साली शिशुपाल राजाचे राज्य होते. चंदेरी साडी ही मुळात नऊवारी. कारण पूर्वी नऊवारी साड्या नेसल्या जात होत्या. पण हल्ली 6 वारीप्रकारातही या साड्या मिळतात. ही साडी कॉटन, सिल्क, रेशम अशा प्रकारात मिळते.
चंदेरी साडीचे वैशिष्ट्य
चंदेरी साडी ही तिच्या नक्षीकामामुळे वेगळी दिसते. या साडीवर अगदी कमी प्रमाणातील जरीकाम केले जाते. यावर फुलं, मोर आणि नाणी यांचे नक्षीकाम असते. या साडीचा काठही विशेष असतो. कारण याचा काठ विरुद्ध दिशेला विणला जातो. तर त्यानंतर एक जरीची पट्टी असते. या साडीवर थोडासा बनारसचाही परिणाम जाणवतो. कारण ज्याप्रमाणे बनारसी साड्यांमध्ये मीना कारी काम, फुलं, कैरी बुट्टी असे काम असते. असे या साड्यांमध्ये देखील जाणवते. यामधील काही नव्या डिझाईन्सही फारच प्रसिद्ध आहेत.
चंदेरी साडी नेसायला सोप्या
चंदेरी साड्यांमध्ये राजघराण्याचा वारसा आहे. त्यामुळे या साड्या अगदी कोणत्याही समारंभामध्ये चारचांद आणण्याचे काम करतात. पूर्वी या साडया फिक्कट रंगातच मिळायच्या पण आता या साड्या गडद रंगांमध्येही मिळतात. ज्या दिसायला फारच सुंदर दिसतात. अशा साड्यांवर तुम्हाला कमीत कमी ज्वेलरी आणि सुंदर दागिने घालता येतात. त्यामुळे अशा साड्या फार उठून दिसतात. कॉटन आणि सिल्क अशा प्रकारात या साड्या असल्यामुळे या साड्या मुळातच वजनाला हलक्या असतात. त्यामुळे नवरीही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी अशाप्रकारे या साड्या नेसू शकते.
चंदेरी साड्यांची काळजी
आता या साड्या किती प्रेमाने आणि काळजीने बनवलेल्या असतात हे कळल्यानंतर या साड्यांची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे.
- चंदेरी साड्या कधीही गरम पाण्यात धुवू नका. नाहीतर त्याचा गोळा होतो. एका बादलीत साधे पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे माईल्ड डिटर्जंट घाला त्यात साडी बुडवा आणि पाण्यातून काढून धुवा.
- साडी वाळत घालताना त्याचे जरी काम बाहेरच्या बाजूला असू द्या. त्यामुळे त्याचा मु्ख्य लुक खराब होत नाही.
- साडी अधूनमधून काढून त्याची घडी मोडा. कारण त्यामध्ये असलेली जर खराब होऊ शकते. तिला डाग पडू शकतात.
- इस्त्री करतानाही विशेष काळजी घ्या. आतील बाजूने इस्त्री करा.
आता चंदेरी साड्यांची माहिती घेतल्यानंतर अवश्य या साड्यांची खरेदी करा.
Cotton and Handloom Blouse Designs: कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स