ADVERTISEMENT
home / मनोरंजन
देवमाणूस 2

‘देवमाणूस 2′ मालिकेची दणक्यात सुरुवात

 मराठी मालिका विश्वाचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक मालिका भेटीला आली आहे. देवमाणूस 2 याची खूप दिवसापासून चर्चा सुरु होती. पण आता ही मालिका फ्लोअरवर आली आहे. या मालिकेचे दोन भाग प्रसारित झाले असून या नव्या सीझनमध्येही सगळ्यांची कामगिरी एकदम दमदार दिसत आहे. या मालिकेची सुरुवात एकदम दणक्यात झाली असून अनेक पात्र नव्या रुपात पुन्हा एकदा दिसून आल्यामुळे खूप जणांना आनंद झाला आहे. या मालिकेतील देवमाणूस म्हणजेच डॉ. अजित कुमार देव दिसला आहे. एकीकडे तो मेला असे दाखवण्यात आलेले असताना आता त्याला पाहून काहीतरी वेगळे घडणार याचा अंदाज येत आहे.

डिंपल झाली स्टार

पहिल्या सीझनचा शेवट हा असा झाला होता की,डॉक्टरांचे नेमके काय झाले याचा प्रश्न सगळ्यांना पडला होता. या खेळात डिंपल हिची भूमिका देखील महत्वाची होती. कारण डॉक्टरांना खून करण्यासाठी मदत करणारी हे एकमेव असे पात्र होते. डिंपलने केवळ सिनेमात काम मिळावे यासाठी डॉक्टरांना साथ दिली होती. आता या सीझनमध्ये खोट का होईना ती अभिनेत्री झाली हे दाखवण्यात आले आहे. ती पहिल्याच भागात ज्यावेळी पाहुणी कलाकार म्हणून येते ते पाहून खूप जणांना आनंद झाला. तिचे हे रुप पाहता डॉक्टरानी कमावलेल्या पैशातूनच तिने हे सगळे कमावले असे दिसत आहे. पण असे असताना डिंपलचे वडील मात्र दारुच्या नशेत दिसत आहेत. त्यामुळे आता हा नेमका काय गोंधळ आहे तो पुढे पाहिल्यानंतर कळेल.

तेजस्विनी आणि संजय जाधव यांचा ट्रिपल धमाका

राजस्थानमध्ये आहे डॉ. अजित कुमार 

महाराष्ट्रातील हा भुरटा डॉक्टर आता राजस्थानमध्ये जाऊन लपून बसला आहे. डॉ. अजित कुमार देव यांना पाहून खूप जणांना आश्चर्य वाटले. पण महाराष्ट्रातून थेट राजस्थान गाठण्याची वेळ का आली आहे? हे खूप जणांना वाटू लागले आहे. पण इतके करुनही अजित कुमार देव हा अजिबात बदलेला दिसत नाही. त्याने राजस्थानी रुप घेतले असले तरी त्याच्यामधील महिलांना पाहण्याची नजर आणि त्यातून चुकीच्या मार्गाला जाण्याची वृत्ती दिसून येत आहे. आता पुन्हा एदका तो पैशांच्या नादाला लागून आणि बाईच्या नादाला लागून पुन्हा एकदा गुन्हा करण्याची शक्यता दिसून येत आहे. या मालिकेचे भाग खरेखुरे राजस्थानमध्ये शूट करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा लुक हा एकदम ओरिजनल दिसत आहे.

ADVERTISEMENT

देवमाणूस पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आजी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये

या मालिकेत आजी हे पात्र खूप जणांना आवडलेलं होतं. आता पुन्हा एकदा आजी ही या मालिकेत दिसणार आहे. आंधळी असून देखील डॉ. अजित कुमार देव हा चांगला नाही हे सगळ्यांना कळून चुकले होते. आता पुन्हा एकदा ही आजी सगळ्यांना भेटायला आली आहे. आजी पुन्हा एकदा या देवमाणसाच्या विरोधात दिसून येत आहे. पण आता ज्यावेळी हा भुरटा डॉक्टर ज्यावेळी परत येईल त्यावेळी तिची प्रतिक्रिया काय असेल ते पाहण्याची उत्सुकता देखील सगळ्यांना आहे. 

आता तुम्ही अजूनही ही मालिका पाहिली नसेल तर नक्की पाहा.

किरण गायकवाडने शेअर केल्या भावना, देवमाणूस संपल्यानंतर झाला भावूक

ADVERTISEMENT
21 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT