ADVERTISEMENT
home / मनोरंजन
pooja banerjeee

अभिनेत्री पूजा बॅनर्जीने चाहत्यांना दिली गोड बातमी, मार्चमध्ये देणार बाळाला जन्म

सध्या ‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya) मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री पूजा बॅनर्जी (Pooja Banerjeee) ने आपण आई होणार असल्याचे एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. पुढच्या वर्षी मार्चमध्ये देणार बाळाला जन्म असेही तिने सांगितले आहे. मात्र पूजा अजूनही सेटवर जात असून काम करत आहे. पूजाने सेटवरदेखील ही गोड बातमी सांगितल्यानंतर सर्वाच्या प्रतिक्रिया कशा होत्या याबाबत मुलाखतीमध्ये सांगितले आहे. 

पूजा होणार आई

पूजाने आपला आई होण्याचा आनंद व्यक्त केला आहे. आपल्याला आई होणार हे कसं कळलं याबाबतदेखील पूजाने स्टोरी सांगितली. ‘मला काहीतरी वेगळं वाटलं त्यामुळे मी एकदा शूटिंगला जाण्यापूर्वी ब्लड टेस्ट करून घ्यायला गेले. साधारण संध्याकाळी 4 च्या आसपास मला रिपोर्ट्स मिळाले आणि मला त्यामध्ये मी आई होणार असल्याचे समजले. त्यादिवशी मी माझा नवरा संदीपला मला घ्यायला ये असं कळवलं कारण मला इतकी आनंदाची बाब अजिबात फोनवर सांगायची नव्हती. जेव्हा संदीपला ही गोष्ट कळली तेव्हा आम्ही दोघेही आनंदाने वेडे झालो. आम्हाला दोघांनाही मुलगी हवी आहे.’

अधिक वाचा – प्राजक्ताच्या ‘साजनी’ या नवीन गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती

निर्मात्यांना काहीच त्रास नाही

पूजाने त्यापुढे स्पष्ट केले की, ‘मालिकेच्या निर्मात्यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर जर त्यांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी मला रिलीज करावं असं सांगितलं होतं. तसंही मी काही महिन्यातच मालिका सोडण्याचा विचार करत होते. त्यांना हवं तर ते मला रिप्लेस करू शकतात. पण निर्मात्यांना मी मालिकेमध्ये असायला हवे आहे. तसंच त्यांनी डिलिव्हरी नंतर कधी मालिका पुन्हा जॉईन करू शकतेस? असंही विचारलं आहे. दरम्यान संपूर्ण युनिट माझ्या सुविधा आणि आरामाचा विचार करत आहेत. मला इथे काहीही त्रास होत नाही.’ मात्र मालिका आता पूजा कधी सोडणार याबाबत स्पष्टता नाही. पूजाच्या जाण्यामुळे मालिकेमध्ये नक्की आता कोणता बदल होणार याचाही प्रेक्षकांना आता प्रश्न पडला आहे. कारण या मालिकेत पूजा अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: गायत्री-मीराचे उघडले डोळे, जय-उत्कर्षवर झाले नाराज

2020 मध्येच करत होती पूजा बाळाचे प्लॅनिंग

पूजाने सांगितले की, तिचा नवरा संदीप आणि ती 2020 मध्येच बाळासाठी प्लॅनिंग करणार होते. मात्र 2019 मध्ये ‘नच बलिये’ दरम्यान झालेल्या अपघातामुळे हे टाळले. त्यावेळी आपल्याला पुन्हा उभंदेखील राहता येईल की नाही याबाबत पूजाला खात्री नव्हती. जेव्हा दुसरे लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा आम्ही बाळाबाबत गंभीरतेने विचार केला. आम्हाला बाळाला जन्म देण्यासाठी उशीर करायचा नव्हता. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात पूजाची डिलिव्हरी होणार आहे. मात्र सध्या पूजा मालिकेच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. पूजा सध्या आपले आरोग्य सांभाळून चित्रिकरणात व्यग्र आहे. तर आता पूजाच्या जागी कोणत्या अभिनेत्रीला रिप्लेस करणार याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र पूजाच्या जागी तिची भूमिका करण्यासाठी सध्या कोण आहे आणि डिलिव्हरीनंतर पूजा पुन्हा काम करणार का? हे सर्वच प्रश्न सध्या चाहत्यांना असून आता येणारी वेळच ठरवेल. 

अधिक वाचा – कतरिना कॅफ झाली ‘बोटॉक्स क्वीन’ प्लास्टिक सर्जरीने बदलला चेहरा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
03 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT