ADVERTISEMENT
home / मनोरंजन
taarak mehta ka ulta chashma

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ओटीटीवर येणार की नाही? अखेर लेखकाने केला खुलासा

लहानथोर सगळ्यांनाच आवडलेली आणि तब्बल  14 वर्ष चालू असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका ही टीव्ही इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारी मालिका आहे.  इतका काळ सलग प्रदर्शित झाल्याने या मालिकेचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, अंजली भाभी, टप्पू, बापूजी, भिडे, माधवी, डॉक्टर हाथी अशा सर्वांनीच लोकांच्या मनावर आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप सोडली आहे. सर्वांना ही पात्रे अगदी आपल्या घरातीलच वाटतात. या सर्वांबरोबरच आपणही गोकुळधाम सोसायटीचा एक महत्वाचा भाग झालो आहोत असे प्रेक्षकांना वाटते. यामुळेच दयाबेनच्या पुनरागमनाची अनेकदा चर्चा होते. दयाबेनला घराघरात पोहोचवणाऱ्या दिशा वाकाणीला  पुन्हा या शोमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या मालिकेचे लेखक अब्बास हिरापूरवाला यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा दयाबेनच्या पुनरागमनाबद्दल नाही, तर तारक मेहता का उल्टा चष्मा च्या वेब सीरिजच्या आवृत्तीबद्दल आहे.

सगळीकडे वेब सिरीजची चलती 

गेल्या काही वर्षांपासून लोक OTT प्लॅटफॉर्मकडे वळू लागले आहेत. या प्लॅटफॉर्म्सवरील विविध वेबसिरीजची कायमच चर्चा सुरु असते. एक मोठा प्रेक्षकवर्ग (शहरी तरुण प्रेक्षकवर्ग) OTT प्लॅटफॉर्मकडे वळल्यामुळे टीव्हीमालिकांच्या TRP वर याचा परिणाम झाला आहे. सध्या सगळीकडेच  OTT प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीजच ट्रेंडिंग आहेत. वर्षानुवर्षे सुरु राहणाऱ्या मालिका आणि पटापट संपणाऱ्या वेब सिरीज या दोन पर्यायांपैकी तरुण वर्ग वेब सिरीजकडेच वळू लागला आहे. त्यामुळे अनेक निर्माते, दिग्दर्शक अगदी मोठमोठे अभिनेते देखील वेबसिरीजकडे वळले आहेत. 

अधिक वाचा Dadasaheb Phalke Awards 2022 : रणवीर सिंह सर्वोत्कृष्ट अभिनेता तर क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

‘तारक मेहता…’ वेबसीरिजच्या रूपात दाखवता येणे कठीण आहे 

सध्या मोठ्या व लहान शहरी भागातही लोक वेब सिरीजकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत ‘तारक मेहता…’ सारखी मोठी मालिका वेब सीरिज स्वरूपात आणण्याबाबत विचारले असता मालिकेचे लेखक अब्बास हिरापूरवाला म्हणाले की, “’तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका वेब सीरिज या स्वरूपात सादर होईल, असे मला वाटत नाही. कारण एवढी मोठी मालिका आम्ही या स्वरूपात दाखवू शकणार नाही. वेब सिरीज आणि  टीव्ही मालिका या दोन्हींचाही प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. त्यामुळे जे जिथे आहे ते तिथेच राहणे चांगले. त्यामुळे मला वाटत नाही की तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका कधी वेब सीरिजच्या रूपात येऊ शकेल.”  ‘स्क्रीन राइटर असोसिएशन अवॉर्ड्स’ च्या वेळी झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे. 

ADVERTISEMENT

SWA पुरस्कार हा पटकथा लेखकांसाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. हा एकमेव पुरस्कार आहे जिथे पटकथा लेखकांच्या मेहनतीची दखल घेतली जाते. 27 फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपट, टीव्ही, वेब सिरीज आणि गीतांशी संबंधित सर्व मोठ्या लेखकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी या पुरस्कारांद्वारे सन्मानित केले जाईल.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ अजूनही नंबर 1 वर

दर आठवड्याला निर्माते मालिकेच्या कथेत जबरदस्त ट्विस्ट आणून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतात. कारण शोच्या कथेचा थेट टीआरपीवर परिणाम होतो. या टीआरपीच्या खेळामुळे अनेकदा निर्मात्यांना कथेत काहीतरी उलट सुलट दाखवावे लागते. या आठवड्यातही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ TRP च्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे ही मालिका इतकी जुनी असूनही अजूनही लोकांच्या मनावर राज्य करते आहे. 

जर इतक्या मालिकांच्या गर्दीत तारक मेहता अजूनही TRP च्या स्पर्धेत बाजी मारत असेल तर तिला OTT वर आणण्याची निर्मात्यांना गरज वाटणार नाही हे स्वाभाविकच आहे. 

अधिक वाचा – छत्रपती महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान गायले गायक दिव्य कुमारने

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

21 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT