ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
Sadi Kashi Ghalaychi

नऊवारी साडी प्रकार | नऊवारी साडी कशी नेसायची | Nauvari Sadi Kashi Ghalaychi

महाराष्ट्रीयन कोणताही सण म्हटला अथवा महाराष्ट्रीयन लग्न म्हटलं की सर्वात पहिलं समोर चित्र उभं राहतं ते नऊवारी साडीचं. नऊवारी साडी (nauvari saree in marathi) ही महाराष्ट्रातील साड्यांची शान आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. कोणताही सण असला की, विशेषतः मराठी नवं वर्ष गुढीपाडवा की, सर्वच मुली अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत नऊवारी साड्यांमध्ये सजूनधजून बाहेर पडलेल्या दिसतात. अगदी सण असो वा लग्न महाराष्ट्राच्या परंपरेत नऊवारी साडीला खूपच महत्त्व आहे. अर्थात या नऊवारी साड्या नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत. हे नक्की प्रकार कोणते याची तुम्हाला माहिती आहे का? नऊवारी साडी कशी नेसतात हे माहीत आहे का? हल्ली ही साडी नेसवण्याची पद्धत फारच कमी जणांना माहीत असते. तर काही जण नऊवारी साड्या शिऊनही घेतात. पण खरी मजा आहे ते नेसण्यातच. नऊवारी साडीचे प्रकार आणि कशा पद्धतीने या साड्या नेसल्या जातात, नऊवारी साडी नेसून कसे वावरायचे याची माहिती तुम्हाला या लेखाद्वारे आम्ही सांगणार आहोत. त्यामुळे आता लग्नाची तयारी करणार असाल तर नववधूसाठी नऊवारी साड्यांचे कोणते खास डिझाईन बघायचे हे आतापासून ठरवा. अगदी काष्टा साडी, ब्राह्मणी साडी कोणती नऊवारी साडी कशी नेसायची (Nauvari Sadi Kashi Ghalaychi) आहे आणि नऊवारी साडी किंमत काय, नऊवारी साडी प्रकार काय आहे इथपासून आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 

नऊवारी साडीचा इतिहास | Nauvari Saree History In Marathi

नऊवारी म्हणजे साडीला येणारे नऊ वार अगदी अंगाशी चापून चोपून नेसायला लागणारी साडी. ही साडी नेसण्याची एक विशिष्ट पद्धत असते. मुळात ही साडी नेसण्यासाठी एक प्रकारे कसब आणि प्रशिक्षणही लागतं. तुमची आजी ही साडी नेसत असेल पण तुमच्या आईला ही साडी नेसता येतच असेल असं नाही. पण ही साडी नेसण्याचं कसब तुम्ही शिकून घेतलंत तर पुढील पिढीही या साडीची परंपरा जपू शकेल. नुसता काष्टा काढला की, नऊवारी नेसून झाली असं होत नाही. प्रत्येक नऊवारी नेसण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि ती पद्धत अंगवळणी पाडावी लागते. शेतात किंवा इतर कामं करणाऱ्या महिला ही नऊवारी साडी घोट्याच्या वर किंवा गुडघ्यापर्यंत नेसतात. तर सणा समारंभाला ही साडी गुडघ्याखालपर्यंत नेसली जाते. या साडीच्या दुभागलेल्या काष्टा पद्धतीमुळे सतत सावरावी लागत नाही आणि काम करण्यास सोपं जातं. इतकंच नाही तर जलद वावरण्यास आणि अगदी घोडेस्वारी करण्यासाठीही ही साडी नेसणं योग्य आहे. पूर्वी झाशीच्या राणीच्या काळात नऊवारी साडी नेसूनच राणीने लढाई केली होती असं म्हटलं जातं.

नववधूकरिता खास उखाणे

नऊवारी साडीचे प्रकार आणि नऊवारी साडी कशी नेसायची (Types Of Nauvari Saree And How To Wear)

नऊवारी साड्यांचे अनेक प्रकार आहेत. आपल्याला फक्त नऊवारी साडी इतकंच साधारणतः माहीत असतं. बऱ्याच जणींना वाटतं नऊवारी म्हणजे फक्त काष्टा काढणं. पण असं अजिबात नाही. नऊवारी साडीचे अनेक प्रकार आहेत. ते आपण आधी जाणून घेऊया-

ADVERTISEMENT

नववधूकरिता ब्राह्मणी नऊवारी साडी (Bridal Brahmani Nauvari Saree)

brahmani nauvari

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – पूर्वीपासून ब्राह्मण पद्धतीच्या नऊवारी साड्या या विवाह सोहळ्याच्या वेळी अथवा सणा – समारंभाला नेसल्या जातात. ही नेसायची एक विशिष्ट पद्धत आहे. या नऊवारी साडीच्या काठाकडचा भाग वर उचलून कमरेला खोचला जातो. ज्याला ओचा असं म्हटलं जातं. या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे घोळदार ओचा. पूर्वी महिला या ओच्यामध्ये बऱ्याच वस्तू ठेवत असत. कारण हा ओचा साधारणतः 8 ते 10 इंचाचा असतो. शिवाय यामध्ये निऱ्यांचा घोळही जास्त असतो. या साडीमध्ये निऱ्या कमरेला न खोचता त्या एकत्र घेऊन त्याचं ‘केळं’ काढलं जातं. पूर्वी यामध्ये पैसे ठेवले जायचे. ही साडी साधारणतः पायापर्यंत झाकलेली असली तरीही तुमच्या पोटऱ्यांचा काही भाग मात्र उघडा राहतो. सध्या या साडी नेसताना आतमध्ये स्लॅक्सदेखील घातली जाते. पण पूर्वीच्या महिलांना त्याची गरज भासत नव्हती.

Maharashtrian Bridal Sarees In Marathi

नऊवारी सिल्क (Nauvari Silk)

nauvari silk

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – हल्ली नऊवारीमध्ये सिल्क साड्यांनाही नववधूसाठी खास मागणी असते. यामध्ये पैठणी सिल्क जास्त प्रमाणात वापरली जाते. अतिशय चापून चोपून अशी शरीराला घट्ट बसेल अशा तऱ्हेने ही साडी नेसण्यात येते. साडीचा पदर हा एका सरळ रेषेमध्ये काढलेला नसतो आणि खांद्यावरून वरखाली अशा प्रकारे काढला जातो. त्याशिवाय मागचा काष्टा हा दोन्ही काठ मधोमध यावेत अशा तऱ्हेने काढला जातो. फार पूर्वी लावणीसाठी विशिष्ट काठापदराच्या साडीचा उपयोग केला जात होता. पण आताच्या फॅशननुसार सिल्क आणि अगदी सिंथेटिक साडीचा वापरही करण्यात येतो.

कॉटन ब्लेंड नऊवारी साडी (Cotton Blend Nauvari)  

cottonblend

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – बऱ्याच जणांना सुळसुळीत साड्या आवडत नाहीत. अगदी अंगाला व्यवस्थित चिकटून राहणाऱ्या नऊवारी आणि कॉटन ब्लेंडच्या साड्या त्यासाठी जास्त चांगल्या. या साड्या तुम्हाला अंगाला जास्त घाम आला तरी टिपून घेतात. लग्नामध्ये खूपच घाई असते. ही साडी नेसायलाही सोपी असते आणि अंगाला व्यवस्थित फिट बसते. ही साडी सहसा ब्राह्मणी अथवा पेशवाई पद्धतीने नेसवली जाते. फक्त नववधूसाठी यामध्ये जास्त ब्राईट रंग नसतात. त्यामुळे कदाचित ही साडी तुम्हाला हवा तसा फिल लग्नात आणू शकत नाही. 

ADVERTISEMENT

बिग बॉर्डर नऊवारी (Big Border Nauvari)

big border

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – लग्नात वेगवेगळ्या पद्धतीच्या नऊवारी वापरल्या जातात. काही जणांना मोठ्या अर्थात बिग बॉर्डर नऊवारी नेसायला जास्त आवडते. या बॉर्डरमुळे नवरीचा साज अधिक चांगला उठून दिसतो. ही साडी नेसताना तुम्हाला डिझाईनर ब्लाऊज वापरता आला तर अधिक उठून दिसेल. यामध्ये अनेक व्हरायटी असतात आणि तुम्हाला पैठणी साड्यांमध्ये अशा बिग बॉर्डर नऊवारी अधिक चांगल्या मिळू शकतात. . साडीचा पदर हा एका सरळ रेषेमध्ये काढलेला नसतो आणि खांद्यावरून वरखाली अशा प्रकारे काढला जातो. त्याशिवाय मागचा काष्टा हा दोन्ही काठ मधोमध यावेत अशा तऱ्हेने काढला जातो. यामुळे याचा काठ नीट एका रेषेत समोर दिसतो. 

पैठणी नऊवारी (Paithani Nauvari) 

nauvari

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – नववधूसाठी पैठणी ही तर खासच असते. बऱ्याचदा लग्नासाठी खास पैठणी शिऊनही घेतली जाते. पण पैठणी नेसण्यात मजा आहे ती शिऊन घेतलेली नऊवारी साडी कशी घालायची हे समजण्यातच जास्त वेळ जातो. पैठणी तुम्ही पेशवाई अथवा ब्राह्मणी कोणत्याही पद्धतीने नऊवारी नेसू शकता. तुम्हाला त्यावर उपरणेदेखील घ्यायचे असते त्यामुळे तुम्ही त्यापद्धतीने तुमची पैठणी नऊवारी कशी उठून दिसेल हे नीट बघा. तुम्हाला त्यामध्ये महाराणी पैठणी, फ्लोरल पैठणी कशा डिझाईनची साडी हवी आहे ते पाहून घ्या. 

मराठमोळ्या पैठणीचे विविध डिझाईन्स (Paithani Saree Designs In Marathi)

कोल्हापुरी नऊवारी (Kolhapuri Nauvari)

kolhapuri

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – यामध्ये साधारणतः दोन काष्टा असलेल्या नऊवारी साड्या असतात. ज्याला जिजाऊ डबल काष्टा असंही म्हटलं जातं. पण कोल्हापूरमधील बऱ्याच भागांमध्ये शेतकरी महिला ज्या नऊवारी साड्या नेसतात त्या साधारणतः गुढघ्यापर्यंत नेसतात. तर जिजाऊ डबल काष्टामध्ये दुभागलेल्या भागामध्ये दोन काष्टे दिसतात. ज्याला काठही असतात.  

ADVERTISEMENT

पेशवाई नऊवारी (Peshwai Nauvari)

peshwai nauvari

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – ही नऊवारी साडी नेसण्याची पद्धत साधारण ब्राह्मणी पद्धतीप्रमाणेच आहे. पण ब्राह्मणी पद्धतीच्या तुलनेमध्ये पेशवाई नऊवारीच्या ओचा हा कमी असतो. इतका मोठा ओचा या पद्धतीत काढला जात नाही. अगदी 4-5 इंचाचा ओचा काढला जातो. सुरूवातीच्या काळामध्ये पेशवाई नऊवारी साडी नेसण्यासाठी भरजरी साड्यांचाच वापर केला जात होता. पण आता त्यामध्ये बऱ्यापैकी बदल झाला आहे.

सिल्क साडीची कोळी नऊवारी (Koli Nauvari With Silk Saree) 

koli nauvari

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – कोळी समाजामध्ये खूपच वेगळ्या पद्धतीने ही नऊवारी नेसण्यात येते. ही साडी गुडघ्यापर्यंत नेसली जाते. कारण समुद्रामध्ये काम करत असताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तशा पद्धतीत ती साडी नेसली जाते. साधारणतः कोल्हापूरी पद्धतीनेच ही साडी नेसतात. पण या साडीला जास्त घोळ नसतो आणि ही साडी अगदी घट्ट अशी नेसली जाते. तर साडीच्या पदराचा भाग हादेखील कमरेला गुंडाळला जातो आणि ब्लाऊजवर फुलांची नक्षी असलेली कॉटनची ओढणी घेतली जाते. शिवाय या नऊवारी साड्यादेखील जास्त प्रमाणात कॉटनच्याच असतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे या साड्यांवर फुलांचं नक्षीकाम जास्त प्रमाणात असतं.

बॉलीवूड कलेक्शन नऊवारी (Bollywood Collection Nauvari) 

bollywood nauvari

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – नऊवारी साडीचं बॉलीवूड कनेक्शन बघायला गेलं तर तसं जोरदार आहे. खरं तर बाजीराव मस्तानी या चित्रपटानंतर या नऊवारी साडीला अधिक महत्त्व आलं. अर्थात त्या चित्रपटामध्ये प्रियांका आणि दीपिकाला नेसवण्यात आलेली नऊवारी ही वेगळ्या पद्धतीची होती. पण तरीही त्यावेळी त्यांनी नेसलेली साडी कशी पारंपरिक नाही यावरून बरेच वाद झाले. पण त्यानंतरही नऊवारी नेसण्याच्या किती विविध पद्धती असू शकतात हे समोर आलं. नऊवारी साडीमध्येही वैविध्य आहे. याआधीदेखील बऱ्याच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या नऊवारी साड्यांचा उपयोग करण्यात आला आहे. विशेषतः काही गाण्यांमध्ये विशेषतः नऊवारी साडीचा उपयोग केलेला दिसून येतो. आताच नाही तर अगदी पूर्वापासून बऱ्याच चित्रपटांमध्ये नऊवारी साडी अनेक अभिनेत्रींनी नेसल्या आहेत. नुकताच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मणिकर्णिका’ या कंगना राणौतच्या ऐतिहासिक चित्रपटातही विविध पद्धतीच्या नऊवारी साड्यांचा लुक पाहायला मिळाला.

कॅज्युअल कॉटन नऊवारी (Casual Cotton Nauvari) 

Casual cotton nauvari

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – काही नववधूंना डिझाईनर अथवा अगदी भपकेबाज साड्या आवडत नाहीत. त्याच्यासाठी कॅज्युअल नऊवारी साडीही बाजारात मिळतात. तुम्हाला अगदी पटकन आणि सहज लग्नाच्या घाईतही या नऊवारी साडी नेसता येतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या साड्या अजिबात जड नसतात. त्यामुळे लग्नात वावरायला अगदी सहजसोपे होते. तसेच ही साडी अंगाला चिकटून बसते त्यामुळे सुटायचे टेन्शनही राहात नाही. ही साडीही ब्राम्हणी पद्धतीने नेसता येते. 

ADVERTISEMENT

रेडीमेड नऊवारी (Readymade Nauvari)

readymade nauvari

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – सध्या लग्नामध्ये खूपच घाईगडबड असते. तर काही जणींना नेसलेली साडी सांभाळण्याची सवय नसते. अशा नववधूंसाठी तुम्ही रेडीमेड नऊवारी घेऊ शकता. ही साडी तुम्हाला नेसावी लागत नाही. तुमच्या आवडीप्रमाणे आणि मापाप्रमाणे तुम्हाला ही शिऊन घेता येते. शिवलेली ही साडी पटकन घालणे सोपे  होते. ही तुमच्या पायजम्याप्रमाणेच तुम्हाला घालयची असते. त्यामुळे साडी नेसण्याचा तुमचा वेळ वाचतो.

‘नथ’ घातल्याशिवाय महाराष्ट्रीयन साजशृंगार अपूर्ण, पाहूया सध्याचा Trend

डिझाईनर नऊवारी (Designer Nauvari) 

designer nauvari

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – सगळ्यांनाच पारंपरिक अथवा पैठणी अशा नऊवारी आवडत नाहीत.  त्यांच्यासाठी डिझाईनर नऊवारी हा पर्याय उपलब्ध आहे. अतिशय चापून चोपून अशी शरीराला घट्ट बसेल अशा तऱ्हेने ही साडी नेसण्यात येते. पायाकडच्या बाजूला घोळ कमी असतो. फार पूर्वी लावणीसाठी विशिष्ट काठापदराच्या साडीचा उपयोग केला जात होता. पण आताच्या फॅशननुसार डिझाईनर आणि अगदी सिंथेटिक साडीचा वापरही करण्यात येतो.

काष्टा साडी (Kashta Nauvari)

Kashta Nauvari

वैशिष्ट्य आणि नेसायची पद्धत – काष्टा हे नऊवारी साडीचे वैशिष्ट्य आहे. पण सगळ्यांनाच नऊवारी लुगडे नेसवता येते असं नाही. त्यासाठी तुम्हाला खूप सराव असावा लागतो. दोन काष्टा असलेल्या नऊवारी लुगडे असतात. बऱ्याच भागांमध्ये शेतकरी महिला ज्या नऊवारी लुगडे नेसतात त्या साधारणतः गुढघ्यापर्यंत नेसतात. तर जिजाऊ डबल काष्टामध्ये दुभागलेल्या भागामध्ये दोन काष्टे दिसतात. या साड्यांमध्ये साडीचे काठही दिसून येतात. तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये पर्याय निवडू शकता. 

ADVERTISEMENT

नऊवारीवर घालावेत कोणते दागिने (Jewellery To Wear With Nauvari Saree)

नऊवारी साडीने तर प्रत्येक स्त्री सुंदर दिसतेच. पण त्याला शोभेसे दागिने अंगावर असले की, त्याला अजूनच सोने पे सुहागा असं म्हटलं जातं. सणा- समारंभाला ही साडी नेसायची म्हटली की, दागिन्यांनी सजायला हवंच. नऊवारी कोणत्याही रंगाची असो. त्यावर सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे नथ. मोत्याची नथ घातल्यावर तुमच्या चेहऱ्याला शोभा येते. तुम्ही सोन्याचे दागिने आणि मोत्याचे दागिने असं मिश्रण नऊवारी साडीवर घालयला हवं. केसांचा अंबाडा अथवा खोपा हेअरस्टाईल त्यामध्ये माळलेला गजरा, त्यानंतर मोत्याचे वेल आणि कुडी किंवा अगदी झुमकेही यावर चांगले दिसतात. गळ्याला घट्ट बसणारी अशी चिंचपेटी तर हवीच. त्याशिवाय याला शोभा नाही. त्याखालोखाल एक सोन्याच्या रंगाची ठुशी, काहीसा लांब असा मोत्याचा लफ्फा अथवा तीन पदरी मोत्यांचा हार, हातात पाटल्या अथवा बिल्वरचा एखादा प्रकार, मोत्याचा बाजूबंद, कंबरपट्टा, मेखला आणि पायात पैंजण. हा साज जेव्हा तुम्ही नऊवारी साडीबरोबर करता तेव्हा तुमचा पारंपरिक अवतार पूर्ण होतो असं समजलं जातं.

नऊवारी साडी मिळण्याची मुंबईतील ठिकाणं (Where To Get Nauvari Saree In Mumbai)

मुंबईमध्ये  अनेक ठिकाणी नऊवारी साडी मिळतात. त्यापैकी काही ठिकाणे आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तुम्ही तिथे जाऊन आपल्या आवडीप्रमाणे नऊवारी साडी घेऊ शकता. 

1. पेशवाई साडी शॉप 

कुठे आहे – दुकान नं. 3 & 4, जिवा देवाशी निवास, रानडे रोड, दादर पश्चिम, दादर, मुंबई – 400028

ADVERTISEMENT

2. शुभकन्या – नऊवारी साडी शॉप 

कुठे  आहे  – दुकान क्र. 6-7, पेपरमिंटवाला चाळ, भांडुप स्टेशन रोड, भांडुप, भांडुप पश्चिम, मुंबई – 400078

3. रेडीमेड नऊवारी शॉप – माझी नऊवारी 

कुठे  आहे – D/18, साईदत्ता सोसायटी साईवाडी, तेलीगल्ली, प्रोफेसर एनएस फडके स्टार बाजार, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – 400069

ADVERTISEMENT

4. साडीघर –

दादर हे खरंतर साड्यांचं माहेरघर असं म्हणतात. दादरमधील साडीघर हे नऊवारी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय या ठिकाणी रेडीमेड साड्यांसाठी बुकिंगही करावं लागतं. इथे जास्त ब्राह्मणी पद्धतीच्या साड्यांना मागणी असते. विवाहासाठी लागणाऱ्या साड्या या दुकानामधून रेडीमेड जास्त प्रमाणात घेतल्या जातात

कुठे आहे – जिवा देवाशी निवास, रानडे रोड, दादर पश्चिम, दादर, मुंबई – 400028

5. कला केंद्र 

ADVERTISEMENT

कुठे  आहे – मेहता महाल, रंजित स्टुडिओजवळ, दादासाहेब फाळके मार्ग, हिंदमाता, गौतम नगर, दादर पूर्व, मुंबई – 400014

6. गिरगाव पंचे डेपो – गिरगांव आणि दादर –

कुठे आहे – गिरगावमध्ये मांगलवाडी समोर, दादरमध्ये प्लाझासमोर

7. पारशिवनीकर –

ADVERTISEMENT

डोंबिवली पूर्वला फडके रोडवर असणारं हे दुकान लहान आहे. पण अगदी पारंपरिक पद्धतीच्या नऊवारी साड्या यांच्याकडे उपलब्ध आहेत. अगदी रेडीमेड साड्यादेखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 

कुठे आहे – फडके रोडलगत

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. नऊवारी साडी कशी निवडावी?

नऊवारी साडी खरेदी करताना आपल्याला कोणते डिझाईन चांगले दिसेल याचा आधी विचार करावा. साडीचा पोत, रचना, तिचे डिझाईन या सगळ्या गोष्टी साडी निवडताना लक्षात ठेवा. 

ADVERTISEMENT

2. नऊवारीमध्ये सर्वात चांगला रंग कोणता?

नऊवारी साड्यांमध्ये गडद रंग जास्त  चांगले दिसतात. त्यातही लाल, केशरी, हिरवा, पिवळा हे रंग तुम्हाला नववधू म्हणून शोभून दिसतात. 

3. नववधूसाठी कोणते डिझाईन उत्कृष्ट ठरते?

वास्तविक आपल्याला कोणती नऊवारी सांभाळता येईल यानुसार तुम्ही ठरवा. पण ब्राह्मणी, पैठणी आणि पेशवाई नऊवारी साड्यांना कोणतीही तोड नाही. 

ADVERTISEMENT

Photo Courtesy – Instagram

03 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT