ADVERTISEMENT
home / फॅशन
mangalsutra ka ghaltat

मंगळसूत्राचे काय आहे वैज्ञानिक महत्त्व, का आहे ही परंपरा

आपल्याकडे लग्नामध्ये मुलींना मंगळसूत्र घालण्याची परंपरा पूर्वपरंपरागत चालत आली आहे. आजकाल शहरांमध्ये अनेक मुली लग्न झाल्यानंतरही मंगळसूत्र घालत नाहीत. काही जणींना मंगळसूत्र घालणं आवडतं तर काहींना आवडत नाही. मात्र आजही अनेक महिलांना मंगळसूत्रांचे डिझाईन्स पाहणं आणि त्याची खरेदी करणं आवडतं. मंगळसूत्र गळ्यात घालो वा ना घालो प्रत्येक लग्न झालेल्या महिलेकडे एक अथवा दोन वेगवेगळ्या डिझाईन्सचे मंगळसूत्र असतातच. पण मंगळसूत्र नक्की का घालतात (Mangalsutra Ka Ghaltat) यासाठी महत्त्वाचे वैज्ञानिक कारण आहे. याची तुम्हाला माहिती आहे का? हे वाचून तुम्हाला थोडे आश्चर्य वाटले का? कारण आपण सहसा या गोष्टींचा विचारच करत नाही. पण आपल्याकडे काही गोष्टी करण्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत आणि म्हणूनच आपल्या परंपरा त्याप्रमाणे बनविण्यात आल्या आहेत. केवळ अंधश्रद्धा अथवा काही गोष्टी पूर्वपरंपरागत चालत आल्या म्हणून केल्या जात नाहीत. तुम्हालाही जर याचे कारण माहीत नसेल तर तुम्ही हा लेख नक्कीच वाचायला हवा.

मंगळसूत्र म्हणजे काय – What Is Mangalsutra In Marathi

मंगळसूत्र म्हणजे काय
मंगळसूत्र म्हणजे काय

मंगळसूत्र हा लग्न झालेल्या स्त्री चा महत्त्वाचा अलंकार मानला जातो. पण मंगळसूत्र म्हणजे नक्की काय? मंगळसूत्र हा शब्द दोन शब्दांनी तयार होतो. ‘मंगल’ आणि ‘सूत्र’ अर्थात पवित्र असे सूत्र. मंगळसूत्राला हिंदू धर्मामध्ये पवित्र सूत्र मानण्यात येते. भारतामध्ये अनेक ठिकाणी लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालण्याची प्रथा आहे. काही आधुनिक महिला हल्ली मंगळसूत्र घालत नाहीत. तर काही महिला आता ब्रेसलेट करून हातातही मंगळसूत्राचे ब्रेसलेट घालतात. मंगळसूत्र हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे महिलांचे सर्वात महत्त्वाचे आभूषण आहे. सोन्याचे आणि काळ्या मण्यांनी हे मंगळसूत्र बनते. गळ्याभोवती अगदी लहान ते छातीच्या खाली इतक्या लांबीचे हे मंगळसूत्र असते. विवाहित महिला मंगळसूत्र घालणे अत्यंत शुभ मानतात. 

मंगळसूत्राचा इतिहास

मंगळसूत्राच्या महत्त्वाचा उल्लेख हा इतिहासकालिन आहे. आदि गुरू शंकराचार्य यांच्या प्रसिद्ध पुस्तक “सौंदर्य लाहिरी” मध्ये याचा उल्लेख असून हिंदू महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे गळ्यात घालतात. असा समज आहे की, 6 व्या शताब्दीमध्ये भारतातील महिलांनी विवाहानंतर मंगळसूत्र घालण्याची परंपरा सुरू केली होती. मोहेंजदडोच्या खोदकामामध्येही मंगळसूत्राचे प्रमाण सापडते. कूर्गचा वैवाहिक गळ्यातील हार हा लहान काळे मणी आणि सोन्याने बनविण्यात आल्याचा दिसून येतो. त्यामुळे हे मंगळसूत्र असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय प्राचीन काळात अष्टमंगलक माळाही दिसून येते. ज्यामध्ये 8 हे प्रतीक असून मध्यावर एक लॉकेट दिसून येते. याला सांचीच्या बुद्धिस्ट प्रतीक स्वरूपात मान्यता मिळाली होती. 

मंगळसूत्राचे महत्त्व – Mangalsutra Importance In Marathi

मंगळसूत्राचे महत्त्व – Instagram

मंगळसूत्र कसे असावे (Mangalsutra Kase Asave) हे जरी प्रत्येकावर अवलंबून असले तरीही प्रत्येक मंगळसूत्रात सोन्याची वाटी आणि काळे मणी हे असतातच. असे समजण्यात येते की, मंगळसूत्र हे नजर लागण्यापासून वाचवण्यास अधिक काम करते. महिलांसाठी मंगळसूत्र हे खूपच महत्त्वाचे असते. नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्येही मंगळसूत्र घालण्याची परंपरा आहे. भारताच्या संस्कृतीमधअये मंगळसूत्र म्हणजे विवाहित महिलांसाठी सौभाग्याचे रक्षा कवच मानण्यात येते. 

ADVERTISEMENT

हिंदू धर्मात विवाहानंतर वधूला वर गळ्यात मंगळसूत्र घालतो. मंगळसूत्राचे हरवणे अथवा अचानक तुटणे हे अशुभ मानण्यात येते. विवाहित महिलांनी मंगळसूत्र घालणे हे अजूनही काही ठिकाणी अनिवार्य समजण्यात येते. नवऱ्याच्या आयुष्याची कुशलता ही मंगळसूत्रावर अवलंबून असते असाही समज आहे. तसंच आयुष्यभर सौभाग्यवती राहण्यासाठी मंगळसूत्र घालण्यात येते. तसंच मंगळसूत्र घालण्यामुळे पती आणि पत्नीमधील नातं हे अत्यंत चांगलं राहातं असाही समज आहे आणि मंगळसूत्राचे यासाठी अधिक महत्त्व असल्याचे सांगण्यात येते. 

मंगळसूत्राचे वैज्ञानिक महत्त्व

मंगळसूत्र हे नेहमी गळ्यातच का घातले जाते? नेहमी मुलींनीच लग्न झाले आहे असे का दाखवावे असेही प्रश्न आजकाल विचारण्यात येतात. मात्र वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास, मंगळसूत्राची माळ आणि त्याच्या दोन्ही वाट्या हा महिलांच्या हृदयाच्या जवळ असतात. या मंगळसूत्रात करण्यात आलेल्या धातूचा वापर हा महिलांच्या हृदयासाठी उत्तम ठरतो. तसंच सकारात्मक ऊर्जा मिळून घरातील स्त्री कायम आनंदी राहते असे म्हटले जाते. त्यामुळेच साधारण हृदयाला सोन्याचा हा धातू चिकटेल इतक्या लांबीचे मंगळसूत्र करण्यात येते. सध्या या मंगळसूत्राची लांबी कमी झाली असली तरीही मुळात लांब मंगळसूत्र करण्याचा हा वैज्ञानिक हेतू होता. 

पोटापर्यंत का असावे मंगळसूत्र

पोटापर्यंत का असावे मंगळसूत्र
पोटापर्यंत का असावे मंगळसूत्र

मंगळसूत्र हे साधारणतः सर्व धर्मातील महिलांमध्ये वापरण्यात येते. तसंच भारतात अगदी दक्षिणेपापासून ते उत्तरेपर्यंत सगळीकडेच याचा वापर होतो. वेगवेगळ्या नावाने जरी मंगळसूत्र ओळखण्यात येत असले तरीही मंगळसूत्राचे महत्त्व (Mangalsutra Importance In Marathi) मात्र सगळीकडेच सारखे आहे. सहसा मंगळसूत्र हे पोटापर्यंत लांब असावे असे पूर्वीपासून सांगण्यात येते. कारण पोटाजवळ अनाहत चक्राचे स्थान असते. मंगळसूत्राच्या वाट्या या अनाहत चक्राला स्पर्श करत राहतात आणि यामुळे घरातील स्त्री चे मन शांत राहते असं सांगण्यात येते. तसंच या चक्रांमधून महिलांना आत्मिक शक्ती मिळत असून याचा सकारात्मक प्रभाव हा तिच्या वागण्यावर पडत असल्याचेही वैज्ञानिक कारण देण्यात येते. या गोष्टी माहीत नसल्यामुळे अथवा यातील वैज्ञानिक कारण ज्ञात नसल्याने अनेक महिला आपल्या स्टाईल स्टेटमेंटला शोभत नाही म्हणून मंगळसूत्र घालत नाहीत. पण त्यामुळेच आजकाल घटस्फोटाचे प्रमाणही वाढत चालले आहे असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. आजकाल ब्रेसलेट मंगळसूत्र अथवा वेगळे डिझाईन्सचे मंगळसूत्रही बाजारामध्ये मिळते. आपापल्या आवडीनुसार आणि ट्रेंडनुसार मंगळसूत्र घेतले जात आहेत.

मंगळसूत्रामध्ये काळे मणी का घालावेत – Black Beads Imp In Mangalsutra

मंगळसूत्र का घालतात – Mangalsutra Ka Ghaltat – Instagram

मंगळसूत्रामध्ये नक्की काळे मणी का असतात असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागेही काही कारणे पूर्वपरंपरकागत सांगण्यात आली आहेत. काळ्या मण्यांचे नक्की काय महत्त्व आहे? तर कोणत्याही नव्या गोष्टींना नजर लागते असं आपल्याकडे म्हटलं जातं. मंगळसूत्रात यासाठीच काळे मणी ओवलेले असतात. नव्या जोडप्याला अथवा संसाराला कधीही कोणाची नजर लागू नये आणि सुखाचा संसार व्हावा यासाठी काळे मणी असणारे मंगळसूत्र महिलांना घातले जाते. मग हीच गोष्ट नवऱ्याला का लागू होत नाही असाही प्रश्न खरं तर उद्भवतो. पण आपल्याकडे पुरूषसत्ताक पद्धत असल्याने मुली नवऱ्याच्या घरी जातात. त्यांना सर्वाधिक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. त्यामुळे तिची चिडचिड कमी व्हावी. मन, चित्त थाऱ्यावर राहावे यासाठी सोने या धातूचा उपयोग करून मंगळसूत्र घातले जाते. 

ADVERTISEMENT

मंगळसूत्र का घालतात – Mangalsutra Ka Ghaltat

मंगळसूत्र का घालतात (Mangalsutra Ka Ghaltat ) याची अनेक कारणे आहेत, ती आपण जाणून घेऊया. 

  • वैज्ञानिक कारण – तुम्हाला हे ज्ञातच आहे की, मंगळसूत्र हे सोने आणि चांदीने बनविण्यात येते. दोन्ही धातू हे महिलांच्या हृदयाला निरोगी राखण्यास मदत करतात. या धातूमुळे रक्तदाबदेखील नियंत्रणात राहाते
  • मंगळसूत्रातील काळा मोती हा महिलांना राहू, केतू, शनिच्या दुष्प्रभावापासून वाचवतो
  • काही ठिकाणी पिवळ्या धाग्यात मंगळसूत्राचे काळे मणी आणि सोन्याचे लॉकेट घातले जाते. पिवळा धागा हा महिलांचा गुरू ग्रह चांगला करण्यास मदत करतो. त्यामुळे पती आणि पत्नीमधील नातेसंबंध चांगले होण्यास मदत मिळते. ज्या महिलांचा गुरू कमजोर असतो अथवा ज्या महिलांचे आपल्या पतीशी चांगले संबंध नसतात, विवाद होतो त्यांना मंगळसूत्रामुळे संबंध सुधारण्यास मदत मिळते. त्यामुळे लग्न झालेल्या महिलांनी पिवळा धागा असणारे मंगळसूत्र घालावे असे सांगण्यात येते. पती पत्नीच्या वैवाहिक जीवनात शांतता आणण्यासाठी याचा फायदा होतो 
  • मंगळसूत्राचा एक मनोवैज्ञानिक फायदाही आहे. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून पतीला आपण एक विवाहित असून कोणत्याही परस्त्री सह संबंध प्रस्थापित करू नये याचे भान राखण्यास प्रेरणा मिळते. आपल्या पत्नीसह कायम इमानदार राहावे हे पतीच्या मनात राहते
  • यासह पतीला आपल्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून जबाबदारीचीही कायम जाणीव राहाते. परिवाराच्या जबाबदारीची जाणीव होण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते 

लग्नात मंगळसूत्र उलट का घालतात

मंगळसूत्राला संस्कृतमध्ये ‘मांगल्यतंतू’ असे म्हटले जाते. मंगळसूत्रामध्ये दोन पदरी दो-यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी 4 छोटे मणी 2 लहान वाट्या असतात. एक पतीच्या घरून आणि दुसरी माहेरून. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन. 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ. वराकडील सुवासिनीने वधू-वरांना पूर्व दिशेकडे तोंड करून बसवावे आणि वधूस अष्टपुत्री नावाची दोन वस्त्रे, कंचुकी (काचोळी, चोळी) आणि काळ्या मण्यांचे मंगळसूत्र द्यावे असे सांगण्यात येते. दोन्ही वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू हे सौभ्यागाचे लक्षण भरून हे उलट घातले जाते. लग्नानंतर पहिल्या सणापर्यंत हे मंगळसूत्र उलटं ठेवण्याची प्रथा आहे. 

मंगळसूत्राची विविध नावे

मंगळसूत्राची परंपरा सर्वात पहिल्यांदा दक्षिण भारतात सुरू झाली असं म्हटलं जातं. त्यानंतर उत्तर भारतातील महिला मंगळसूत्र घालू लागल्या. तामिळनाडूमध्ये मंगळसूत्राला ‘थाली’ आणि ‘थीरूमंगलमय’ म्हटले जाते. यामध्ये एक लांब पिवळा धागा आणि सोन्याचे पेंडंट घातले जाते. तर उत्तर भारतातील मंगळसूत्रामध्ये काळे मणी आणि सोन्याचे पेंडंट असते. 

भारतातील काही राज्यांमध्ये मंगळसूत्र घालण्याची परंपरा नाही. बंगालमध्ये महिला मंगळसूत्राच्या ऐवजी ‘शाखा पौला चुडीया’ घालतात. मारवाडी, उडिया, आसामी महिला हा मंगळसूत्र घालतातच असं नाही. सिंधी महिलांमध्ये मंगळसूत्र आणि सिंदुर (कुंकू) याचे खूप महत्त्व आहे. बिहारमध्ये ‘तागपाग’ असे म्हटले जाते. तेलुगू संप्रदायामध्ये ‘मंगलसूत्रमु’, ‘पुस्तेलु’, ‘मंगलयामू’, ‘रामरथाली’, ‘बोट्टू’ असे म्हटले जाते. तर कोंकड महिला या 3 पद्धतीचे हार घालतात, ज्याला ‘धारेमनी’ आणि ‘मुहूर्तमणी’ असे संबोधण्यात येते. कर्नाटक राज्यात ‘मांगलसूत्र’ असे म्हणतात. महाराष्ट्र राज्यात ‘वाटी’ असे म्हणतात. कूर्गी समजातील महिलांमध्ये ‘करथामनी पाठक’ असे मंगळसूत्राला म्हटले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव संबोधित करण्यात येते. 

ADVERTISEMENT

मंगळसूत्र कधी घालू नये

हिंदू धर्मानुसार, कुमारिका मुलींनी मंगळसूत्र अजिबात घालू नये. याशिवाय विधवा महिला मंगळसूत्र नाही घालू शकत. तसंच एखाद्या महिलेला तिचा पती सोडून गेला असेल अथवा घटस्फोट झाला असेल तर मंगळसूत्र घातले जात नाही. 

प्रश्नोत्तरे (FAQs)

प्रश्न – मंगळसूत्र न घालण्याचा काय तोटा आहे?
उत्तर – मंगळसूत्र घालण्याचा काही तोटा नाही. मात्र ज्या वैज्ञानिक कारणासाठी मंगळसूत्र घालण्यात येते, त्याचा विचार करता, हृदयाशी संबंधित आजारांचा सामना महिलांना करावा लागतो असं सांगण्यात येतं. 

प्रश्न – लग्नानंतर हातात मंगळसूत्र ब्रेसलेट घालणे योग्य आहे का?
उत्तर – लग्नानंतर आजकाल हातात मंगळसूत्र ब्रेसलेट घालण्यात येते. मात्र अनेक ठिकाणी मंगळसूत्र हातात घालणं हा भारतीय संस्कृतीचा अपमान समजण्यात येते. पण हे ज्याच्यात्याच्या मानण्यावर आहे. 

प्रश्न – मंगळसूत्र साधारण किती लांबीचे असावे?
उत्तर – मंगळसूत्र हल्ली अगदी गळ्याच्या बरोबरीत करण्यात येते. पण मंगळसूत्राची लांबी ही हृदयाला लागण्याइतकी असावी. 

ADVERTISEMENT

महत्त्वाचे – मंगळसूत्र घालावे की न घालावे हा प्रत्येकाचा स्वतःचा प्रश्न आहे. आम्ही कोणत्याही गोष्टींना दुजोरा देत नाही. मात्र यामागील नक्की वैज्ञानिक कारण काय आहे याचा आढावा आम्ही घेतला आहे. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. 

निष्कर्ष – मंगळसूत्र का घालतात अथवा लग्नात मंगळसूत्र उलट का घालतात असे अनेक प्रश्न सर्वांना असतात. त्याशिवाय मंगळसूत्राचे महत्त्व (Mangalsutra Importance In Marathi) आणि मंगळसूत्र कसे असावे (Mangalsutra Kase Asave) या सर्वांबाबत आम्ही या लेखातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. 

13 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT