ADVERTISEMENT
home / Bridal Skincare
तुमचं लग्न ठरलंय, मग नववधूने अशी करावी पूर्वतयारी (Preparation For The Bride In Marathi)

तुमचं लग्न ठरलंय, मग नववधूने अशी करावी पूर्वतयारी (Preparation For The Bride In Marathi)

साधारण डिसेंबरपासून  लग्नाचे सनई- चौघडे वाजायला सुरुवात होते. आता लग्न म्हटले की, केवढी तरी तयारी आली. घरी पाहुण्यांचे येणे- जाणे, खूप शॉपिंग, वेगवेगळ्या विधींची तयारी आणि बरेच काही… घरातील तर काम लग्न दिवसापर्यंत सुरुच राहतात. पण नववधूला नव्या घरात जायचे असते. होणारे सासर कितीही परिचयाचे असले तरी लग्नाआधी आणि लग्नानंतर त्या घरात जाणे म्हणजे थोडे वेगळेच असते नाही का? तुमचेही वर्षभरात लग्न होणार असेल तर तुम्हाला आतापासूनच काही तयारी करायला हवी. ही तयारी कोणती याविषयीच आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत मग करुया सुरुवात?

करा स्वत:ला पँपर

जीम करा जॉईन

प्रयोग करणे टाळा

ADVERTISEMENT

लुक ठरवताना

Preparation For Bride In Marathi

लग्नाचा सीझन आला नैसर्गिक पद्धतीने आणा चेहऱ्यावर ग्लो

करा स्वत:ला पँपर (Pamper Yourself)

नववधूसाठी सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ही. कारण लग्न सोहळा म्हटलं की, चांगले फोटो काढणे आलेच. हल्लीतर अगदी साखरपुडा, बॅचलर्स पार्टी, प्रीवेडिंग, संगीत, हळगी, रिसेप्शन असे इव्हेंट ठेवले जातात आणि त्यानुसार फोटोज देखील काढले जातात. या फोटोजमध्ये तुम्हाला सुंदर दिसायचे असेल तर तुमची त्वचा चांगली दिसायला हवी. म्हणून तुम्ही काही सवयी तुमच्या शरीराला आताच लावून घ्या त्या कोणत्या ते पाहुया

ADVERTISEMENT

स्किन केअर रुटीन (Skin Care Routine)

2. Preparation For Bride In Marathi

तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमचे स्किनकेअर रुटीन ठरवून घ्या आणि न चुकता त्यांचे पालन करा. नववधूच्या चेहऱ्यावर आनंदाने तेज येते हे माहीत असले तरी देखील थोडी काळजी अधिक घेतली तर तुम्ही अधिक सुंदर दिसाल आणि लग्नाच्या दिवशी सुंदर दिसणे हा प्रत्येक नववधूचा अधिकार आहे नाही का?

जीम करा जॉईन (Join Gym)

3. Preparation For Bride In Marathi

सुंदर दिसण्यासोबत सुडौल दिसाल तर तुमचे फोटो अधिक खुलतील नाही का? जीम जॉईनकरुन बारीक होण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला मुळीच देणार नाही तर  जीममध्ये जाऊन वर्कआऊट केल्याने तुम्ही अधकि फिट व्हाल. तुमची प्रतिकारशक्ती वाढेल. शरीराला नको असलेले घटक घामावाटे उत्सर्जित होतील. शिवाय जीममुळे योग्यवेळी भूक लागण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही योग्य आहार घ्याल. शिवाय लग्नाच्या सगळ्या विधींना कितीवेळ उभे राहावे लागते हे तुम्हाला माहीतच आहे. जर तुम्ही फिट असाल तर तुम्हाला त्या विधींना फ्रेश वाटेल. थकवा जाणवणार नाही

ADVERTISEMENT

वाचा – वधू साठी पादत्राणे

आहारात करा बदल (Change Your Diet)

लग्न घर म्हटले की,सतत लाडू, मिठाई, वेफर्स, सामोसे असे पदार्थ घरी आणले जातात. पण त्यामुळे तुमच्या पोटाचे डाएट बिघडून जाते. हे खाणं तसं पाहायला गेलं तर शरीराला पोषक नाहीच त्याचा त्रास तुमच्या पोाच्या आरोग्यावर पर्यायाने तुमच्या त्वचेवर होऊ लागतो. पिंपल्स,तेलकटपणा तुमच्यावर दिसू लागतो. जर तुम्हाला गोष्टी खाण्याचा मोह टाळताच येत नसेल तर चांगल्या भाज्या, सॅलेड, फळ या दिवसात खा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या.

प्रयोग करणे टाळा (Stop Experimenting)

4. Preparation For Bride In Marathi

लग्नासाठी खास अनेकजण काही काही वेगळे एक्सपेरिमेंट करुन पाहतात. म्हणजे हेअर रिमुव्ह करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात. जर तुम्हाला असे काही प्रयोग करुन पाहायचे असतील. तर ते लग्नाला 5 ते 6 महिने असताना करुन पाहा. अचानक केलेला नवा प्रयोग त्रासदायक ठरु शकतो. अगदी त्याच प्रमाणे जर तुम्ही बॉडी पॉलिशिंग आणि फेशिअल करणार असाल तर तुम्हाला अधिक काळजी घ्यायला हवी. एखादे प्रोडक्ट तुमच्या त्वचेला सूट झाले नाही. तर तुम्हाला त्वचेशी संबधित अनेक  त्रास होऊ शकतात.

ADVERTISEMENT

मुंबईतील या बाजारांमध्ये मिळतात स्वस्त आणि मस्त इनरवेअर्स

हेअर रिमुव्ह करताना (While Removing Hair)

जर तुम्हाला रेझर वापरायची सवय असेल तर ती तुम्ही थांबलीत तर उत्तम कारण तुम्हाला ही माहीत आहे की, रेझर फिरवल्यानंतर केसांची वाढ पटकन होते. त्यानंतर तुम्हाला परत परत रेझर फिरवावा लागतो. त्यामुळे शक्य असेल तर वॅक्सिंगचा पर्याय अवलंबा. तुमची त्वचा नाजूक असेल तर एक्सपर्टचा सल्ला घ्या. लग्न  दोन ते तीन महिन्यांवर असेल तरी देखील रेग्युलर वॅक्स करायला विसरु नका.

लुक ठरवताना (Bridal Look Is Impoartant)

5. Preparation For Bride In Marathi

लग्नासाठी लुक देखील महत्वाचा असतो. म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांमध्येही विविधता असते.  तुम्हाला तुमच्या लग्नात कोणता लुक करायचा आहे हे महत्वाचे आहे. तो तुम्ही आणि तुमच्या होणाऱ्या वराने आधीच ठरवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. काऱण जर तुम्ही नऊवारी साडी नेसणार असाल तर आणि वराने वेस्टर्न धाटणीचे कपडे घातले तर तुमची जोडी नक्कीच विजोड वाटेल. त्यामुळे तुम्ही काय घालणार?, कसा लुक ठेवणार ? यावर तुम्ही आधीच विचार करुन ठेवा.म्हणजे आयत्यावेळी गोंधळ होत नाही. 

ADVERTISEMENT

जपून करा शॉपिंग (Shop Sensibly)

आता समस्त नववधुंचा शॉपिंग हा अगदी जीव की प्राण असतो. म्हणून त्या भारंभार गोष्टी घेत बसतात. लग्नाच्या काही दिवस तरी नवीन नवीन कपडे घालीन अशी इच्छा अनेक जणींना असते. त्यामुळे अनावश्यक गोष्टी घेतल्या जातात. त्यापेक्षा जर तुम्ही काही महिन्याच्या फरकाने जर या गोष्टी घेतल्या तर चालू शकतात. एकदाचं घेऊन मोकळ होण्यामध्ये अनेकदा चुकीच्या वस्तूंची निवड केली जाते. मग काय  लग्नानतर ती निस्तरायला काही दिवस तरी आपल्याजवळ वेळच नसतो.

कपडे शिवायला देताना (Give Away Clothes)

6. Preparation For Bride In Marathi

नववधूसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही. अनेकदा मी ब्लाऊज, ड्रेस खराब शिवल्याच्या तक्रारी खूप मैत्रिणींकडून ऐकल्या आहेत. त्यामुळे हा लग्नातील सगळ्यात मोठा अलर्ट आहे. घाईघाईत खूप गोष्टी एकत्र शिवायला देऊ नका. नवीन टेलरकडे कपडे देत असाल तर एकदम देऊ नका. तुम्ही आधी काहीतरी शिवून पाहा मगच शिवाय द्या. तुम्ही जर कपडे एकदम दिले तर टेलरचाही गोंधळ होऊ शकतो.

डॉक्टरांचा घ्या सल्ला (Consult A Doctor)

लग्नाचा काळ हा असा असतो की, तुम्हाला खूप आनंद झालेला असतो. पण सोबतच सगळे काही परफेक्ट व्हावे यासाठी तुमची दगदगदेखील झालेली असते.अशावेळी अनेकदा तुमच्या शरीरात बदल होण्याची शक्यता असते. आता तुम्हाला त्यासाठी जर काय करायचे असेल तर डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या पिरेड्सच्या तारखा, तुमचे एकूणच स्वास्थ्य तुम्हाला तपासून घ्यायचे आहे. जर तुम्ही एकदम फिट असाल तर काहीच तक्रार नाही. पण जर तुम्हाला या कालावधीत फारच ताण आणि थकवा जाणवत असेल तर तुम्ही आधीच थोडी काळजी घेणे महत्वाचे असते. 

ADVERTISEMENT

काय काय नेणार याची करा लिस्ट (List Of Things To Do)

आता तुम्ही लग्नानंतर तुमचे सामान सासरी नेणार म्हटल्यावर तुम्हाला त्याची यादी नको का करायला ? तुमच्याकडे किती गोष्टी आहेत आणि तुम्हाला तिथे काय काय न्यायचे आहे याची एक चेकलिस्टच तयार करा. आम्ही एक चेकलिस्ट केली आहे ती वाचा

7. Preparation For Bride In Marathi

नववधूच्या बॅगेत असायलाच हव्यात या गोष्टी

मेकअप किट (Makeup Kit)

नववधूच्या बॅगमध्ये मेकअप किट हवे. मेकअप रिमुव्हल, गुलाबपाणी, फेसवॉश, स्क्रब, एखाद दुसरे लिपस्टिकचे शेड्स, पावडर, टिश्यूपेपर या गोष्टी त्यामध्ये हव्याच. कारण लग्नानंतर काही दिवस तरी तुमचा घरी रुळेपर्यंत गोंधळ होईल. त्या घरात मेकअपचे सामान तुम्हाला लगेच मिळणार नाही.शिवाय साडी पिन, हेअर पिन, हेअर बन, क्लचर अशा सगळ्या आवश्यक गोष्टी देखील बॅगमध्ये असून द्या.

ADVERTISEMENT

आवश्यक कागदपत्रे (Important Documents)

लग्नानंतर काहीजण लगेच फिरायला बाहेर जातात. अशावेळी तुम्हाला काही कागदपत्रे लागणार असतील तर तुम्ही ती कागदपत्रसोबत ठेवायला हवी. ओळखपत्र, पासपोर्ट अशा गोष्टी तुमच्या जवळ असायला हव्यात. शिवाय लग्नाच्या रजिस्ट्रेनसाठीही तुम्हाला ही कागदपत्रे लागतात.त्यामुले त्याची एक वेगळीच बॅग तुम्ही तुमच्या बॅगमध्ये नीट आतल्या बाजूला ठेवायला हवी.

कपड्यांची तयारी (Clothes To Carry)

8. Preparation For Bride In Marathi

लग्नाचे काही दिवस तरी किमान  काय घालणार त्या नुसार तुम्ही बॅग भरताना कपडे भरा. नाहीतरी तेथे गेल्यानंतर तुम्हाला सगळी बॅग उघडली तर काय घालू असा पडणारा प्रश्न पडणार नाही. सगळ्या गोष्टींचा विचार करुन तुम्ही तुमची बॅग भरा. यामध्ये तुमच्या दिवसा घालण्याच्या कपड्यांपासून, इनरवेअर ते थेट नाईटवेअर असे सगळे कपडे अगदी नीट लावून ठेवा.

तुम्ही अशी तयारी केली तर तुम्ही लग्नासाठी all set आहात. मग आता लागा तुमच्या तयारीला…

ADVERTISEMENT

(फोटो सौजन्य- shutterstock, giphy)

You Might Like This:

नवरी साठी 10 नवीन मराठी उखाणे (Latest Ukhane For Bride)

20 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT