प्लाझमोडियम नावाच्या डासाच्या चावण्यामुळे जो आजार होतो त्याला मलेरिया असे म्हणतात. हा एक विशिष्ट अशा प्रकारचा डास असून त्याची उत्पत्ती ही सांडपाण्यावर होत असते. मलेरिया या आजारावर आतापर्यंत अनेक शोध लावण्यात आलेले आहेत. मलेरिया मराठी माहिती, Malaria Symptoms In Marathi जाणून घेणे हे फारच गरजेचे आहे. ज्या ठिकाणी अस्वच्छ असे वातावरण असते. अशा ठिकाणी मलेरिया हा अधिक जास्त प्रमाणात फोफावताना दिसतो. मलेरियाला हिवताप असे देखील म्हटले जाते.हा एक संसर्गजन्य आजार असून याकडे दुर्लक्ष करणे हे प्राणघातक ठरु शकते. त्यामुळे जर हिवतापाची किंवा मलेरियाची लक्षणे जाणवत असतील आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे असते. आज आपण जाणून घेणार आहोत मलेरिया मराठी माहिती, Malaria Symptoms In Marathi मराठीमध्ये.
मलेरिया झाला की नाही हे निकषाद्वारे कळतेच. पण काही लक्षणे जाणवू लागली की, मलेरियाची चाचणी करणे फारच महत्वाचे असते. जाणून घेऊया मलेरिया ची लक्षणे मराठी (Symptoms Of Malaria In Marathi)
मलेरिया झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसायला थोडा वेळ जातोच. ही लक्षणे दिसायला किमान आठवडा तरी लागतो. जर तुम्हाला थंडीचे दिवस नसतानाही कुडकुडून थंडी लागत असेल तर हे मलेरियाचे लक्षण आहे. मलेरिया झाल्यानंतर रुग्णाला थंडी वाजू लागते. दोन ते तीन चादरी घेतल्या तरी देखील ही थंडी काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करायला नको.
एखादा बाधित डास चावल्यानंतर तुम्हाला मलेरिया होतो. या मलेरियामध्ये तुम्हाला ताप येतो. हा ताप खूप जास्त असतो. ताप सतत येत असेल आणि उतरत नसेल तर अशा तापाकडे दुल्रक्ष करु नका. कारण हा ताप तुम्हाला अधिक त्रासदायक ठरु शकतो. जर तुमचा ताप सतत उतरत असेल आणि पुन्हा येत असेल पण तुम्हाला पूर्णपणे आराम मिळत नसेल तर नक्कीच तुम्हाला मलेरिया असू शकतो.
तापामध्ये अंग हे अधिक जास्त दुखू लागते. स्नायूंमध्ये काहीही बळकटी नसल्यामुळे अंग अजिबात उचलावेसे देखील वाटत नाही. तुम्हालाही काहीही न केल्या अशी स्नायू दुखी किंवा अगं गळून गेल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही मलेरियाची चाचणी करुन घ्यायला हवी.
मलेरियामध्ये उलट्या होणे देखील स्वाभाविक आहे. खूप जणांना काहीही खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी खूप वेळा उलटी आल्यासारखे होते. मुळात खाण्याची इच्छा होत नाही. खाल्ले तर ते बाहेर उलटून जाते. त्यामुळे तुम्हाला सतत उलटी होत असेल तर तुम्ही त्याकडे लक्ष द्यायला हवे.
मलेरियामध्ये खूप रुग्णांचे पोट देखील बिघडते. खाल्लेेले काही पचत नाही. कशाचीही चव लागत नाही. इतकेच नाही तर अशावेळी जुलाबाचे त्रासही होऊ लागतात. थंडी, ताप, उलट्या आणि जुलाब असा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही त्याची योग्य खात्री करुन घेणे फारच गरजेचे असते. जुलाब सतत झाल्यामुळे अंगातून त्राण गेल्यासारखे होते. इतकेच नाही. तर काहीही काम करण्याची इच्छा देखील होत नाही.
मलेरियाचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक देशानुसार तेथील असलेल्या डासांवरुन मलेरिया होत असतो. मलेरियाचे प्रकार किती आहेत ते जाणून घेऊयात.
मलेरियाचा हा प्रकार आफ्रिकेमध्ये सगळ्यात जास्त जाणवतो. मलेरियाचा हा एक सर्वसामान्य असा प्रकार असूनहा सगळीकडे होतो. हा मलेरिया घातकी असून त्यामुळे मृत्यूची शक्यतादेखील असते.
आशिया आणि दक्षिण अमेरिकेमध्ये हा प्रकार अधिक आढळून येतो. वरील प्रकाराच्या तुलनेत हा कमी घातकी असला तरी हा प्रकार शरीरात साधारण तीन वर्षांहून अधिक काळासाठी राहू शकतो. याचा परिणाम म्हणजे तुम्हाला हा त्रास परतण्याची शक्यता असते.
हा खूप दुर्लभ असा प्रकार आहे. मलेरियाचे हे डास आणि हा प्रकार खूप वर्षांपूर्वी पश्चिम आफ्रिकेमध्ये आढळून आले होते. पण त्यानंतर हा प्रकार फारसा आढळून आला नाही.
मलेरिया झाल्यानंतर घाबरुन न जाता तुम्हाला काही गोष्टी त्वरीत करणे देखील गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही उपाय म्हणू काय करायला हवे ते जाणून घेऊया.
जर तुम्हाला डास चावल्यानंतर काही दिवसांनी थंडी, ताप, उलट्य, जुलाब अशी काही लक्षणे जाणवू लागली असतील तर तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मलेरियाचा ताप हा पूर्णवेळ असतो. त्यामुळे ताप असेपर्यंत तुमचे शरीर दुखल्यासारखे होते. काही जणांना हा ताप थांबून थांबून देखील येतो. अशावेळी तुम्हाला संशय असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले असते. या शिवाय कोरोनाची लक्षणे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे.
तुम्हाला आलेला ताप हा मलेरियाचा आहे की नाही याची खात्री करुन घेण्यासाठी डॉक्टर रक्त चाचणी करुन घेण्याचा सल्ला देतात. रक्त चाचणी करुन घेतल्यानंतर जर त्यामध्ये तुम्हाला मलेरिया झाला आहे ते सिद्ध झाले असेल तर मग त्यापुढे तुमचा इलाज केला जातो.
डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे हे देखील महत्वाचे असते.तुम्ही योग्य औषधे घेतली तर त्यातून बाहेर पडणे फार सोपे जाते. मलेरियावर फारशी अशी औषधे नाहीत. पण तुम्ही कोणी सांगितली म्हणून औषधे घेऊ नका. तर तुम्ही योग्य सल्ल्यानिशीच औषधांचे सेवन करा. याशिवाय डासांपासून सुटका करणारी झाडे लावा.
मलेरिया झाल्यानंतर किंवा त्याचा त्रास इतरांना होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही काही काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला मलेरियाची लागण होणार नाही.
हल्ली दाटीवाटीने बांधलेली घर आणि पाण्याचा किंवा कचऱ्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे त्या ठिकाणी सांडपाणी साचून राहते. या सांडपाण्यामध्ये मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे अशावेळी आपल्या आणि मुलांच्या काळजीसाठी घरात मच्छरदाणी लावून झोपा. त्यामुळे मुलांना डासांच्या दंशाचा त्रास होणार नाही. त्यामुळे जर तुमचे घर सांडपाण्याच्या ठिकाणी असेल तर तुम्ही मच्छरदाण्या लावूनच झोपा.
खूप ठिकाणी सांडपाण्याचा त्रास असतो. अशा ठिकाणी पालिकेकडून तुम्ही जंतुनाशकाची फवारणी करुन घ्या. अनेक ठिकाणी धूरवाले येतात. त्यांनी फवारणी केल्यामुळे डासांची अंडी मरुन जातात. इतकेच नाही तर डासांची पैदाईस कमी व्हायलाही मदत होते. त्यामुळे जंतूनाशकाची फवारणी करायला अजिबात विसरु नका.
डासांचा नायनाट करण्यासाठी तुम्हाला फवारणी करणे शक्य नसेल तर तुम्हाला तुमची काळजी म्हणून डासनाशकाचा वापर करायला हवा. हल्ली डासांसाठी बरेच ऑईन्मेंट मिळतात. ते तुम्ही लावू शकता. त्यामुळे तुम्हाला डास चावणार नाही. त्यामुळे तुमच्या मुलांजवळ तुम्ही डासनाशक ठेवा. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.
मलेरियामुळे येणारा ताप हा खूपच त्रासदायक असतो. असा ताप तुमचे आरोग्य खालावू लागतो. तुम्हाला येणारा सततचा ताप घालवण्यासाठी तुम्ही थंड पाण्यात मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवू शकता. मीठाच्या पाण्याचा घड्या घातल्यामुळे ताप कमी होण्यास मदत मिळते.
मलेरिया झाल्यानंतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही. पण आजारातून बाहेर पडण्यासाठी चांगला आहार गरजेचा असतो. तुमच्या आहारात फळ, भाज्या यांचा समावेश करायला हवा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त उर्जा मिळायला मदत मिळेल
मलेरिया झाल्यानंतर सुरुवातीला डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य असते. त्यानंतर तुम्ही आहारात काही बदल करुन काळजी घेऊ शकता. या काळात शरीरातील उर्जा कमी झालेली असते. त्यामुळे तुम्ही चांगल्या पदार्थांचे सेवन करणे हे गरजेचे असते.
थंडी वाजून ताप येणे हे मलेरियाच्या तापाचे मुख्य लक्षणं आहे. जर तुम्हाला वातावरणात थंडी नसताना थंडी वाजत असेल तर तुम्हाला मलेरिया झालेला असू शकतो. मलेरियामध्ये अंगदुखी, स्नायूदुखी असा त्रास देखील होण्याची शक्यता असते.
प्रत्येकाचा मलेरिया हा वेगळा असतो. मलेरियाचा तुम्हाला किती त्रास झाला आहे यावरुन याचा कालावधी ठरत असतो. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते. त्यांचा मलेरिया बरा होण्यास मदत मिळते. पण त्यातून पूर्ण बरे व्हायला किमान महिना तरी जातो. काही जणांना तर दोन-तीन महिने आणि त्याहून अधिक काळ बरे होण्यासाठी लागू शकतो.
अधिक वाचा:
निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे प्रकार | Types of Yoga For Health In Marathi
बाजरी खाण्याचे फायदे, रोजच्या जेवणात करा समावेश | Bajari Benefits In Marathi