कोरोना व्हायरस हा शब्द आता आपल्याल नवीन राहिलेला नाही. 2019 पासून आपल्याला या शब्दाची ओळख झालेली आहे. कोरोना संदर्भात रोज नव्या बातम्या आपण ऐकतच आहोत.त्यामुळे कोरोना म्हणजे काय हे आपण जाणतोच. पण अजूनही खूप जणांना त्याची योग्य माहिती नाही. अशावेळी कोरोना म्हणजे काय? (What Is Corona) हे जाणून घेत कोरोनाची लक्षणे किती दिवसात दिसतात हे जाणून घेणेही गरजेचे आहे. सगळ्यात पहिली कोरोनाची केस ही चीनमधील वुहान या शहरात सापडली. त्यावरुनच त्याला ‘कोव्हिड 19’ असे नाव देण्यात आले. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण हा मार्च 2019 मध्ये आढळला. त्यानंतर परदेशातील अनेक लोकांकडून संक्रमित होत हा आजार भारत आणि अन्य देशातही पसरला. कोरोनावरील संशोधन अजूनही पूर्ण झालेले नाही. या व्हायरसविषयी अनेकांची वेगवेगळी मतं असली तरी देखील या विषाणूविषयी काही माहिती असणं हे गरजेचे आहे. कोरोना व्हायरस हा एक जड प्रकारातील विषाणू आहे. हा एखाद्या गोष्टींवर तसाच पडून राहतो. या व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर तो तोंड, डोळे ,नाकावाटे आत जाण्याची शक्यता असते. याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. या आजाराकडे दुर्लक्ष केले तर तो शरीरातील अवयव निकामी करायला सुरुवात करतो. ज्यामुळे मरणही येऊ शकते. या व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर कोरोनाची लक्षणे किती दिवसात दिसतात असा प्रश्न पडला असेल तर प्रतिकारशक्तीवर या गोष्टी अवलंबून आहेत. जर तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल तर तुम्हाला हा त्रास अगदी एक ते दोन दिवसात जाणवू शकतो. कोरोनाची लक्षणे कोणती हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर जाणून घेऊया कोरोनाची लक्षणे.
Corona Symptoms In Marathi
इतर कोणत्याही आजाराप्रमाणे या व्हायरसची लागण झाल्यानंतर ताप येतो. हा ताप अगदी सणकून येतो. तापासाठी घरगुती उपाय ही केले जातात. जर तुम्हाला ताप हा चार दिवसांहून अधिक दिवस झाले तरी तसाच असेल तर तुम्ही लगेचच तुमची चाचणी करुन घ्या. कारण या आजारामध्ये ताप उतरत नाही. उलट तो तसाच शरीरात राहतो. जर तुमचा ताप उतरत नसेल तर तुम्ही लगेचच चाचणी करा.
तापासोबत या आजाराचे आणखी एक लक्षण म्हणजे कफ. या आजाराची लागण झाल्यानंतर सर्दी होते. सर्दीचे रुपांतर हे कफमध्ये होते. छातीत साचलेला हा कफ पुढे जाऊन श्वसनाला अडथळा निर्माण करतो. त्यामुळे या आजारात कफ झाल्यानंतर वाफ घेण्यास सांगितली जाते. वाफ घेतल्यामुळे यामध्ये बऱ्यापैकी आराम मिळतो. जर तुम्हाला कफ झाला असेल तर तुम्ही लागलीच डॉक्टर गाठणे आवश्यक असते. कोरोनाची लक्षणे आणि उपाय जाणून घेणे महत्वाचे आहे. म्हणजे तुम्हाला या आजाराशी दोन हात करणे सोपे जाईल.
अर्धांगवायू लक्षणे, कारणे आणि घरगुती उपचार
कोरोना हा तुमच्या अनेक अंतर्गत अवयवांवर परिणाम करतो. हा फुफ्फुसांवर परिणाम करतो. या आजारांच्या तीव्र लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे श्वसनाला अडथळा. श्वसनाला अडथळा झाला असेल तरी देखील तुम्हाला कोरोनाची लागण झालेली असू शकते.हा व्हायरस शरीरात गेल्यानंतर खूप जणांना श्वसनाची कमतरता दिसून आली आहे. शरीरात ऑक्सिजनची कमतरतता असेल तरी देखील अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्हाला श्वसनासा अडथळा होत असेल तर त्वरीत डॉक्टर गाठा. कोरोनाची लक्षणे यामध्ये याचा समावेश होतो.
वाचा – Symptoms Of Tuberculosis In Marathi
सतत येणारा खोकला, ऑक्सिजनची कमतरता यामुळे छातीत दुखू शकते. शरीर कमजोर झाल्यामुळे हा त्रास होण्याची शक्यता असते. छातीत सतत दुखत असेल आणि त्यावर ताण आल्यासारखा वाटत असेल तरी देखील तुम्ही कोरोनाची चाचणी करुन घ्या.
कोरोनाच्या लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे वाचा जाणे. खूप जणांना या आजाराचा त्रास होऊ लागला की, वाचा जाते. म्हणजे एखाद्याचे बोलणे हे अचानक बंद होऊन जाते. या आजारामध्ये खूप जणांना मानसिक धक्का देखील बसतो. हे या आजाराचे एक लक्षण असले तरी देखील त्याबद्दल तशी फारशी माहिती किंवा ठोस पुरावा नाही.
कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर हे देखील लक्षण जाणवते. व्हायरस जर शरीरात गेला असेल तर शौचाच्या समस्या होतात. पोटात काहीच राहात नाही. पातळ शौचाला होऊ लागते. जुलाब होतात. जर तुम्हाला पातळ जुलाब होत असतील तरी देखील तुम्हाला याची लागण होऊ शकते. जुलाब सतत झाल्यामुळेही शरीराला थकव येऊ शकतो. त्यामुळे जुलाब हे देखील या आजाराचे एक लक्षण आहे. जुलाबवर घरगुती उपाय तुम्हाला करता येतात.
कोरोनाची लक्षणे
कोरोनाचा हा विषाणू थेट घशात होतो. अशावेळी घशाची खवखव वाढवतो. कोरडा खोकला हे या आजाराचे लक्षण आहे. जर तुम्हाला घशाची खवखव जाणवत असेल तर तुम्हाला हा त्रास झालेला असू शकतो. घशात कोरोना व्हायरस गेल्यामुळे ही खवखव जाणवते. जर तुम्हाला एक दिवसांहून अधि काळासाठी घशाती खवखव जाणवत असेल तर तुम्ही कोरोनाची चाचणी नक्कीच करायला हवी.
झोप येणे हे कोरोनाच्या लक्षणापैकी एक लक्षण आहे. यामध्ये सतत झोप येत राहते. तुम्हालाही विनाकारण झोप येत असेल तर तुम्हाला कोरोना झालेला असू शकतो. जर अशी झोप तुम्हाला येत असेल तर तुम्ही लगेचच चाचणी करुन घ्या. कारण चाचणी केल्यानंतर तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही हे कळू शकेल.
Corona Symptoms In Marathi – Tiredness
थकवा हे कोणत्याही आजाराचे लक्षण आहे. पण कोरोनामध्ये अंग मोडून येते. थंडी वाजून आलेला ताप यामुळे शरीर पूर्णपणे थकून जाते. काहीही करण्याची इच्छा होत नाही. हा थकवा हाडाहाडांमध्ये जाणवू लागतो. अंगत असलेली कणकण इतकी असह्य करते की, काहीच करावेसे वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला असा थकवा जाणवत असेल तर तुम्ही तुमची चाचणी करुन घ्या. कोरोनाची लक्षणे आणि उपाय जाणून घेण्यासाठी डॉक्टर गाठा.
जाणून घ्या न्यूमोनिया लक्षणे व उपचार
सगळ्यात आधी आलेल्या काही लक्षणांमध्ये वास आणि चव न लागणे या लक्षणांचा समावेश होता. कोरोनाची लागण झाली असेल तर अशावेळी कोणताही वास येत नाही. आणि पदार्थांची चवही लागत नाही. जर तुम्हाला सर्दी न होता अशाप्रकारे वास येत नसेल तर हे कोरोनाचे लक्षण असू शकते. वास न येण्यासोबतच जर तुम्हाला चव लागत नसेल तर तुम्ही लगेचच तुमच्या फॅमिली डॉक्टरांना भेट द्या आणि योग्य ती चाचण करुन घ्या.
हो, कोरोना झाल्यानंतर सेल्फ आयसोलेशन गरजेचे असते. हा आजार संपर्कातून होणारा आजार आहे. त्यामुळे या व्हायरसची लागण इतरांना होऊ नये यासाठी सेल्फ आयलोशनल करण्यास सांगितले जाते. या सेल्फ आयसोलेशनच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधे दिली जातात. जर रुग्णाची परिस्थिती गंभीर असेल तर अशावेळी त्याला सेल्फ आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले जाते. जिथे रुग्णाची काळजी घेतली जाते. साधारण 14 दिवसांच्या आयसोलेशनचा कालावधी असतो. तो कमी-जास्त होऊ शकतो.
हो, असिंटेमॅटीक कोरोना म्हणजे कोणतीही लक्षण नसललेला कोरोना देखील अनेकांना झालेला आहे. तुमच्या आजुबाजूला कोणाला कोरोना झाला असेल आणि तुम्ही त्याच्या संपर्कात कधीतरी आला असाल तर अशावेळी लक्षण नसतानाही केवळ खात्री करुन घेण्यासाठी तुम्ही चाचणी करुन घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या शंकेचे निरसन होण्यास मदत मिळेल.
कोरोना आल्यापासून यामध्ये अनेक स्थित्यंतरे पाहायला मिळाली. पहिल्यांदा कोरोना आल्यानंतर त्याचा त्रास 60 वर्षांहून अधिक असलेल्या व्यक्तिंना होण्याची भीती होती. रक्तदाब, मधुमेह असा त्रास असणाऱ्यांना या आजाराची तीव्र लक्षणे जाणवत होती. दुसऱ्या लाटेत अनेक तरुणांना याचा त्रास झाला. आता या तिसऱ्या लाटेत त्याचे परिणाम लहान मुलांना जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुलांना अद्याप लसीकरण सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळेच लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर तुम्ही खबरदारी घेणे फारच गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही काही गोष्टी करायला हव्यात 1. तातडीने स्वत:ला विलग करा. २. कोरोनाची चाचणी करुन घ्या. ३. डॉक्टरांच्या संपर्कात राहून तुम्हाला जो त्रास होत असेल त्याची योग्य औषधे मागून घ्या. ४. श्वसनाचा त्रास होत असेल तर तो योग्य वेळी कळवा. ५. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य असा आहार घ्या.