उन्हाळा असो वा पावसाळा शॉर्ट ड्रेस जास्त आरामदायक वाटतात. आजकाल तर शर्ट ड्रेसचाही ट्रेंड आहे. तरूण मुली असो वा महिला सर्वांनाच शर्ट ड्रेस भुरळ घालतात. पार्टी, पिकनिकला जाताना शर्ट ड्रेस वापरणं जास्त सोयीचं असतं. ऑफिसमध्ये फॉर्मल शर्ट ड्रेस चांगले वाटतात. महिलांची शर्ट ड्रेसची आवड लक्षात घेत आजकाल बाजारात विविध स्टाईलचे शर्ट ड्रेस सहज मिळतात. मात्र स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही देखील एखादा छान शर्ट ड्रेस विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टी नक्की माहीत अयासला हव्या. कारण शर्ट ड्रेस तुम्ही कुठे घालणार आहात यावरून अनेक गोष्टी ठरू शकतात. म्हणूनच वाचा या टिप्स… तसंच वाचा बॉडीकॉन ड्रेस आणि स्टायलिंग टिप्स,(Bodycon Dresses In Marathi), ओव्हरसाईज टी-शर्टने असा करा स्टायलिश लुक (How To Style Oversized T-Shirt In Marathi), ट्युब टॉपचे स्टायलिश आणि हटके प्रकार (Tube Tops For Women In Marathi)
तुमचा बॉडी टाईप
शर्ट ड्रेस खरेदी करताना तुमचा बॉडी टाईप तुम्हाला लक्षात घेऊन मगच खरेदी करायला हवी. बाजारात यासाठी विविध बॉडी टाईपनुसार शर्ट ड्रेस विकत मिळतात. थोडक्यात जर तुमचा बॉडी टाईप अॅपल शेप असेल तर तुम्ही शॉर्ट ड्रेस वापरू शकता. ज्यामुळे तुमचे पाय छान दिसतील. तसंच जर तुम्ही ओव्हर ग्लास बॉडी टाईपच्या असाल तर तुम्हाला डेनिम शर्ट ड्रेस जास्त छान दिसतील. फ्लोरल प्रिंटचे शर्ट ड्रेसही पावसाळ्यात ट्रेंडमध्ये आहेत.
कोणत्या ओकेशनसाठी
शर्ट ड्रेस तुम्ही कधी आणि कुठे वापरणार आहात हे लक्षात ठेवायला हवं. कारण असे ड्रेस तुम्ही ऑफिसमध्येही वापरू शकता आणि बाहेर फिरायला जाताना देखील वापरू शकता. ऑफिसला जाताना तुम्हाला फॉर्मल टाईपचे ड्रेस निवडावे लागतील. जे जास्त शॉर्ट नसतील. मात्र बाहेर फिरायला जाताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार शॉर्ट शर्ट ड्रेस निवडू शकता.
फिटिंग आहे मस्ट
शर्ट ड्रेस खरेदी करताना तो सैल असावा असं प्रत्येकीला वाटतं. म्हणून महिला नेहमी एक साईज जास्त मोठा असलेला शर्ट ड्रेस खरेदी करतात. मात्र जर तुम्हाला स्टायलिश दिसायचं असेल तर परफेक्ट साईजचा आणि फिटिंगचा शर्ट ड्रेस घ्यायला हवा. कारण सैल ड्रेसमध्ये तुमच्या लुकला स्टायलिश ग्रेस मिळत नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक