ADVERTISEMENT
home / आपलं जग
How to buy the best Yoga mat in Marathi

योगा मॅट खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी

निरोगी जीवनशैलीसाठी प्रत्येकाने दिवसातून थोडा वेळ व्यायामासाठी काढायला हवा. कोरोनाच्या काळात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योगायने, प्राणायम खूप गरजेचं आहे. जाणून घ्या Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे. योगासने तुम्ही घरी करा अथवा सर्वांसोबत पार्क अथवा योगा स्टुडिओमध्ये… पण यासाठी योग्य एक्सेसरीज तुमच्याजवळ असायला हव्या. योगासनांचा सराव करण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे योगा मॅट… पण आजकाल बाजारात मिळणाऱ्या योगा मॅट आसन करण्यासाठी मुळीच योग्य नसतात. तुम्ही ऑनलाईन रिसर्च न करता योगा मॅट खरेदी केली तर तुमची फसगत होऊ शकते. यासाठी फॉलो करा या काही खास टिप्स तसंच ही योगासने करुन वाढवा प्रतिकारशक्ती (Yoga To Improve Immune System In Marathi )

योगा मॅट का आहे गरजेची 

योगासन करताना तुम्हाला ते तुमच्या आसनावर करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही इतरांसोबत योगासनांचा सराव करता तेव्हा तुमचे आसन म्हणजेच योगा मॅट खूप गरजेची ठरते. कारण तुमचे आसन ही तुमची खास बैठक अथवा जागा असते. योगा अथवा व्यायाम करताना येणारा घाम  तुमच्या अंगावरू गळत असतो. अशा वेळी जर तुम्ही योगा मॅट शिवाय आसान केलं तर तुम्ही जमिनीवरून सटकण्याची शक्यता असते. शिवाय योगा अथना मेडिटेशन करताना तुमच्या अंगात निर्माण होणारी उर्जा यामुळे वाया जात नाही. यासाठी योग्य रिसर्च करूनच योगा मॅट खरेदी करा.

वजन कमी करण्यासाठी, करून पाहा ‘हे’ योगासने (Yoga For Weight Loss In Marathi)

योगा मॅट खरेदी करताना कोणत्या गोष्टी पाहाव्या

योगा मॅट खरेदी करताना शक्य असल्यास ती प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करा. कारण ऑनलाईन तुमची फसगत होण्याची शक्यता असू शकते.

ADVERTISEMENT

योगा मॅटची जाडी

तुमची योगा मॅट किती जाड आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. यासाठी लक्षात ठेवा मॅट जास्त जाड अथवा जास्त पातळ असता कामा नये. योगामॅटची जाडी कमीत कमी 1.5 असावी त्यापेक्षा जास्त जाड अथवा कमी ती असू नये. कारण जास्त जाड असेल तर तुम्ही यावर गादी सारखं फिलिंग आल्यामुळे बॅलन्सची आसने करू शकत नाही तर पातळ असेल तर तुमच्या हाडांना योगा करताना दुखापत होऊ शकते. 

कॅरी करण्यासाठी सुलभ

आजकाल योगा स्टुडिओमध्ये, पार्कमध्ये अथवा मोकळ्या जागी योगाभ्यास शिकवला जातो. घरातून अशा ठिकाणी जाताना तुम्हाला तुमची योगा मॅट कॅरी करावी लागते. त्यामुळे तुमची योगा मॅट अशी असावी जी सहज गुंडाळून तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. शिवाय प्रवास करतानाही तुम्ही अशा प्रकारे तुमची योगा मॅट सोबत ठेवू शकता.

इको फ्रेंडली

आजकाल बाजारात विविध प्रकारच्या आणि विविध मटेरिअलच्या मॅट मिळतात. मात्र लक्षात ठेवा योगामुळे जसं आपलं शरीर संतुलित राहतं तसंच आपण पर्यावरणाचं संतुलनही टिकवलं पाहिजे. यासाठी तुम्ही योगा मॅट खरेदी करताा ती पर्यावरणाला पूरक आणि पोषक आहे का हे जरूर पाहावं.

15 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT