ADVERTISEMENT
home / पालकत्व
लहान मुलांसाठी कसे खरेदी करावे वाईप्स, बेबी वाईप्स असतात का सुरक्षित

लहान मुलांसाठी कसे खरेदी करावे वाईप्स, बेबी वाईप्स असतात का सुरक्षित

बाळाचे संगोपन ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र पूर्वी आईवडिलांकडे बाळाच्या संगोपनासाठी जितका वेळ असायला तितका असू शकत नाही. बाळ थोडं मोठं होताच आईला पुन्हा कामावर रूजू व्हावं लागतं. त्यामुळे बाळाची काळजी घेण्यासाठी आधुनिक गोष्टींचा वापर केला जातो. पूर्वी बाळाने शी केल्यावर अथवा बाळाला स्वच्छ करण्यासाठी ओल्या कापडाचा वापर केला जायचा. मात्र हायजीन मेंटेन करण्यासाठी आजकाल वॉटर वाईप्स वापरण्यात येतात. जाणून घ्या बाळासाठी हे वाईप्स सुरक्षित असतात का आणि ते कसे खरेदी करावे. तसंच वाचा बाळ रडण्याची कारणे आणि उपाय | Reasons Why Your Baby Is Crying In Marathi, बाळाची काळजी कशी घ्यायची (Navjat Balachi Kalji In Marathi), बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय | Babies Diaper Rash Home Remedies In Marathi

बेबी वाईप्स कसे खरेदी करण्यासाठी टिप्स

बाळासाठी तुम्ही बेबी वाईप्स खरेदी करत असाल तर या गोष्टी तुम्ही अवश्य पाहायला हव्या.

वाईप्स सुरक्षित आहेत का

बाळासाठी तयार करण्यात येणाऱ्या वाईप्सचे हायजीन योग्य प्रमाणात राखलेली असावे. मात्र आजकाल बाजारात विविध प्रकारचे वाईप्स मिळतात. असे कोणतेही वाईप्स तुमच्या मुलांसाठी सुरक्षित असू शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला पॅकिंगवर दिलेले घटक नीट वाचायला हवेत. बाळाच्या नाजूक त्वचेसाठी योग्य अशा घटकांपासून बनवलेले वाईप्स तुमच्या बाळासाठी खरेदी करा. यासाठी तुम्ही मायग्लॅमचे वाईप आऊट बेबी सेफ्टी वाईप्स वापरू शकता.

वाईप्ससाठी वापरण्यात येणारे साहित्य

बाळासाठी वाईप्स खरेदी करताना ते मऊ आणि नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेले आहेत याची खात्री करून घ्या. बाजारात विविध प्रकारचे वाईप्सचे ब्रॅंड पाहून तुम्ही कदाचित चक्रावुन जाल. यासाठी नेहमी प्लांट बेस मटेरिअलचे वाईप्स बाळासाठी विकत घ्या. दी मॉम कंपनीचे बेबी वाईप्स यासाठी अतिशय सुरक्षित आणि नैसर्गिक घटकांपासून बनवण्यात आलेले आहेत. ज्यामुळे मुलांची त्वचा स्वच्छ केल्यावर ती कोरडी पडत नाही अथवा अंगाला खाजही येत नाही.  

ADVERTISEMENT

वॉटर बेस्ड वाईप्स

बाजारात मिळणाऱ्या अनेक वाईप्समध्ये सुगंध अथवा इतर केमिकल्स मिसळेलेले असतात. मात्र असे वाईप्स त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतात. म्हणूनच बाळासाठी 99 टक्के वॉटर बेस्ड ऑर्गेनिक बेबी वाईप्स निवडा. तसंच लक्षात ठेवा वाईप्सने पुसल्यावर बाळाच्या अंगावर बेबी पावडर वापरा.

डर्मेटोलोजिकली टेस्टेड

बाळासाठी कोणतेही उत्पादन निवडताना ते नेहमी डर्मेटोलोजिकली टेस्टेड असेल याची खात्री करून घ्या. कारण तुमच्या बाळाची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. त्यामुळे कोणतेही उत्पादन न चेक करता तुम्ही बाळासाठी वापरू शकत नाही.

बेबी वाईप्समध्ये काय नसावे

बेबी वाईप्स खरेदी करताना त्यामध्ये अल्कोहोल, पेराबीन, टॉक्सिन्स असे घटक कधीच नसावे. शिवाय काही वाईप्समध्ये केमिकल्स आणि पॉलीमर्स वापरण्यात येतात ज्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. असे वाईप्स पर्यावरणासाठी देखील घातक असतात. बेबी वाईप्स जर बायोडिग्रेबल घटकांचे असतील तर ते वापर झाल्यावर सहज विरघळतात आणि पर्यावरणाचे नुकसान होत नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
04 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT