ADVERTISEMENT
home / Dad
Importance Of Father Son Relationship

वडील आणि मुलातील सकारात्मक नात्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

वडील आणि मुलगा यांच्यातील नातं थोडं अवघडच असतं. आईजवळ मुलं लगेच मोकळी होतात. त्यामुळे आईशी त्यांचं चांगलंच गुळपीठ असतं. मग आईसाठी खास सेलिब्रेशन वगैरे होताना दिसत. काहीवेळा वडिलांची आणि मुलाची आवड एकसारखी नसेल तर अजूनच अवघड होतं. वडिलांवरील कविता त्यामुळे आपसूकच कमी होताना दिसतात. तर अनेकवेळा मुलावर प्रेम करायची इच्छा असूनही वडील मागे हटतात. यामागील प्रमुख कारण एकमेंकाशी कनेक्ट कसं करायचं हे असू शकतं. पण तुम्ही खालील टिप्स वाचल्यास तुमच्या मुलाचे आणि तुमचे नाते छान होऊ शकते. मग fathers day wishes in marathi देण्यापुरतं तुमचं मुलासोबतच नात राहणार नाही.

वडील आणि मुलाचं वयासोबत बदलणारं नातं

प्रत्येक नातं हे काळासोबत बदलत असतं. त्याचप्रमाणे वडील आणि मुलाचं नातंही काळासोबत बदलताना दिसतं. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा ते वडिलांना आपला आदर्श मानतात आणि आपल्या बाबांपेक्षा चांगलं कोणीच नाही असं त्यांना वाटतं. पण जसं जसं ते तारूण्यात प्रवेश करतात. तेव्हा त्यांना वडिल आवडेनासे होतात. कारण दोघांचे विचार जुळत नाहीत आणि विरोधाभास होतात. ज्यामुळे तारूण्यात वडील-मुलांच नातं काहीसं तुटक होतं. मग वय वाढताना वडिलांच्या स्वभावाची आणि वागण्याची स्वतःशी तुलना होऊ लागते. आयुष्यात एक एक गोष्टी मिळवू लागल्यावर जणू वडिलांशी स्पर्धा सुरू होते. पण 30 किंवा 40 शीत मात्र हेच बापमुलाचं नातं एकमेकांतील दुरावा विसरून जवळ येतं. मुलगा आपल्या वडिलांना आपलंस करू लागतो. या वयात दोघांमधील नातं मैत्रीने बहरू लागतं. 50 शी मध्ये मुलाला कळतं की, तो आपल्या वडिलांचीच कॉपी आहे. तर हे प्रवास पूर्ण करायचा की आधीच आपल्या मुलाला विश्वासात घेऊन नातं बहरू द्यायचं हे वडिलांच्या हातात आहे.

बाप-मुलाचं नातं दृढ करण्यासाठी टिप्स

पूर्वीच्या काळी वडील मुलाचं नातं हे फक्त भीती आणि आदर यावर अवलंबून असायचं. नात्यात प्रेम असूनही भावनिक दरी मात्र कायम असायची. पण आता काळ बदलतोय आणि या नात्यातही बदल घडून येत आहे. पाहा तुम्ही वडील असूनही मुलाचे मित्र कसे बनू शकता.

सकारात्मक प्रभाव

अनेकजणांच्या हे लक्षात येत नाही पण जेव्हा ते लहान असतात तेव्हा ते आपल्या वडिलांना पाहूनच अनेक गोष्टी शिकत असतात. मुलांची जडणघडण ही वडिलांच्या प्रभावामुळे होत असते. जी दिसून येत नाही पण खरी आहे. मुलं आपल्या आईवडिलांना पाहत असतात, तरूण मुलं नेहमी आदर देणं किंवा न देणे, स्त्रियांशी वागताना अप्रत्यक्षपणे वडिलांना फॉलो करत असतात. वडिलांना पाहून दुसऱ्यांशी कसं बोलायचं किंवा वागायचं हे शिकतात. त्यामुळे मुलांवर वडिलांनी नेहमी सकारात्मक परिणाम करावा.

ADVERTISEMENT

कधीतरी दंगामस्ती करावी

बऱ्याचदा लहान असताना मुलांना थोडे कठीण आणि दंगा असलेले खेळ खेळावेसे वाटतात. तेव्हा वडिलांनी थोडंस मऊपणा स्वीकारून त्यांच्यासोबत कुस्ती किंवा धावणे असे खेळ खेळावे. अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच मुलांसोबतच तुमचं नातं बहरेल. खेळ खेळताना त्यांची काळजी घ्यायला विसरू नका. यामधूनच त्यांना स्केटबॉर्डींग, रॉक क्लायबिंग आणि इतर खेळांची आवड निर्माण होईल.

समान आवड निर्माण करा

प्रत्येक नातं हे तेव्हा दृढ होतं जेव्हा दोघांची आवडसारखी असून त्याबाबत बोललं जातं आणि शेअरिंग होतं. पण बरेचदा बाप-मुलाच्या नात्यात हे आढळत नाही आणि त्यामुळे ते एकमेंकासोबत वेळ घालवत नाहीत. परिणामी दोघांमधील प्रेम कमी असल्याचं भासू लागतं. हे टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एकत्र चित्रपट पाहणं किंवा खेळाचे सामने पाहणं ज्यामुळे तुम्हा दोघांमध्ये सारखी आवड असेल.

सहभाग घ्या

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाप-मुलगा एकत्र करू शकतात. ज्यामुळे तुमच्यातील नातं बहरू शकतं. जसं किचनमध्ये एखादा पदार्थ बनवणे किंवा शाळेच्या एखाद्या उपक्रमासाठी मुलाची मदत करणे. वडिलांनी अशा गोष्टी मुलं लहान असतानाच सुरू केल्या पाहिजेत.

छोट्यांच्या मोठ्या गोष्टी

मुलांना लहानपणी एखाद्या मोठ्या गोष्टीत सहभाग घेण्याची फार आवड असते. त्यामुळे वडील हे त्यांच्या गाडीच्या दुरूस्तीत किंवा लॅपटॉपच्या कामात मुलांना सहभागी करून घेऊ शकतात. याशिवाय घराची आवराआवरी, बँकेची कामं किंवा एकत्र गडावर जाणं अशा गोष्टी एकत्र करू शकता. अशा गोष्टी मिळून केल्याने त्याचा परिणाम मुलांवर बराच काळ राहतो.

ADVERTISEMENT

मुलांचं ऐका

बरेचदा पुरूषांची ऐकून घेण्याची तयारी असल्याचं दिसत नाही. तरूणवयापासून ते कोणाचंही न ऐकता मनमानी कारभार करू लागतात. अशा परिस्थितीला बदला. कारण मुलं तुम्हाला पाहात असतात. घरातील गोष्टींमध्ये आपल्या पत्नीशी चर्चा करा. मुलांनाही त्यात सामील करा. त्यांचं म्हणणंही ऐकून घ्या. कारण मुलं अनेक गोष्टी पाहत असतात आणि त्या डोक्यात साठवत असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत असताना 25 टक्के बोला आणि बाकीचं त्यांच्याकडून ऐका.

मुलांशी बोला

मुलं वयात येत असताना वडील-मुलाचं नात जरा जास्त किचकट होतं. जेव्हा मुलाशी महत्त्वाचं काही बोलायचं असतं तेव्हा थोडं अवघडल्यासारखं होतं. पण असं करून नका. मुलाशी मोकळेपणाने नात्यांबद्दल आणि त्याच्या शरीरातील बदलांबाबत बोला. ज्यामुळे मुलाच्या मनात विरूद्ध लिंगाशी वागण्याबाबत परिवर्तन होईल.

सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्या

मुलांच्या आसपास अनेक नकारात्मक गोष्टी असतात. जसं टीव्हीवरील जाहिराती किंवा कार्टून्सचा परिणाम मुलांवर लगेच होतो. पण वडील म्हणून तुम्ही त्यांच्याशी याबाबत बोललं पाहिजे. जे खरं आहे आणि जे आभासी आहे त्याबाबत सांगितलं पाहिजे. यामुळे तुमचं नातं अजून दृढ होईल.

वन ऑन वन टाईम

मुलांसोबत चांगलं नातं असावं असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी वेळ हा काढायलाच हवा. मुलांसोबत विविध गोष्टी करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ काढा. त्यांना नवनवीन ठिकाणी न्या. चांगल्या आठवणींना निर्माण करा.

ADVERTISEMENT

अध्यात्मावरील विश्वास

मुलांना घडवण्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यात अध्यात्मावरील विश्वास निर्माण करणे. तुम्ही कोणताही पंथ फॉलो करा, जो मुलांना जीवनाचा गहिरा अर्थ समजावून सांगेल. जर तुमचा असा काही विश्वास नसेल तर त्यांना स्वतःवरील विश्वास निर्माण करण्यास मदत करा. त्यांच्याशी शांतपणे बोला आणि अध्यात्माबाबत त्यांना सांगा.

लक्षात घ्या मुलांपासून दूर राहणे किंवा त्यांना अतिशिस्त लावणे हे चांगले नसते. त्यामुळे त्यांच्यात बदल होणार नाही. मुलांना हळूवारपणे हाताळा आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा. जेव्हा तुमचं आणि मुलांमधलं नातं चांगलं असतं तेव्हा प्रत्येक गोष्ट आपोआप सोपी होते.

25 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT