ADVERTISEMENT
home / Diet
Rainy Season Fruits That Can Strengthen Your Immunity in Marathi

पावसाळ्यात आवर्जून खावीत ही फळं, वाढेल प्रतिकार शक्ती

पावसाळा हा जितका आल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारा ऋतू आहे, तितकाच चिंताजनकही आहे. कारण पावसाळ्यात सर्वात जास्त साथीचे रोग, इनफेक्शन, अॅलर्जी होतात. पावसामुळे वातावरणात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे जीवजंतू पोसले जातात. शिवाय या काळात तुमची पचनशक्ती मंदावलेली असते. अशा काळात आजारपणे येण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आजारपणांपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला आहारात काही विशेष बदल करणं गरजेचं असतं. आहारात काही फळांचा समावेश करून तुम्ही तुमची प्रतिकार शक्ती वाढवू शकता. तसंच जाणून घ्या आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi, वजन वाढवण्यासाठी फळं (Weight Gaining Fruits In Marathi)

पावसाळ्यात कोणती फळं खावी

पावसाळ्यात आहारात फळांचा समावेश करताना काही गोष्टींची काळजी अवश्य घ्या. या काळात पिकणारी ताजी आणि सीझनल फळं तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच फायद्याची ठरू शकतात. 

डाळींब

डाळिंबामध्ये भरपूर पोषक घटक आणि अॅंटि ऑक्सिडंट्स असतात. आजारपणातून बाहेर पडण्यासाठी, आजारपण दूर ठेवण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात तुम्ही डाळींब नक्कीच खाऊ शकता. शिवाय डाळींबाचे कवच खूप कठीण आणि सुरक्षित असल्यामुळे जीवजंतुंमुळे इनफेक्शन होण्याची शक्यता कमी असते. शिवाय यातील व्हिटॅमिन बीमुळे शरीरातील लाल रक्त पेशी वाढण्यास आणि रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. डाळिंब खाण्याचे फायदे (Pomegranate Benefits In Marathi)

लिची

उन्हाळा संपता संपता आणि पावसाच्या सुरुवातीला तुम्हाला बाजारात लिचीचे घड दिसू लागतात. त्यामुळे या काळात तुम्ही लिची नक्कीच खाऊ शकता. लिचीमध्ये भरपूर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनच्या समस्या अथवा अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती मजबूत होते. ज्यामुळे सर्दी खोकला अथवा ताप येत नाही. पावसाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यासाठी लिची फायद्याची ठरते.

ADVERTISEMENT

जांभूळ

उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाच्या सुरुवातीला तुम्हाला जांभळांची फळंही सहज मिळतात. जांभळामध्ये व्हिटॅमिन्स, पोटॅशिअम, फॉलेट, लोह भरपूर असतं. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती मजबूत होते. जांभूळ खाणे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे असं मानलं जातं. कारण जांभळामुळे त्यांच्या रक्तातील साखर वाढत नाही.

चेरीज

चेरीज हे पावसाळ्यात मिळणारे एक सिझनल फळ आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे तुम्हाला इनफेक्शन होत नाही आणि  शरीरातील दाह, जळजळ कमी होण्यास मदत होते.  चेरीमधील व्हिटॅमिन सी मुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 

सफरचंद 

सफरचंद हे बारा महिने मिळणारं फळ आहे. आरोग्यासाठी सफरचंद खाणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. कारण सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी 1, बी 2, सी तसंच फॉस्फसर, लोह, आयोडिन, कॅल्शिअम अशतं. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमचं आजारपणापासून संरक्षण होतं. 

पावसाळ्यात फळं खाणं सुरक्षित आहे का 

फळं खाणं नेहमीच आरोग्यासाठी हितकारक असतं. मग पावसाळा असो वा कोणताही ऋतू फळं आहारात असायलाच हवी. फक्त पावसाळ्यात फळं खाताना ती ताजी आणि स्वच्छ धुतलेली असतील याची काळजी घ्यायला हवी. कारण फळांवर असलेल्या जीवजंतुंमुळे आजारपण पसरण्याची जास्त शक्यता असते. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT