ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
saree-prints-style-for-women-at-age50-in-marathi

50 व्या वयातही मिळवा साडीचा सुंदर लुक, नेसा या साड्या

वय कितीही असो साडीचे प्रेम कमी होत नाही. वयासह आपली आवड नक्कीच बदलते. पण समाजाच्या दृष्टीने आपल्याला जे आपण नेसतो आहोत ते चांगलं दिसेल की नाही या विचाराने नक्कीच साडीची फॅशन करायला काही महिला कचरतात. 50व्या वयातही तुम्ही साडी नेसून सुंदर दिसूच शकता. साडीची प्रिंट, पॅटर्न आणि कापडाची योग्य निवड केली तर तुम्ही 50व्या वयातही त्यापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसू शकता हे नक्की. या लेखातून आम्ही पन्नासाव्या वर्षी साडीची निवड कशी असावी आणि कोणत्या साडीच्या फॅशनमध्ये तुम्ही अधिक सुंदर आणि कमी वयाच्या दिसू शकता याबाबत काही टिप्स देत आहोत. तुम्हीही या टिप्स वापरा आणि या साड्यांच्या मदतीने दिसा अधिक तरूण!

ब्रॉड प्रिंट्स साडी (Broad Prints Sarees)

बरेचदा पन्नाशीच्या वयात महिला साडीमध्ये नाजूक आणि बारीक प्रिंट्स शोधताना दिसून येतात. पण या प्रिंट्स तुम्हाला तुमच्या वयापेक्षा अधिक मोठ्या वयाचे दर्शवितात. त्यामुळे तुम्ही ब्रॉड प्रिंट्सची निवड केल्यास, तुम्ही अधिक तरूण दिसता. ब्रॉड प्रिंट्सची साडी तुम्हाला नेसायची असेल तर तुम्ही या फॅशन टिप्सचा वापर करावा – 

  • तुम्हाला कॉटन, सिल्क आणि शिफॉनच्या साडीमध्ये ब्रॉड प्रिंट्स सापडतील. यासाठी तुम्ही शिफॉन फ्रॅब्रिक साडीची निवड केली तर उत्तम 
  • या पद्धतीच्या साड्या तुम्हाला तरूण दिसण्यासाठी मदत करतात. त्यावर तुम्ही स्लीव्हलेस ब्लाऊज अथवा नेट फॅब्रिक डिझाईनर ब्लाऊज घातल्यास, अधिक सुंदर दिसतो 
  • शिफॉनची साडी असेल तर त्यासह नेहमी हलक्या वजनाचे दागिने तुम्ही घालावे. कमीत कमी दागिने असतील ते उत्तम 

एम्ब्रॉयडरीची साडी (Embroidery Sarees)

एम्ब्रॉयडरीची साडी कोणत्याही वयात नेसता येते. तुम्ही 50 अथवा त्यापेक्षा अधिक वयाचे असाल तर एम्ब्रॉयडरी साडीची निवड करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या – 

  • तुम्ही अधिक एम्ब्रॉयडरी असणाऱ्या साडीच्या ऐवजी ब्रॉड एम्ब्रॉयडरी साडी निवडा 
  • तसंच तुम्हाला ब्लाऊजच्या नेकलाईनकडेही लक्ष द्यावे लागेल. सर्वात पहिले तुम्ही जर एम्ब्रॉयडरी साडी नेसत असाल तर त्यासह गडद रंगाचा ब्लाऊज तुम्ही घालावा. यासह ब्लाऊजचा गळा हा पारंपरिक डिझाईनपेक्षा ट्रेंडी डिझाईनचा बनवून घ्या 
  • एम्ब्रॉयडरी साडीसह तुम्ही कमीत कमी दागिने घाला. यासह मोत्याची माळ अथवा मोत्यांचे दागिने घातले तर अधिक सुंदर दिसतात 

सिल्क साडी (Silk Saree)

तुम्हाला जर सिल्क साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही कोणत्याही वयात सिल्क साडीची निवड करू शकता. पण तुम्ही पन्नाशीच्या वयात असाल तर कशा पद्धतीच्या सिल्क साड्यांची तुम्ही निवड करायला हवी हे जाणून घ्या – 

ADVERTISEMENT
  • तुम्ही गडद रंगाच्या सिल्क साड्यांचा वापर करावा. ज्याप्रमाणे गडद गुलाबी, निळा, गडद हिरवा वा लाल असे रंग तुम्हाला अधिक चांगला आणि तरूण लुक मिळवून देतील. 
  • प्रयत्न करा की, प्लेन सिल्क फॅब्रिकची साडी तुम्ही नेसाल. सेल्फ डिझाईनर अथवा प्रिंटची साडी तुम्ही निवडू नका 
  • सिल्क साडीसह तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता. तसंच तुम्हाला अधिक तरूण दिसायचे असेल तर तुम्ही मॅचिंग बीड्सचे ब्रॉड दागिनेही घालू शकता

लहरिया साडी (Leheriya Sarees)

लहरिया साडी अधिक प्रमाणात तरूण पिढी नेसताना दिसून येते. मात्र तुम्ही पन्नाशीमध्येही ही साडी निवडू शकता. मात्र या वयात नक्की कशा पद्धतीची लहरिया साडी निवडायची याबाबत तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्या – 

  • लहरिया साडीमध्ये नेहमी गडद रंगाची निवड करा. जर रंग फिकट असेल तर साडी जुनी दिसेल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा
  • जर तुम्ही जड लहरिया साडी नेसणार असाल तर तुम्ही त्यावर लाईट डिझाईन ब्लाऊज घाला
  • जर लहरिया साडीसह तुम्ही रंगबेरंगी फॅशन दागिने घालू शकता. हे अत्यंत हलके असते आणि दिसायला जड आणि उठावदार दिसते.  तसंच हे पार्टी लुकही देते.

तुम्हालाही वयाच्या पन्नाशीत अधिक तरूण दिसायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही साडीची स्टाईल करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT