छान उंच असेल तर मला सगळे ड्रेसेस एकदम परफेक्ट बसतील… मी थोडी उंच असते ना तर मॉडेलच झाले असती.. मी उंच का नाही…. मला थोडी उंची हवी होती… उंचीचा न्यूनगंड खूप जणांना असतो. चारचौघात असताना अगदीच उंची कमी असली की, खूप जणांना ओशाळल्यासारखे वाटते. पण उंची कमी म्हणजे तुमच्यामध्ये कोणताही कमीपणा आहे अजिबात नाही. उंची कमी असण्याचेही अनेक फायदे असतात. जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर तुम्हाला यामधील चांगल्याच गोष्टी कळू शकतील. उंचीच्या अभावाने तुम्ही देखील स्वत:ला कमी समजत असाल तर तुम्ही काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. या गोष्टीसोबत तुम्हाला काही टिप्सही देणार आहोत त्यामुळे नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल
उंची कमी असेल तर अशी करा साड्यांची निवड, दिसाल उंच
उंची कमी असण्याचे फायदे
सगळ्या गोष्टींचे काही फायदे असतात. उंची कमी असण्याचेही तसेच काही फायदे आहेत.
- तुम्हाला कधीही कोणासमोर झुकण्याची गरज नाही. तुमची नजर ही नेहमी वर राहते. लोक तुमच्याशी बोलण्यासाठी त्यांची नजर खाली झुकवतात.
- उंची कमी असेल तर तुमचे वय पटकन दिसून येत नाही. तुमच्या कमी उंचीचा फायदा नक्कीच तुम्हाला होतो.
- उंची कमी असलेल्यांना फॅशनेबल अॅसेसरीज चांगल्या शोभून दिसतात. तुमच्या उंचीमुळे त्या तुम्हाला पटकन मिळतात सुद्धा
- कोणत्याही लहान जागेत आणि लहान ठिकाणी तुम्ही अगदी सहज फिट बसू शकता.
लहान असल्यामुळे तुम्ही कुठेही आपटण्याची शक्यता नसते.
उंची कमी असली तरी तुम्ही घालू शकता ‘मॅक्सी’ ड्रेस, वाचा टीप्स
उंची कमी असेल तर कामी येणाऱ्या फॅशन ट्रिक
- तुम्हाला कोणतेही वनपीस आणि शॉर्ट ड्रेस नेहमीच चांगले दिसतात. त्यामुळे तुम्ही बिनधास्त वेस्टर्न ड्रेस निवडा
- पंजाबी सूट किंवा ट्रेडिशनल ड्रेसही अशा उंचीला चांगले दिसतात. पण असे ड्रेस निवडताना तुम्ही तुमच्या उंचीला साजेशी अशी फॅशन करा.
- कोणं म्हणत कमी उंची असणाऱ्यांना बेलबॉटम किंवा मोठ्या बॉटमच्या पँट चांगल्या दिसत नाही. उलट तुम्ही प्रत्येक नवा ट्रेंड करायला हवा. फक्त तो करताना तुम्हाला काय चांगलं दिसतं त्यानुसार ही ड्रेसिंग करा.
- उंची कमी असेल आणि तुम्ही फिगर मेंटेन ठेवली असेल तर तुम्हाला कोणतेही कपडे अगदी कोणत्याही वयात चांगले दिसतात.
लाँग शर्ट आहे सध्याचा नवा ट्रेंड, अशी करा स्टायलिंग
अजिबात बाळगू नका लाज
कमी उंची असण्याची लाज कशाला बाळगायची. आपल्या शरीरावर आपले प्रेम हवे. तुम्हाला कोणी बुटकी, उंची कमी आहे, शॉर्टी असे काहीही म्हणत असेल तर त्याकडे इतके लक्ष देण्याची काहीच गरज नाही. आता एका रात्रीत तुमची उंची वाढणार नाही आणि तुम्हाला कितीही वाटले तरी त्यात काही फरक पडणार नाही. त्यापेक्षा शरीर मेंटेन ठेवणे आपल्या हातात आहे. योग्य व्यायाम करा. तुम्ही स्वत:ला मेटेंन करा म्हणजे तुम्ही सगळीकडे नेहमीच उठून दिसाल.
आता कमी उंची लाज नाही तर तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असायला हवी.