मानव हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आयुष्यभर चांगल्या मित्रांची गरज असते. प्रत्येकालाच असे मित्र हवे असतात जे तुम्हाला कठीण काळात मदत करतील. जे तुमच्या आनंदात सहभागी होऊन तो द्विगुणित करतील आणि जे तुमच्या दुःखाच्या काळात, कठीण काळात तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून तुमच्या चेहेऱ्यावर हसू आणतील. मित्रच नसते तर आपण आज कुठे असतो हा विचार एकदा करून बघा. मित्रांशिवाय आयुष्य अगदी निरस आणि निराश वाटते कि नाही? मैत्री ही बर्याच गोष्टींची गुरुकिल्ली आहे. मित्रांबरोबर आपण आयुष्यातला सुंदर काळ घालवतो जो अनेक वर्षांनी आठवून सुद्धा आपल्या चेहेऱ्यावर एक स्मित उमटते.
Table of Contents
- मित्रांसाठी कॉमेडी मराठी जोक्स | Comdey Marathi Jokes For Friends
- मित्रांसाठी नवीन मराठी जोक्स | Funny Jokes In Marathi For Friends
- कॉलेज च्या मित्रांसाठी लेटेस्ट मराठी जोक्स – Marathi Jokes For College fridends
- शाळेतल्या मित्रांसाठी लेटेस्ट मराठी जोक्स – Marathi Jokes For School Friends In Marathi
- मित्रांसाठी खास मराठी जोक्स – New Funny Marathi jokes For Friends
एखाद्या पांचट जोकवर तुमच्या जिवलग मित्रासोबत खळखळून हसणे यापेक्षा उत्तम थेरपी कोणतीही नाही हे सगळेच मान्य करतील. मित्र हे आपली एक्सटेंटेड फॅमिलीच असतात ज्यांना तुमची सर्व रहस्ये माहित असतात आणि त्यांच्या आधाराने तुम्ही लव्ह लाईफ पासून ते करियर पर्यंत अनेक महत्वाचे निर्णय घेता. अशा तुमच्या BFFच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी एखादा नवीन मार्ग शोधत आहात? पुढे दिलेल्या जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends ) पैकी तुमच्या मित्रांना काही Funny Jokes In Marathi आणि मित्रांबरोबर हसण्याची मजा घ्या.
मित्रांसाठी कॉमेडी मराठी जोक्स | Comdey Marathi Jokes For Friends
चिंटू : यार मला सांग I am going याचा अर्थ काय?
पिंटू : मी जात आहे.
चिंटू : असा कसा निघून जातोस यार! सकाळपासून मी 20 जणांना हाच प्रश्न विचारला आणि सगळेच मी जातोय असं म्हणाले. जाताना उत्तर देऊन जा.
दोन मित्र दारूच्या नशेत रेल्वे रुळांच्या मध्यभागी चालत होते.
पहिला : अरे देवा, मी याआधी इतक्या पायऱ्या कधीच चढल्या नाहीत.
दुसरा: अरे पायऱ्या तर ठीक आहेत, पण त्यांना धरण्यासाठी रेलिंग किती खाली आहे ते बघितलेस का?
अधिक वाचा – वाढदिवसाला पाठवण्यासाठी भन्नाट विनोद
संता – याच मुलीशी मी लग्न करणार आहे
बंता – अरे मी तर हिला ओळखतो
संता – मूर्खा, तू हिला कसा काय ओळखतोस ?
बंता – ही आणि मी एकत्र झोपलेलो असताना पकडले गेलो होतो.
संता – काय?? कधी ?
बंता – अरे ती आणि मी एकाच गणिताच्या क्लासला जायचो.
एक मुलगा कॉलेजमध्ये पोहोचताच, आनंदाने उड्या मारू लागला.
मित्र – काय झालं, तू एवढा आनंदी कसा आहेस?
मुलगा – आज पहिल्यांदा माझ्याशी एक मुलगी स्वतःहून बोलली.
मित्र – अरे वा! कसं काय?
मुलगा – मी बसमध्ये बसलो होतो आणि ती मुलगी येऊन म्हणाली, ऊठ ही लेडीज सीट आहे.
अधिक वाचा – 100 एप्रिल फूल जोक्स, SMS मराठी मध्ये
मित्रांसाठी नवीन मराठी जोक्स | Funny Jokes In Marathi For Friends
मित्रांबरोबर मनसोक्त हसणे यासारखा दुसरा आनंद कोणता? तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जे जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends) पाठवा आणि मित्रांना हसवा.
सोनू त्याचा मित्र रवीला ज्ञान देत होता.
परीक्षेत पेपर अवघड असेल तर….
डोळे बंद करा,
एक दीर्घ श्वास घ्या,
आणि मोठ्याने म्हणा-
हा विषय खूपच मजेशीर आहे. पुढच्याही वर्षी पुन्हा हाच विषय शिकेन.
समुद्राच्या लाटांसारखे आयुष्यात अनेक मित्र येतात आणि जातात, पण खरे मित्र तेच जे आपल्या चेहऱ्यावर ऑक्टोपससारखे चिकटून राहतात.
चिंटू: आई, आता आंब्याचा रस फार महाग होईल, मग आपण काय करायचं?
आई : loanचं बघा…
राजू: आई, हा आंबा नाय पिकणार, याचं काय करायचं?
आई : Pickle
अरे माझ्या मित्रांना कुणीतरी सांगा खोटं बोलायची पण काही लिमिट असते….
काल एका मित्राला पैसे परत मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,
“अरे यार, थोड्यावेळाने फोन करतो, मी आता गाडी चालवतोय…..”
वाचा – नात्यांची फिरकी घेणारे मराठी सुविचार टोमणे
लेटेस्ट मराठी जोक्स मित्रांसाठी | Latest Marathi Jokes For Friends In Marathi
वाचा – वाढदिवसाला पाठवण्यासाठी भन्नाट विनोद
कॉलेज च्या मित्रांसाठी लेटेस्ट मराठी जोक्स – Marathi Jokes For College fridends
शाळेच्या मित्रांच्या किंवा कॉलेजच्या मित्रांच्या whatsapp ग्रुपवर शांतता पसरली आहे? मग यापैकी कुठला जोक (Funny Jokes In Marathi For Friends) त्या ग्रुपवर पाठवा आणि ग्रुपवर सगळ्यांना जागं करा.
वाचा – Marathi Jokes Sms | Jokes Marathi Sms
शाळेतल्या मित्रांसाठी लेटेस्ट मराठी जोक्स – Marathi Jokes For School Friends In Marathi
घरातल्या रोजच्या कटकटी, ऑफिसचा ताण यापासून जर कुठे चार क्षण निवांतपणा मिळत असेल तर तो मित्रांना भेटल्यावर ,मित्रांशी बोलताना मिळतो. समजा मित्रांना भेटायला जमले नाही तरी त्यांना मेसेज तर करूच शकतो ना? मग पाठवा तुमच्या मित्रांना हे मजेदार विनोद – (Funny Jokes In Marathi For Friends)
मित्रांसाठी खास मराठी जोक्स – New Funny Marathi jokes For Friends
भावंडं आणि मित्र यांच्या बरोबर आपण लहानपणापासून जी मजा करतो ती आठवणींची शिदोरी आपल्याला आयुष्यभर पुरते. भावंडं , मित्र यांच्याशी रोज भेटणं बोलणं होत नसलं तरी त्यांची आठवण आपल्या मनात ताजीच असते. त्यांचा एक मेसेज किंवा फोन म्हणजे आपल्यासाठी थंडगार हवेची झुळूक असते. त्यांनाही तुमच्याबाबतीत असेच वाटत असणार. मग वाट कसली बघताय, जिवलग मित्रांना हे जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends) पाठवा.
मित्रांच्या ग्रुपवर टाका हे मजेदार जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends)
Photo Credit – istockphoto
अधिक वाचा – बेस्ट आणि मजेशीर मराठी फिशपाँड