ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
significance-of-mehendi-in-marriage-in-marathi

लग्नापूर्वी नवरी का लावते मेहंदी, जाणून घ्या कारण

आपल्याकडे लग्नाच्या आधी अनेक विधींना सुरूवात होते. लग्नाचे हिंदू विधीही अनेक आहेत. यामध्ये मेहंदी लावण्याचा कार्यक्रमही मोठा असतो. अगदी मेहंदीचा खास असा वेगळा कार्यक्रम करण्यात येतो. नव्या नवरीसाठी हा कार्यक्रम अगदी खास मानण्यात येतो. मेहंदी हा नवरीच्या सोळा श्रृगांरांपैकी एक खास सोहळा मानण्यात येतो. त्यामुळेच मेहंदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, लग्नापूर्वी नवरीच्या हातावर मेहंदी का काढण्यात येते? तुम्हाला जर याचे कारण माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला या लेखातून याबाबत माहिती देत आहोत. 

मेहंदीचा इतिहास 

तुम्हाला माहीत आहे का की, मेहंदी हे बॉडी आर्टचे सर्वात जुने स्वरूप मानले जाते. मेंदी शब्दाची व्युत्पत्ती ही ‘मेंढिका’ या संस्कृत शब्दापासून झाली आहे, ज्याचा अर्थ मेंदीचे झाड असा आहे. यासह मेहंदीचा उपयोग हा वैदिक काळापासून करण्यात येत आहे. असं सांगण्यात येते की, क्लिओपात्रा राजकुमारीने आपले शरीर रंगविण्यासाठी मेहंदीचा वापर केला होता. 

मेहंदी लावणे आहे पारंपरिकता 

लग्नापूर्वी नवरी आणि नवऱ्याला मेहंदी लावणे ही भारतीय पारंपरिकता आहे. या परंपरेला रीत असे म्हटले जाते. या परंपरेनुसार नवरीच्या हाताला मेहंदी काढण्यात येते. मेहंदी हातावर काढणे शुभ मानले जाते. पण मेहंदी लग्नापूर्वी नवरीच्या हातावर लावण्याची महत्त्वाची कारणे आहेत आणि तीच तुम्ही जाणून घ्या. 

मेहंदी लग्नाच्या काही दिवस आधी नवरीच्या हातावर आणि पायवर लावली जाते. मेहंदीला सौभाग्याचं लेणं म्हणतात. दोन्ही कुटुंबामधील प्रेम दर्शविते. याशिवाय नवरीच्या मेहंदीचा रंग हा तिच्या आणि नवऱ्यामधील प्रेमही दर्शवितो असंही म्हटलं जातं. जितके दिवस मेहंदीचा गडद रंग राहतो त्यावरून नवविवाहित जोडीचे भाग्यही कळते असंही म्हटलं जातं. 

ADVERTISEMENT

मेहंदी लावण्याचे फायदे 

मेहंदी लावणे ही केवळ भारतीय परंपरा नाही दाखवत तर मेहंदीचे आरोग्यासंबंधित अनेक फायदे होतात. त्यामुळे नवरीला मेहंदी लावण्यात येते. 

तणाव कमी करते 

लग्नाच्या सगळ्या तयारीमध्ये मानसिक आणि शारीरिक तणाव खूप येतो. मेहंदी तुमच्या शरीरातील तणाव कमी करून नस शांत करण्यासाठी फायदेशीर ठरते. यासह मेहंदी तुमच्या शरीर आणि डोक्याला आराम आणि शांतता मिळण्यास मदत करते. हेच नाही तर मेहंदी ही डोकेदुखी आणि तापावरही चांगले काम करते. यावरही उपायकारक आहे. 

मेहंदीमध्ये असतात हिलिंग गुण 

तुम्हाला माहीत आहे का? मेहंदीमध्ये हिलिंग गुण असतात. याचे कारण म्हणजे मेहंदी ही नैसर्गिक पानांपासून बनविण्यात येते. त्यामुळे लग्नाच्या दरम्यान नवरी किंवा कुटुंबापैकी कोणत्याही सदस्यांना काही लागले तर त्या जागेवर मेहंदी लावण्यात येते. मेहंदीमुळे जळजळ कमी होते आणि घाव भरण्यासही मदत होते. 

एकमेकांमध्ये वाढते प्रेम 

असं म्हणतात की, मेहंदीचा रंग आणि सुगंधथ हा कामोत्तेजक स्वरूपात काम करतात. त्यामुळे नवरा आणि नवरी यांचे एकमेकांमधील प्रेम वाढण्यास मदत मिळते. नवरीला जेव्हा मेहंदी लावण्यात येते, तेव्हा ते केवळ मेहंदी आणि पाण्याची साधी पेस्टच नाही तर त्यात लवंग तेल, निलगिरी तेल असेही साहित्य मिक्स करण्यात येते, ज्याचा फायदा तुमच्या शरीराला होतो. या नैसर्गिक गोष्टी तुमच्या मेहंदीचा रंग अधिक गडद करण्यास मदत करतात. 

ADVERTISEMENT

मेहंदीच्या डिझाईन्समध्ये आलाय बदल

काळानुसार मेहंदीच्या डिझाईन्समध्येही बदल झाला आहे. आता नवरी अत्यंत वेगवेगळ्या आणि ट्रेंडी डिझाईन्सची निवड करतात. याशिवाय सफेद मेहंदी, सेमी – स्टोन मेहंदी, शिमरी मेहंदी आणि अनेक डिझाईन्स ट्रेंडिंगमध्ये आहेत. तसंच याशिवाय पारपंरिक मेहंदीला वेगळा ट्रेंडी ट्विस्ट देण्याचीही सध्या चलती आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

31 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT