ADVERTISEMENT
home / Diet
Diet In Typhoid

टायफॉईड झाल्यास आहारात या पदार्थांचा समावेश करा, लवकर सुधारेल प्रकृती 

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, टायफॉईड अशा अनेक रोगांच्या साथी पसरतात. विषमज्वर किंवा टायफॉइड हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन आहे जे साल्मोनेला बॅक्टेरियामुळे होते. जास्त ताप, जुलाब आणि उलट्या ही टायफॉईडची प्रमुख लक्षणे आहेत. ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय केले जातात. पण हा आजार साल्मोनेला टायफी (S.typhi) मुळे होतो ज्यावर वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे हा जिवाणू संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. एस टायफी दूषित अन्न किंवा पाण्यातून तुमच्या आतड्यांमध्ये प्रवेश करतो आणि तेथे सुमारे एक ते तीन आठवडे राहतो. नंतर तो आतड्याच्या भिंतीतून तुमच्या रक्तप्रवाहात प्रवेश करतो. रक्ताद्वारे, हे टायफॉइड जीवाणू इतर टिश्यूज आणि अवयवांमध्ये पसरतात आणि पेशींच्या आत लपतात, जे तुमच्या रोगप्रतिकारक पेशी देखील शोधू शकत नाहीत. टायफॉइडवर उत्तम उपचार उपलब्ध आहेत पण त्यावर उपचार न केल्यास हा आजार घातक ठरू शकतो. टायफॉईडकडे दुर्लक्ष झाल्यास मूत्रपिंड निकामी होणे, गंभीर अंतर्गत रक्तस्त्राव होणे इत्यादी गुंतागुंत होऊ शकते जे रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. 

टायफॉईडची लक्षणे कोणती आहेत 

Diet In Typhoid
Diet In Typhoid

टायफॉइड असलेल्या रुग्णांमध्ये बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यानंतर 1-3 आठवड्यांनंतर लक्षणे दिसतात. या आजाराचा कालावधी संसर्गाच्या तीव्रतेनुसार 3 ते 4 आठवड्यांपर्यंत असू शकतो. डोकेदुखी, बद्धकोष्ठता किंवा अतिसार, जास्त ताप येणे (103° फॅ), भूक न लागणे, यकृत आणि प्लीहा यांवर सूज येणे, छातीवर लाल खुणा, थकवा, थंडी वाजणे, शरीरात वेदना आणि अशक्तपणा, पोटदुखी ही टायफॉईडची लक्षणे आहेत. टायफॉइडवर उपचार करण्यासाठी सिप्रोफ्लेक्सिन आणि सेफ्ट्रियाक्सोन सारखी प्रतिजैविके दिली जातात. Azithromycin देखील त्याच्या उपचारासाठी दुसरा पर्याय आहे. टायफॉइडच्या गंभीर प्रकरणांमध्ये, कधीकधी आतड्यांमध्ये छिद्र होते, जे केवळ शस्त्रक्रियेद्वारे बरे होऊ शकते.

टायफॉइडमध्ये काय खावे 

विषमज्वराने ग्रस्त असलेल्या लोकांना पचन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनलशी संबंधित समस्या असतात. रुग्णांना भूक न लागणे आणि मळमळणे असे त्रास होतात. निरोगी आणि संतुलित आहाराचे सेवन करून तुम्ही लवकर बरे होऊ शकता. टायफॉइड झाल्यास सहज पचणारे पदार्थ खावेत. टायफॉइडचा सामना करण्यासाठी आहारात कर्बोदके, चरबी आणि प्रथिनांचे संतुलन राखणे आवश्यक आहे. लक्षणे कमी करण्यासाठी आणि उपचार प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हाय-कॅलरी आहार घ्या. टायफॉइडमध्ये वजन कमी होते. हाय-कॅलरी युक्त आहार घेतल्यास वजन वाढू शकते. शरीराचे वजन वाढवण्यासाठी ब्रेड, केळी, उकडलेले बटाटे जास्त खा.तसेच अधिक प्रमाणात द्रवपदार्थ घ्या. टायफॉइडमध्ये जास्त ताप आणि जुलाबामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.

Diet In Typhoid
Diet In Typhoid

शरीरातील द्रवपदार्थांची पातळी कमी झाल्यामुळे प्रकृती सुधारण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. ताज्या फळांपासून तयार केलेले रस आणि पाणी भरपूर प्या. शेंगा, चीज आणि दही यांसारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. मांसाचे सेवन टाळा, कारण ते पचायला जड असते. पण तुम्ही उकडलेले अंडे खाऊ शकता. तसेच जास्त फायबर, मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. काही दिवस तूप, लोणी आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा. टायफॉइडची लक्षणे कमी करण्यासाठी तुम्ही जीवनसत्त्वे अ, ब, क जीवनसत्त्वे असलेले पदार्थ खावेत. हे टायफॉइडपासून लवकर बरे होण्यास मदत करते. यासाठी तुम्ही भाज्यांपासून बनवलेले सूप पिऊ शकता.  लिंबू, मोसंबी,  संत्री अशी लिंबूवर्गीय फळे भरपूर खा. प्रथिनांसाठी कार्बोहायड्रेट्स, ड्रायफ्रुट्स, अवाकाडो, खजूर, जर्दाळू इत्यादींचे सेवन करणे आवश्यक आहे. जे अन्न पचायला हलके आहे आणि लवकर पचते तेच खा. टायफॉईडचा पचनसंस्थेवर त्वरीत परिणाम होतो, त्यामुळे अन्न पचणे कठीण होते.

ADVERTISEMENT

अशा प्रकारे तुम्ही टायफॉईडमध्ये आहाराची काळजी घेऊ शकता.

Photo Credit – istockphoto 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

10 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT