शॉपिंग हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. घरात लग्नकार्य असो, एखादा सण जवळ आल्यावर अथवा असंही नुसता टाईमपास म्हणून आपण शॉपिंग करतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शॉपिंगवर काही बंधने नक्कीच आली आहेत. कोरोना जाता जाता पुन्हा सक्रिय होत असल्यामुळे शॉपिंगसाठी जावं की नको असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट पुन्हा एकदा डोकेदुखी ठरत आहेत. मात्र आता लॉकडाऊनची भीती नसल्यामुळे तुम्ही इनफेक्शनचा धोका टाळत मस्त शॉपिंगचा आनंद लुटू शकता. अशा वेळी दुकानात अथवा शॉपिंगमॉलमध्ये जाऊन खरेदी करायची असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
कोरोनाच्या काळात शॉपिंग करण्यासाठी टिप्स
कोरोनाच्या काळात शॉपिंग करायची असेल तर या गोष्टींची काळजी जरूर घ्या.
चांगला मास्क वापरा
दोन वर्षात तुम्ही निरनिराळ्या प्रकारचे मास्क नक्कीच ट्राय केले असतील. पण तुम्हाला माहीत आहे का मास्क घालूनही तुम्हाला इनफेक्शनचा धोका टाळता येत नाही. कारण कोरोनाचा नवा व्हेरिएंट काहीसा जास्त धोकादायक आहे. म्हणूनच जर तुम्ही शॉपिंगसाठी गर्दीच्या ठिकाणी जाणार असाल तर चांगल्या गुणवत्तेचा आणि डबल मास्क वापरण्यास विसरू नका.
हात वारंवार सॅनिटाईझ करा
कोरोना महामारीमध्ये मास्क वापरणे आणि हात सॅनिटाईझ करणे सर्वांच्या सवयीचे झाले आहे. पण कोरोनाचा प्रभाव कमी झाला की लोक या नियमांचे पालन करणे विसरून जातात. पण जर तुम्हाला शॉपिंगसाठी घराबाहेर जायचं असेल तर या गोष्टी विसरून चालणार नाही. शॉपिंग करताना तुम्ही अनेक वस्तूं आणि कपड्यांना हात लावणार. यातून इनफेक्शन होण्याची शक्यता आहे. यासाठी सतत हात सॅनिटाईझ करत राहा.
शॉपिंग बॅग कॅरी करायला विसरू नका
शॉपिंग करताना नव्या बॅगेतून तुम्हाला इनफेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. कारण या बॅग कोणी कोणी हाताळल्या असतील याची खात्री देता येत नाही. यासाठी यापुढे शॉपिंगला जाताना स्वतःची एक मोठी बॅग जरूर कॅरी करा. ज्यामुळे तुम्ही विकत घेतलेल्या वस्तू दुकानदाराकडून थेट तुमच्या बॅगेत टाकून घ्या. ज्यामुळे इतरांशी संपर्क येण्याचा धोका काहीसा कमी होईल.
सोशल डिस्टन्स पाळा
शॉपिंग करताना तुम्ही एवढे गुंग होता की तुम्हाला अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे हे लक्षात राहत नाही. अनेक दुकान अथवा मॉलमध्ये सोशल डिस्टसिंग पाळण्यासाठी नियम आखलेले असतात. जर तुम्हाला या काळात सुरक्षित शॉपिंग करायची असेल तर लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि मगच खरेदीचा आनंद घ्या.
ऑनलाईन पेमेंट करा
लोकांशी थेट संपर्क टाळण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. वास्तविक आजकाल तुम्ही कोणतीही गोष्ट ऑनलाईन खरेदी करू शकता. मात्र जर एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी तुम्हाला दुकानात जावंच लागणार असेल तर कमीत कमी व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करा. ज्यामुळे पैशांची देवाणघेवाण आणि त्यातून होणारा इनफेक्शनचा धोका तुम्हाला टाळता येईल.
ठाण्यात शॉपिंग करायची आहे, मग या Designer Boutiquesला जरूर भेट द्या
विकत घेतलेले सामान थोडावेळ वेगळं ठेवा
तुम्ही दुकानातून थेट विकत घेतेलेले सामान पटनक घरातील सामानामध्ये मिसळू शकत नाही. यासाठी सामान काही काळासाठी कमीत कमी एक दिवसासाठी वेगळीकडे ठेवा.सर्व सामान सॅनिटाईझ करून मगच तुमच्या घरात घ्या. ज्यामुळे इनफेक्शनचा धोका नक्कीच टाळता येईल.
नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग ‘या’ ठिकाणांना जरूर भेट द्या
शॉपिंगवरून आल्यावर अंघोळ करा
आजकाल बाहेरून घरी आल्यावर प्रत्येकाने अंघोळ करणं बंधनकारक असायला हवं. कारण त्यामुळे इनफेक्शनचा धोका नक्कीच टाळता येईल. गरम पाण्याने स्वच्छ अंधोळ केल्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोरोनापासून नक्कीच वाचवता येईल. त्यामुळे ही गोष्ट प्रत्येकाने घरात स्वतःहून पाळायला हवी.
वेडिंग शॉपिंगसाठी पुण्यातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या (Wedding Shopping In Pune)