कोणत्याही आईपेक्षा ही जास्त सक्षमपणे आपल्या मुलांना सांभाळणारे बॉलिवूडचे ‘4’ सिंगल फादर्स

कोणत्याही आईपेक्षा ही जास्त सक्षमपणे आपल्या मुलांना सांभाळणारे बॉलिवूडचे ‘4’ सिंगल फादर्स

प्रत्येक आई आपल्या मुलांचा प्रेमानं सांभाळ करते, त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना लहानाचं मोठं करत असते. हे जरी खरं असलं तरी काही वेळा ह्यालाही अपवाद असणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. समाजाने आखलेली ही चौकट मोडीत काढली आहे बॉलिवूडच्या या 4 सिंगल फादर्सने. हे सर्व सिंगल फादर्स एकट्याने, कुठल्याही आईपेक्षा जास्त काळजी घेत आपल्या मुलांचं संगोपन करत आहेत. त्यांच्या मुलांना कशाचीच कमतरता जाणवणार नाही, याची ते नेहमीच दक्षता घेतात. हे सिंगल फादर्ससुध्दा आई इतकंच समर्पित होऊन त्यांना वाढवताएत, जेणेकरुन त्यांची मुलं भविष्यात स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहतील...खोटं वाटतयं का? हो... बॉलीवूडमध्ये असे सिंगल फादर्स आहेत, जे स्वेच्छेने सिंगल फादर झाले आहेत. आता तुमची उत्सुकता जास्त न ताणत नाही...जाणून घ्या नक्की, कोण आहेत हे सिंगल फादर्स.


करण जोहर


Karan johar with his mom and kids


बॉलीवूडचा सुप्रसिध्द दिग्दर्शक, सूत्रसंचालक आणि निर्माता करण जोहरने काही दिवसांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा बाबा झाला आणि त्याच्या आयुष्यातली पोकळी भरून काढली. त्याच्या जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा आहे, ज्याचं नाव करणने ‘यश’ ठेवलं असून मुलीचं नाव त्यानं ‘राही’ ठेवलं. मुलाचं त्याने स्वतःच्या वडिलांच्या म्हणजेच यश जोहर यांच्या नावावरुन ठेवलं. तर मुलीचं नाव त्याच्या आईच्या नावावरुन म्हणजेच हीरू जोहर यांच्या नावावरुन ठेवलं. करणने त्याच्या 'अॅन अनसूटेबल बॉय' या त्याच्या ऑटोबायोग्राफीच्या प्रकाशनावेळी बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळीच त्याने मुल दत्तक घेण्याबद्दल किंवा सरोगसीच्या माध्यमातून जन्म देण्याबाबत वाच्यता केली होती. बापाचं मन असलेला करण खरंच आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतो. बॉलीवूडचा कुठलाही कार्यक्रम असो तो त्याच्या मुलांना घेऊन येतोच.  


तुषार कपूर


25016862 1733878149990337 7943075546143916032 n


बॉलीवूडचे सुपरस्टार जितेंद्र यांचा मुलगा अभिनेता तुषार कपूर याने ही बाप होण्यासाठी सरोगसीचा मार्ग पत्करला. सिंगल फादर असलेल्या तुषारच्या मुलाचं नाव आहे लक्ष्य. आपल्या पुत्रजन्मानंतर तुषार म्हणाला होता की, 'मला माझं लक्ष्य मिळालं. मी इतका आनंदी आहे की, माझा आनंद मला शब्दात व्यक्त करता येणार नाही. आता इतकंच सांगता येईल की, माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं लक्ष्य, ‘लक्ष्य’च आहे.  मदर्स डेच्या निमित्तानं तुषारने व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.


राहुल देव


Rahul Dev with his Son


बॉलीवूडचा अॅक्टर आणि मॉडल राहुल देव हा सुध्दा सिंगल फादर असून त्याच्या मुलाचं नाव सिध्दार्थ आहे. राहुल देवची पत्नी रीना ही 2010 साली कॅन्सरमुळे मृत पावली. त्यानंतर राहुल एकटाच आपल्या मुलाला वाढवतोय. पत्नीच्या मृत्यूपश्चात राहुल आपल्या मुलाचा आईपेक्षा जास्त प्रेमानं सांभाळ करतोय. राहुल एक अभिनेता तर आहेच पण त्याचबरोबर त्याची एक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून वेगळी ओळख आहे. सध्या सिध्दार्थ हा ब्रिटनमध्ये शिक्षण घेतोय. राहुलने त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलता यावा, यासाठी बिग बॉससारख्या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.  


राहुल बोस


Rahul Roy with kids


राहुल बोसला बॉलीवूडमधील सिंगल फादर्समध्ये अव्वल स्थान आहे. राहुल बोस हा अभिनेता, खेळाडू तर आहेच, पण त्याचबरोबर तो सामाजिक कार्यामध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो. त्याच माध्यमातून अंदमान-निकोबारमधून त्याने 11 वर्षाच्या 6 मुलांना दत्तक घेतलं. त्याने त्याच्या मुलांचं शिक्षण आणि त्यांना वाढवण्यासाठी तब्बल 24 लाखांची रक्कम स्वबळावर उभी केली. एवढ्यावरच न थांबता त्याने अंदमान-निकोबारमधल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप प्रोग्रॅम सुरु केला. राहुल जरी आपल्या या मुलांबरोबर कुठे दिसत नसला तरी त्याच्या मुलांचा तो एक समर्पित सिंगल फादर आहे.


हेही वाचा -


1. बघा बॉलीवूडच्या या ग्लॅमरस अभिनेत्री लहानपणी किती क्यूट दिसायच्या...
2. ह्या आहेत एकटीच्या जीवावर आपल्या मुलांना सांभाळणाऱ्या बॉलीवूडच्या 11 सिंगल मदर्स 
3. ह्या टॉप बॉलीवूड सेलिब्रिटीज ने शेअर केले आईबरोबरचे फोटो आणि क्यूट मेसेजेस 
4. जाणून घ्या, कोणते बॉलीवूड सेलेब्स आहेत प्राणीप्रेमी