Marriage Anniversary Wishes In Marathi - लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | POPxo

लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश (Marriage Anniversary Wishes In Marathi)

लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश (Marriage Anniversary Wishes In Marathi)

वाढदिवस मग तो एखाद्या व्यक्तीचा असो वा लग्नाचा असो. नेहमीच खास असतो नाही का? त्यातही लग्नाचा वाढदिवस किंवा सहज बोलीभाषेत मॅरीज अॅनिव्हर्सरी हा एक उत्तम दिवस आहे एखाद्या जोडप्याचे प्रेम साजरे करण्याचा. साधारण सगळ्या संस्कृतीमध्ये, लग्नाचा वाढदिवस दिवस छान पध्दतीने साजरा ही केला जातो. नवरा-बायको हा दिवस अविस्मरणीय व्हावा म्हणून एकमेकांना अनेक भेटी देतात. ह्या भेटी ज्या त्यांच्या प्रेमाचं, नात्याचं आणि आनंदाचं प्रतीक असतात. तसंच या दिवसाला चारचांद लावतात त्या जोडप्याला सगळ्यांकडून मिळणाऱ्या भरघोस शुभेच्छा. लग्नाचा वाढदिवसाचं महत्त्व, लग्नवाढदिवसाला द्यायचे हटके गिफ्ट्स आणि लग्न शुभेच्छा संदेश या दोन्ही गोष्टींबाबत आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत. 


लग्नदिवसाचं आयुष्यातील महत्त्व


लग्नवाढदिवसाला प्रत्येक वर्षी देता येतील असे हटके गिफ्ट्स


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


आईबाबांना लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा


लग्नवाढदिवसानिमित्त जोडप्याला इतरांकडून मिळालेल्या शुभेच्छा


लग्नदिवसासाठी काही हलकेफुलके संदेश


लग्नदिवसाचं आयुष्यातील महत्त्व (Importance of Wedding)


Marriage-Anniversary-Wishes-In-Marathi


शादी का लड्डू जो खाये वो पछताये और ना खाये वो भी पछताये. लग्न ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या आयुष्यातील एका टप्प्यावर होतेच. लग्न हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. ज्या दिवशी दोन जीव लग्नगाठीत प्रेमाने, त्यांच्या आईवडील, आप्तजन, मित्रपरिवार यांच्या संमतीने आणि साक्षीने बांधले जातात. हा दिवस सर्वांसाठी आनंदाचा असतो. तो सोहळ्याचा दिवस ज्याची ते जोडपं आणि त्यांचे आईवडील कित्येक दिवस वाट बघत असतात. ह्या दिवसाची प्रत्येकाने स्वप्न पाहिलेली असतात. कितीतरी जणांच्या लग्नात गेल्यावर आपण विचार केलेला असतो. आपल्या लग्नात आपण असं करू किंवा हे नको. अनेक सेलिब्रिटी लग्न पाहून ठरवलेलं असतं की हे असंच करु.


तसेच वधू विवाह बॅग बद्दल वाचा


किती शॉपिंग करायची, काय काय घ्यायचं आणि बॅचलरला हे करायचं आणि केळवणांना ही फर्माईश करायची. असे बरेच प्लॅन केलेला असतात. पण लग्न हे केवळ दोन जीवांचं नाहीतर दोन कुटुंबांचं मिलन असतं. सुरूवात असते एका नव्या सहजीवनाची. लग्न आधीचे आणि लग्न ठरल्यानंतरचे दिवस अगदी भूर्रकन उडून जातात. एकमेंकांच्या कोैतुकात, लग्न सोहळ्याच्या खरेदीत, नातेवाईकांना भेटण्यात, बॅचलरेट किंवा बॅचलर पार्टीत, लग्नाच्या तयारीत, आमंत्रणांमध्ये आणि ही लिस्ट न संपणारी. पण खरी परीक्षा सुरू होते ती लग्नानंतर. हनिमूनच्या गोड दिवसांनी भारून गेलेले जोडपे घरी परतते आणि सुरू होते खऱ्या अर्थाने सहजीवनाची सुरूवात. जशी वर्ष पुढे सरकतात तशी सहजीवनातील गंम्मत ही वाढत जाते. सहजीवन हे फक्त दोघांचा न राहता जेव्हा कुटुंबातील प्रत्येकाशी आपोआप जुळतं. तेव्हा ते नातं खऱ्या अर्थाने नावारूपाला येतं.लग्नाची पहिली काही वर्ष अगदी नकळत सरुन जातात. मुख्यतः एकमेंकाना समजण्यात… हो मग ते अरेंज मॅरेज असो वा लव्ह मॅरेज. लग्नाआधी आणि लग्नानंतर त्या दोघांच्या नात्यात बराच चांगला वाईट फरक पडत असतो. हा फरक बाजूला ठेवून एकमेकांना समजून घेत सहजीवन सूरू असतं.   


१ ला, ५ वा, २५ वा आणि ५० वा  लग्नवाढदिवस हे प्रत्येक जोडप्याच्या सहजीवनातील काही महत्त्वाचे टप्पे आहेत. या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी एकमेंकासोबत वाटून घेतलेली सुख दुःख, चांगले वाईट अनुभव, एकत्र जगलेले क्षण आणि बरंच काही असं त्या दोघांचंच असं खास असतं. आईवडिलांशी, बहिण-भावांशी किंवा मित्रमैत्रिणींशी आपण कितीही रोजच्या रोज शेअर करत असलो तरी त्या दोघाचं स्पेशल असं फक्त दोघांपुरत असं असतंच. या महत्वाच्या दिवशी ते सर्व अगदी अलगद वर येतं आणि पुढच्या प्रवासाला अधिक जोमाने सुरूवात करण्याची स्फूर्ती देतं.


लग्नाच्या वाढदिवसाबद्दलच्या ह्या हटके गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? 


Marriage-Anniversary-Wishes-In-Marathi


विविध देशांतील लग्न प्रथांप्रमाणे प्रत्येक लग्नवर्षाला वेगवेगळे रंग सांगण्यात आले आहेत.  ह्या विविध रंगांसोबत तुम्ही तुमचा लग्नवाढदिवस साजरा करू शकता. जसा पहिल्या लग्नवाढदिवसासाठी सोनेरी किंवा पिवळा रंग सांगण्यात आला आहे. मस्तपैकी एकमेकांना सारखे टीशर्ट घ्या किंवा मग्ज घ्या आणि रंग सार्धम्य साधा.


पाहूया विविध लग्न वर्धापनदिनासाठी सांगण्यात आलेले रंग....


१ ल्या वर्षी जसं आपण आधीच वाचलं असेल पिवळा किंवा सोनेरी


२ ऱ्या वर्षी लाल


३ ऱ्या वर्षी पांढरा किंवा हिरवा


४ थ्या वर्षी निळा


५ व्या वर्षी गुलाबी किंवा आकाशी निळा


१० व्या वर्षी चंदेरी किंवा निळा


१५ व्या वर्षी रूबी रेड


२० व्या वर्षी एमराल्ड हिरवा किंवा पांढरा


२५ व्या वर्षी चंदेरी


५० व्या वर्षी पुन्हा सोनेरी


तर वरील रंगसंगती आपल्या लग्नवाढदिवशी वापरून पहा. ह्या रंगाचा केक किंवा ड्रेस घाला, सजावट करा. सगळ्यांना ही कल्पना ही आवडेल खासकरून तुमच्या खास व्यक्तीला आणि तुमच्या खास दिवसाला चारचांद लावेल.


लग्नवाढदिवसाला प्रत्येक वर्षी देता येतील असे हटके गिफ्ट्स (Anniversary Gift Ideas)


Marriage-Anniversary-Wishes-In-Marathi


Also Read Best Success Quotes In Marathi


लग्नाच्या वाढदिवसाला प्रत्येक वर्षी काय गिफ्ट द्यायचं. हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर डोन्ट वरी. लग्न वाढदिवसाला दरवर्षी देण्यासाठी काही वेगवेगळ्या आणि हटके गोष्टी आहेत आणि त्या त्या गोष्टी देण्यामागची काही खास कारणं ही आहेत.


पहिल्या वर्षी पेपर (First Anniversary Gift Idea)


पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला एकमेकांना गिफ्ट देणं तसं सोपं असतं. पहिलंच वर्ष असल्याने खूप उत्सुकता असते. नव्या नवख्या सर्व गोष्टींचा आनंद असतो. खरंतर एक वर्ष कसं गेलं हे लक्षातच येत नाही. लग्नाचं पहिलंच वर्ष आणि तुम्ही म्हणालं... पेपर गिफ्ट द्यायचा? लग्नाचं पहिलं वर्ष हे कोऱ्या पाटीसारखंच असतं. नव्या सहजीवनाची सुरूवात असते. पेपर देणं हे सांकेतिक स्वरुपात तुमच्या सहजीवनाच्या कथेला केलेली सुरुवात आहे.  जी तुम्ही तुम्हाल हवी तशी लिहू शकता याचं प्रतीक आहे. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या वर्षी बायकोला/ नवऱ्याला महागडी भेटवस्तू देतानाच एखादी डायरी द्या ज्यात प्रेम कविता किंवा प्रेम संदेश लिहीला असेल किंवा एखाद्या नाटकाची तिकिटं द्या.


दुसऱ्या वर्षी कॉटन (Second Anniversary Gift Idea)


पहिलं वर्ष अगदी अलगद सरतं. सणवार, हनिमून आणि नवीन नाती ह्यात कळतंच नाही. पण दुसरं वर्ष सुरू होताना जोडपं एकमेकांना ओळखू लागलेलं असतं आणि त्याचं नातं ही घट्ट होतं असतं. जसा कागदापेक्षा कापूस जास्त टीकाऊ असतो. पहिल्या वर्षापेक्षा दुसर्ं वर्षात जास्त दृढ झालेलं नात असतं. दुसऱ्या वर्षी गिफ्ट देताना तिला किंवा त्याला बाथरोब द्या, मोनोग्रामड टॉवेल सेट, क्युट पिलो किंवा स्वेटशर्ट द्या.   


तिसऱ्या वर्षी चामडं (Third Anniversary Gift Idea)


चामडं हे आपलं रक्षण करत. तसंच लग्न हेसुध्दा एक प्रकारे सुरक्षेचं प्रतीक आहे. जे तुम्हाला समाजात एक ओळख आणि सामाजिक स्थान मिळवून देतं. सो... त्याला किंवा तिला गिफ्ट देताना लेदर बॅग, लेदर बेल्ट किंवा लेदर वॉलेट गिफ्ट करा.


चौथ्या वर्ष फळं किंवा फुलं (Fourth Anniversary Gift Idea)


चौथ्या वर्षांपर्यंत तुमच्या नात्याने अनेक ऋतूंप्रमाणे उतारचढाव पाहिलेले असतात. त्या उतार आणि चढावांमध्ये तुम्ही एकमेकांसोबत व्यतीत केलेल्या चार वर्षांचं ही फळं किंवा फुलं ही देखील ह्याचंच प्रतीक आहेत. त्यामुळे तिला किंवा त्याला गिफ्ट देताना रोझ सेंटेड परफ्युम, इ़डिएबल बुके किंवा अॅपल आयपॅड ही देऊ शकता.


पाचव्या वर्षी लाकूड (Fifth Anniversary Gift Idea)


पाचव्या वर्षांपर्यंत तुमच्या नात्याची मुळं छान रोवलेली असतात आणि एखाद्या झाडाच्या फांद्यांप्रमाणे नातंसुध्दा सतत वाढतं. सो.. पाचव्या वर्षी या लाकडयासारख्या टणक नात्याचं प्रतीक म्हणून तिला किंवा त्याला एखादं लाकडी वस्तू जसं लाकडी फुलदाणी किंवा रॉकींग चेअर ही देऊ शकता.


10 व्या वर्षी अॅल्युमिनिअम (10th Marriage Anniversary Gift Idea)


अॅल्युमिनिअमचा वापर हा एकेकाळी लोखंडाला गंज लागू नये म्हणून करण्यात यायचा. लग्नाच्या दहा वर्षानंतर मुरलेल्या जोडप्याचं नातंसुध्दा गंजविरहीत राहावं ह्या उद्देशाने तिला अॅल्युमिनिअम कुकवेअर आणि त्याला ग्रिलिंग टूल्स देऊ शकता.


25 व्या वर्षी चांदीची वस्तू (25th Wedding Anniversary Gift Idea)


नात्याच्या सिल्व्हर ज्युबिली वर्षात तुम्ही चांदीसारखा मौल्यवान धातू जो जगभरात प्रसिध्द आहे. त्याची एखादी अनमोल वस्तू गिफ्ट करू शकता. जे तुमच्य नात्याप्रमाणे मौल्यवान तर असेलच आणि त्याच्या चकाकीप्रमाणे नात्याचं तेजस्वी प्रतीक ही ठरेल, मग तिला किंवा त्याला गिफ्ट द्या चांदीचा दागिना किंवा वस्तू.  


50 व्या वर्षी सोनं (50th Anniversary Gift Idea)


आयुष्यातील 50 वर्ष एखाद्याबरोबर व्यतीत करणं सोपं नाही. हे सुंदर आणि मौल्यवान नातं साजर करणं आवश्यकच आहे आणि या क्षणी सोन्यासारख्या नात्याला सोन्यासारखं मौल्यवान गिफ्ट मिळालं तर सोने पे सुहागाच जणू. मग तिला एखादा सुंदर दागिना तर त्याला एखादी अंगठी किंवा कपल वॉच हा ऑप्शनसुध्दा छान आहे.


जशी प्रत्येक लग्न वाढदिवसाला गिफ्टस् महत्वाची आहेत. तश्याच महत्वाच्या आहेत मनापासून एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा. शुभेच्छा मग त्या कविता लिहून दिलेल्या असोत, मराठीतल्या असोत किंवा छानशी नोट लिहून दिलेल्या असोत. सणवार, मित्रमेैत्रीणी, नवे ऋणानुबंध आणि नव्या जवाबदाऱ्या ह्या सर्व गोष्टीत पहिलं वर्ष अगदी सहज जातं. खरी मजा नंतर येते. जेव्हा नात्यातील उत्सुकता तर असते पण काही प्रमाणात वयोमानाप्रमाणे कमी ही झालेली असते. दिवस साजरा तर करायचा असतो. मनात हो नाही हो नाही सुरू असतं. मुलंही अॅड ऑन झालेली असतात. पण अशावेळी तुमचा हा खास दिवस अविस्मरणीय करण्यासाठी मदतीला येतात त्या आपल्या मायबोलीतील किंवा इतर भाषेतील लग्नवाढदिवसाच्या शुभे्च्छा. मुख्य म्हणजे आपल्या भाषेतून व्यक्त होऊन दिलेल्या शुभेच्छांची गोष्ट काही औरच असते. नाही का?


पाहूया मराठीतून लग्न वर्धापनदिवशी दिलेल्या काही शुभेच्छा. (Marriage Anniversary Wishes In Marathi)


Marriage-Anniversary-Wishes-In-Marathi


1. नाती जन्मोजन्मीची


परमेश्वराने जोडलेली,


दोन जीवांची प्रेम भरल्या


रेशीम गाठीत अलगद बांधलेली…


लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


2. दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आले..


आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरले..


लग्नाच्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…


3. सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते


एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता


नेहमी अशीच वाढत राहो


संसाराची गोडी वाढत राहो


लग्नाचा आज वाढदिवस आपल्या


सुखाचा आणि आनंदाचा जावो.


4. आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण


लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


5. तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता


Made for each other


तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो


हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी


आईबाबांना लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा (Anniversay Wishes For Parents)


लग्नाचं नातं अजून पुढच्या पायरीवर नेणारी गोष्ट म्हणजे मुल जन्मणं. एका मुलाने आपल्या आईवडिलांना २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा. 


1. मिनिट असतं सेकंदाच आणि तास असतो मिनिटांचा


आम्ही माणसं.... माणसं बनतो ती नात्यांनी  


आज मी माझ्या आई-बाबांना त्यांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो


कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं तर


माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलं


तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ


मराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव.


2. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो


तुम्हाला भरभरून यश मिळो


लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून


हार्दिक शुभेच्छा !!


Wishing You a very Happy Wedding Anniversary !!


पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Wedding Anniversary Wishes to Wife from Husband In Marathi)


Marriage-Anniversary-Wishes-In-Marathi


1. ना कोणता क्षण सकाळ ना कोणता क्षण संध्याकाळ आहे


माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे


ह्याला फक्त शायरी समजू नकोस


माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पेैगाम आहे.


2. उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे


नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे


डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ


तू माझ्यासाठी नेहमीच एक खास आहे


3. माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद आणि मला एक संधी दिल्याबद्दल,


मला हवं तसं जगू देण्याची आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल


चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस


4. मला आजही लक्षात आहे


ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो


लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


5. तुमच्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की


तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद


आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो


6. तो खास दिवस आज पुन्हा आला आहे


ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले


आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत


तू माझ्यासाठी खूपच खास आहेस


लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…


लग्नविधीसाठी घेतले जाणारे मराठी उखाणे (Marathi Ukhane for Marriage)


7. तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल


पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे


हॅप्पी अॅनिव्हर्सरी


8. प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत


प्रेम म्हणजे रोजचं जगणं


एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं


खुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं


प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी


एकमेकांना सांगणं


हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम


लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…


लग्नवाढदिवसानिमित्त जोडप्याला इतरांकडून मिळालेल्या शुभेच्छा (Wedding Anniversary Wishes For Couples)


Marriage-Anniversary-Wishes-In-Marathi


1. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,


लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,


आनंदाने नांदो संसार तुमचा,


लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


2. एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद


पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा


3. इतक्या वर्षानंतरही... आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस


हॅपी अॅनिव्हर्सरी


4. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच


लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


5. लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे


पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे


हॅपी अॅनिव्हर्सरी


6. I Love You हे फक्त तीन शब्द आहेत


जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत


जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे


तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस


हॅपी अॅनिव्हर्सरी


7. कसे गेले वर्ष मित्रा कळलंच नाही


लोक म्हणतात लग्नानंतर मित्र बदलतात


हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही ...


लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा


8. पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात


आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी


जीवनाच्या एका नाजूक वळणावरती


झाल्या त्या भेटीगाठी


सहवासातील गोड-कडू आठवणी


एकमेकांवरील विश्वासाची सावली


आयुष्यभर राहतील सोबती


लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी


9. आला तो सुदिन पुनः एकदा


ज्या दिवशी घेतल्या शपथा


तुझे या जीवनात एक वेगळे स्थान


कारण तुझा सहवास भागवतो प्रेमाची तहान


तुला आपल्या शुभ बंधनाच्या मनापासून शुभेच्छा


लग्नदिवसासाठी काही हलकेफुलके संदेश (Marriage Anniversary Messages) 


Marriage-Anniversary-Wishes-In-Marathi


1. बायको - आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे


आज मी चिकन बनवते


नवरा - चालेल. पण आपल्या चुकीची शिक्षा चिकनला का देत्येस?


2. ईश्वराचे आभार माझ्या गोडव्याने


तुम्हाला मधुमेह झाला नाही


आपल्या नात्यातील गोडवा असाच वाढत राहो


लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


3. मी इतकी आनंदी आहे की,


जन्मभर सतवण्यासाठी मला हक्काचा साथीदार मिळाला


हॅप्पी अॅनिव्हर्सरी


4. लग्न म्हणजे एखाद्या युध्दभूमीसारखे असते.


जिथे तुम्हाला युध्दासाठी सतत राहावे लागते


लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


5. लग्नाचे दोन महत्वाचे नियम


- बायको नेहमी बरोबरच असते.


- जेव्हा तुम्हाला वाटेल की ती चुकीची आहे तेव्हा स्वःताला मारा आणि पुन्हा पहिला नियम वाचा.


मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना अनेकदा तुम्ही अनेकदा लग्नविषयावरील अनेक विनोद ऐकलेही असतीलच ना. तशाच ह्यावरील दिलेल्या शुभेच्छा. बुरा ना मानो बस एन्जॉय करो.


ह्या झाल्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छाबद्दल. प्रेमळ, हलक्याफुलक्या आणि भावनिक कित्येक तऱ्हेने तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला ह्या सुंदर सोहळ्याची, प्रेमळ आणि अतूट नात्याची आठवण करून देऊ शकता. तो क्षण पुन्हा एकदा जगू शकता. पण तो आनंद त्या क्षणापुरताच मर्यादित न ठेवता वारंवार जगू शकता. आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या जीवनसाधीदाराला रोज खूष करू शकता. आपल्या आवडत्या व्यक्तीला जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करा. त्याला आवडणाऱ्या गोष्टी फक्त एका दिवशी न करता जमेल तेव्हा करा. आपल्या पत्नीला रोजच्या कामात मदत करा. एक दिवस तिच्याऐवजी तुम्ही मुलांचा अभ्यास घ्या. आपल्या बायकोला रोज एकदातरी स्तुती करा. तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत एखाद्या आवडत्या विषयावर गप्पा मारा. एखाद्या दिवशी त्याला आवडणारा पदार्थ त्याला न सांगता त्याच्या डब्यात द्या. तिच्या नकळत एखादा छान गजरा किंवा साडी तिला आणा. जमल्यास महिन्यातून एकदा मुंबईबाहेर फिरायला जा. त्याच्या आईबाबांना एखाद्या चित्रपटाला पाठवा. तिच्या आईबाबांना सहजच जाऊन भेट देऊन या. मुलांच्या जबाबदाऱ्या न सांगता वाटून घ्या


ह्या साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीही आपल्या आयुष्यात महत्वपूर्ण ठरत असतात आणि आपले नाते दिवसागणिक अजून घट्ट करत असतात. सरतेशेवटी सहजीवनाची हीच मजा आहे.


शेवटी काय....तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.


Image Source : Instagram


You might like this:


Happy Birthday Wishes In Marathi